आपली अधिकृत वेबसाईट—दुसरी भाषा बोलणाऱ्याला मदत करण्यासाठी
त्याला आपली वेबसाईट दाखवा: दुसरी भाषा बोलणारा कोणी भेटल्यास तो, “साईटची भाषा” या यादीचा उपयोग करून त्याच्या स्वतःच्या भाषेत वेबसाईट कशी पाहू शकतो ते दाखवा. (काही भाषांमध्ये साईटचा केवळ काही भागच उपलब्ध आहे.)
त्याला त्याच्या भाषेतील वेब पेज दाखवा: आपल्या एखाद्या प्रकाशनाचे, जसे की बायबल काय शिकवते पुस्तकातील किंवा जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पत्रिकेतील पेज काढून दाखवा. “भाषा निवडा” या यादीतून घरमालकाची भाषा निवडा.
त्याला एखादा लेख ऐकू द्या: त्याच्या भाषेत ज्या लेखाचे ऑडिओ ट्रॅक उपलब्ध आहे तो लेख शोधा आणि प्ले करा. तुम्ही एखादी नवीन भाषा शिकत असाल तर वाचत असताना एखादे ऑडिओ ट्रॅक ऐकून आपले भाषा कौशल्य वाढवा.—“प्रकाशने/पुस्तके आणि माहितीपत्रके” किंवा “प्रकाशने/नियतकालिके” पाहा.
कर्णबधिरांना साक्ष द्या: एखादी कर्णबधिर व्यक्ती भेटल्यास बायबलमधील, एखाद्या पुस्तकातील, माहितीपत्रकातील किंवा पत्रिकेतील एखाद्या अध्यायाचा संकेत-भाषेतील व्हिडिओ प्ले करा.—“प्रकाशने/संकेत भाषा” पाहा.
[६ पानांवरील रेखाचित्र]
हे करून पाहा
१ निवडलेला ऑडिओ ट्रॅक (तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास) प्ले करण्यासाठी ▸ यावर किंवा ते प्रकाशन डाऊनलोड करण्यासाठी “डाऊनलोड पर्याय” बटनवर क्लिक करा.
२ दुसऱ्या भाषेत पेज पाहण्यासाठी “भाषा निवडा” या यादीतून हवी असलेली भाषा निवडा.
३ पुढचा लेख किंवा अध्याय वाचण्यासाठी “पुढचा लेख” किंवा “अनुक्रमणिका” यातील एखाद्या लिंकवर क्लिक करा.