डिसेंबर ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
३१ डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ४ परि. १-६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: मलाखी १-४ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: “टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन सदर.” भाषण. पृष्ठ ८ वर दिलेल्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून, जानेवारीच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण नियतकालिकाचा उपयोग कसा करू शकतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. लूक १०:३८-४२ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
१० मि: जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची साहित्य सादरता. चर्चा. क्षेत्रात सादर केल्या जाणाऱ्या साहित्याची वैशिष्ट्ये सांगा आणि दोन प्रात्यक्षिके दाखवा.
गीत ५५ आणि प्रार्थना