आपली अधिकृत वेबसाईट —सेवाकार्यात वापरण्यासाठी
लोकांना आपली वेबसाईट वापरण्याचे प्रोत्साहन द्या: काही लोक आपल्याशी बोलण्यास किंवा आपले साहित्य स्वीकारण्यास कचरतील; पण, आपल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याविषयी माहिती वाचण्यास त्यांची काही हरकत नसेल. तेव्हा, संधी मिळेल तेथे या वेबसाईटविषयी लोकांना सांगा.
प्रश्नांची उत्तरे द्या: काही वेळा एखादा घरमालक, आस्थेवाईक व्यक्ती किंवा परिचित व्यक्ती आपल्या संघटनेविषयी अथवा आपल्या धार्मिक विश्वासांविषयी आपल्याला प्रश्न विचारू शकते. अशा व्यक्तीला तिथल्या तिथे आपल्या मोबाईल फोनवरून किंवा त्याच्या कम्प्युटरवरून त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्या. उल्लेखित शास्त्रवचने थेट बायबलमधून वाचणे केव्हाही चांगले आहे. तुमच्या मोबाईलवर इंटरनेटचे कनेक्शन नसेल तर jw.org वेबसाईटचा उपयोग करून ती व्यक्ती स्वतः त्या प्रश्नाचे उत्तर कसे मिळवू शकते ते तिला स्पष्ट करून सांगा.—“Bible Teachings/Bible Questions Answered” किंवा “आमच्याविषयी/सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे” पाहा.
ओळखीच्या व्यक्तीला एखादा लेख किंवा प्रकाशन पाठवा: डाऊनलोड केलेली PDF किंवा EPUB फाईल ई-मेलला अटॅच करा. किंवा एखाद्या प्रकाशनाचे ऑडिओ व्हर्शन सीडीवर डाऊनलोड करा. बाप्तिस्मा न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही इंटरनेटद्वारे संपूर्ण पुस्तक, माहितीपत्रक किंवा नियतकालिक पाठवता तेव्हा आपल्या क्षेत्र सेवा अहवालात तुम्ही ते गणू शकता. आपले साहित्य कोणालाही निनावी किंवा मोठ्या प्रमाणात पाठवू नये. तसेच, इतर इंटरनेट वेबसाईटवरसुद्धा ते डाऊनलोड करू नये.—“प्रकाशने” पाहा.
यहोवाच्या साक्षीदारांविषयीच्या नवीन बातम्या: यामुळे तुमच्या बायबल विद्यार्थ्यांची आणि इतरांची आपल्या जगव्याप्त कार्याच्या विस्ताराबद्दल व ख्रिस्ती ऐक्याबद्दल कदर वाढेल. (स्तो. १३३:१)—“News” पाहा.
[५ पानांवरील रेखाचित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
हे करून पाहा
१ तुम्हाला जे साहित्य डाऊनलोड करायचे आहे ते “प्रकाशने” या टॅबखाली शोधा आणि हव्या असलेल्या टेक्स्ट किंवा ऑडिओ फॉरमॅट बटनवर क्लिक करा.
२ लेखांची यादी डिसप्ले करण्यासाठी MP३ बटनवर क्लिक करा. लेख डाऊनलोड करण्यासाठी लेखाच्या शीर्षकावर क्लिक करा किंवा ऑनलाईन ऐकण्यासाठी या खुणेवर ▸ क्लिक करा.
३ दुसऱ्या भाषेत एखादे प्रकाशन डाऊनलोड करायचे असल्यास या यादीतून ती भाषा निवडा.