सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगा
१. परिणामकारक सुवार्तिक कोणत्या अर्थाने निपुण कारागिरांसारखे असतात?
१ एका निपुण कारागिराजवळ बरीच हत्यारे असतात आणि त्यांपैकी प्रत्येकाचा केव्हा व कसा वापर करायचा हे त्याला नक्की माहीत असते. त्याच प्रकारे, सुवार्तिक या नात्याने आपले कार्य यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी आपल्याजवळही अनेक साधने आहेत. उदाहरणार्थ, सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर माहितीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत. (१ करिंथ. ९:२२) सोबत दिलेल्या पुरवणीत यांपैकी काही माहितीपत्रकांची यादी दिली असून प्रत्येक माहितीपत्रक खासकरून कोणत्या प्रकारच्या लोकांना मनात ठेवून तयार करण्यात आले होते हे स्पष्ट केले आहे. तसेच, ही माहितीपत्रके सादर करण्याच्या काही पद्धतीदेखील सुचवल्या आहेत.
२. आपण सेवाकार्यात माहितीपत्रकांचा वापर केव्हा करू शकतो?
२ माहितीपत्रके वापरण्याचे प्रसंग: एखादे हत्यार वापरल्याने फायदा होईल असे कारागिराला जेव्हा जेव्हा वाटते, तेव्हा तेव्हा तो त्या हत्याराचा हमखास वापर करतो. त्याच प्रकारे, विशिष्ट माहितीपत्रकाचे एखाद्या महिन्यात खास सादरीकरण असते तेव्हाच नव्हे, तर जेव्हाही एखाद्या व्यक्तीला त्या माहितीपत्रकाचा फायदा होईल असे आपल्याला वाटते, तेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या महिन्याच्या साहित्य सादरीकरणात बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करण्याचे सुचवले असेल. पण, कदाचित आपल्या क्षेत्रात बहुतेक लोक ख्रिस्ती नसतील आणि त्यांना बायबलविषयी फारशी आस्था नसेल. अशा वेळी, सुरुवातीला एखादे सुयोग्य माहितीपत्रक देणे आणि मग घरमालकाची आस्था पुरेशी वाढवल्यानंतर बायबल काय शिकवते हे पुस्तक त्याला दाखवणे जास्त परिणामकारक ठरेल.
३. साक्षकार्यातील आपली साधने निपुणतेने वापरण्यास आपण प्रयत्नशील का असले पाहिजे?
३ जे आपले काम कुशलतेने करतात, त्यांची बायबलमध्ये प्रशंसा करण्यात आली आहे. (नीति. २२:२९) आजच्या काळात, कोणतेही काम सुवार्तेच्या प्रचारापेक्षा जास्त महत्त्वाचे असू शकत नाही. (रोम. १५:१६) तर मग, “लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला . . . कामकरी” बनण्यासाठी आपण आपल्याजवळ असलेल्या साधनांचा निपुणतेने वापर करायचा प्रयत्न करू या.—२ तीम. २:१५.