आपल्या राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी माहितीपत्रके सादर करा
१ पवित्र शास्त्राच्या भविष्यवादाची पूर्णता होत असलेली पाहून आम्हाला आमच्या राज्य आशेमध्ये आनंद वाटतो, या कारणास्तव जे ऐकतील अशांसोबत त्याजविषयी बोलणी करण्याची आम्हाला चालना मिळते. (लूक ६:४५; रोमकर १२:२) ऑगस्टमध्ये क्षेत्र कार्यात माहितीपत्रके सादर करणे हा, येशूने दिलेल्या आज्ञेनुसार राज्याच्या आशेची सहभागिता इतरांमध्ये करण्याचा एक मार्ग आहे.—मत्तय २४:१४.
२ आपल्याला निवडण्याजोगी कित्येक रंगीत व माहितीयुक्त माहितीपत्रके असल्यामुळे, आमच्या क्षेत्रातील लोकांच्या गरजांना अनुरुप असणाऱ्या व त्यांची आस्था प्रज्वलित करणाऱ्या कोणत्या माहितीपत्रकांची निवड सर्वोत्तम ठरू शकेल? माहितीपत्रकांचा शक्यतो चांगला उपयोग करण्यासाठी आम्हाला त्यातील विषयांची माहिती असली पाहिजे. याबाबतीत पुढील त्रोटक उजळणी आम्हाला उपयुक्त ठरू शकेल.
३ आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? ऑगस्टमध्ये शक्य आहे तेथे आम्ही हे माहितीपत्रक वापरण्याचा विचार ठेवू. ते हिंदू पार्श्वभूमि असणाऱ्यांना लक्षात ठेवून तयार करण्यात आले असल्यामुळे आमच्या क्षेत्रकार्यात खूपच उपयुक्त आहे. पवित्र शास्त्रीय संदेशासोबत अपरिचित असणाऱ्यांना ते अगदी साध्या पद्धतीने देवाच्या वचनातील काही मूलभूत शिक्षण प्रस्तुत करते आणि ती अद्भूत राज्य आशा मिळवण्यासाठी त्यांना आणखी अभ्यास करण्याचे प्रोत्साहन देते.
४ नंदनवन आणविणारे सरकार: येशू पृथ्वीवर असताना देवाचे राज्य हे त्याच्या प्रचाराचा विषय होते. ते राज्य खरे सरकार असून, आजच्या काळात जीवन अत्यंत कठीण करणाऱ्या समस्या ते कसे सोडवील हे ते माहितीपत्रक दाखवते.
५ भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! हे माहितीपत्रक देवाने मानवास का निर्माण केले आणि आम्हाला या पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन कसे उपभोगता येईल ते दाखवते. माहितीपत्रकातील मोठी वर्णनात्मक चित्रे आणि मोजका मजकूर युवकांना तसेच बेताचे शिक्षण घेतलेल्यांना अपीलकारक आहे. याशिवाय कमी ऐकू येणाऱ्यांना यातील पवित्र शास्त्रीय शिक्षणाची स्पष्टता करण्यासाठी हे माहितीपत्रक वापरता येईल.
६ द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्यूअर फॉरएव्हर: हे माहितीपत्रक देवाच्या नावाची चर्चा शास्त्रवचनीय तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या आधारावर करते; आणि ख्रिश्चनांनी हे नाव का जाणून घेतले पाहिजे व त्याचा आपल्या उपासनेत का उपयोग केला पाहिजे हे दाखवते.
७ “पाहा! मी सर्व नवे करतो”: हे माहितीपत्रक नंदनवनाचे वर्णन देते व पवित्र शास्त्र आणि आमच्या निर्मात्याबद्दलची कदर वाढवते. देवाने दुष्टाईला का मुभा दिली याची चर्चा केल्यावर ते खंडणी, पुनरुत्थान व राज्य या तीन मूलभूत पवित्र शास्त्रीय शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. यात प्रत्येक पानावर खाली प्रश्न आहेत, त्यामुळे याद्वारे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करुन तो चालविण्यास सोपे जाते.
८ तुम्ही त्रैक्य मानावे का? आपला त्रैक्यावर विश्वास आहे असे लोक म्हणतील पण त्याच्या समजूतीत त्यांजमध्ये तफावत असेल. या कारणामुळे हे माहितीपत्रक या प्रश्नांची उत्तरे देतेः त्रैक्य काय आहे? पवित्र शास्त्र त्याची शिकवण देते का? येशू ख्रिस्त हा सर्वसमर्थ देव असून त्रैक्याचा भाग आहे का? पवित्र आत्मा काय आहे?
९ आपण ज्याचा वापर करणार आहोत ते माहितीपत्रक एकदा निवडल्यावर आम्ही आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या मागील पानांवर असलेल्या लेखांची उजळणी करावी. येथे आम्हाला आमची प्रकाशने सादर करण्यासंबंधाने आणि पुनर्भेटी घेऊन, आस्था अधिक वाढवून पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करता येईल त्याबद्दलचे प्रस्ताव आढळतील.
१० बहुतेकदा, उत्तम साक्ष देण्यासाठी एखादे विशिष्ट माहितीपत्रक पुरेसे असू शकेल. तथापि, आपली तयारी असली पाहिजे, माहितीपत्रकाचा पुरेसा साठा स्वतःपाशी राखला पाहिजे, त्यात काय माहिती आहे ते माहीत असले पाहिजे आणि शोधक वृत्ती ठेवली पाहिजे. आमच्या आवेशी सेवकपणावरील यहोवाचा आशीर्वाद अधिक लोकांना आम्हासोबत राज्य आशेमध्ये आनंद करण्यासाठी परिणामित होवो!—प्रे. कृत्ये १३:४७, ४८.