माहितीपत्रके —सेवेसाठी उपयुक्त साधने
१ एक कुशल कारागीर बहुधा विविध साधने सोबत घेतो. प्रत्येक साधन एखाद्या विशिष्ट कामासाठी बनवलेले असते. राज्य घोषक या नात्याने, आम्ही ज्यांना प्रचार करतो त्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा कुशलतेने भागवण्यास मदत करण्यासाठी आमच्याजवळ माहितीपत्रकांची विविधता आहे. (नीती. २२:२९) एका दरवाज्यावर तुम्ही कदाचित एखाद्या निराशीत व्यक्तीला भेटू शकाल. दुसऱ्या दरवाज्यावर घरमालक प्रामाणिक सरकारची वाट पाहात असतो तर, आणखी दुसरा, जगण्याचा काही उद्देश आहे का, याबद्दल विचार करत असतो. या लोकांची मदत करण्यासाठी आम्ही माहितीपत्रकांचा उपयोग कसा करू शकतो बरे? आपल्या समस्या हे माहितीपत्रक कसे सादर करावे यावरील काही सूचनांसाठी जुलै १९९३ ची आमची राज्य वा, पृ. ४ व ऑगस्ट १९९२, पृ. १, ४ पाहा.
२ “देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक सादर करताना, तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
▪“जगातील पीडा व अन्याय पाहणारे लोक, या सर्व गोष्टींचा दोष देवावर घालतात. ते असा वाद मांडतात की, देव सर्वशक्तीमान असल्यामुळे तो खरोखर आपली काळजी घेत असला तरच तो आपल्या पीडांचा अंत करील. तुम्हाला त्याविषयी काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] स्तोत्र ७२:१२-१४ दाखवते की, देव निश्चितच आपली काळजी वाहतो. पीडा व अन्याय यामध्ये त्याचा दोष नाही. दुर्जनांना लवकरच काढून टाकले जाईल असे अभिवचन त्याने दिले आहे. तो काय करील व आपण लाभ कसा मिळवू शकतो याबद्दल, देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक दाखवते.” तुम्ही कदाचित पृष्ठ २७, परिच्छेद २२ वरील विवेचनांसह चर्चा चालू ठेवू शकता.
३ तुम्ही “जीवनाचा उद्देश” या माहितीपत्रकाचा उपयोग करत असाल तर तुम्ही कदाचित अशाप्रकारे सुरवात करू शकता:
▪“बहुतेक सर्वजण, कधी ना कधी, जीवनाच्या उद्देशाबद्दल विचार करतात. तो, केवळ ७० किंवा ८० वर्ष जगणे व नंतर मरणे हाच आहे का? की जीवनात आणखी पुष्कळसे आहे? तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] येथे स्तोत्र ३७:२९ मध्ये आपण देवाचा, मनुष्यासाठी आणि पृथ्वीसाठी असलेला उद्देश पाहतो.” शास्त्रवचन वाचल्यावर, पृष्ठ ३१ वरील चित्राकडे वळा. नंदनवनात जगणे हे कशासारखे असेल त्याबद्दल अधिक विवेचन द्या.
४ “पहा!” या माहितीपत्रकाचा परिचय, मुखपृष्ठावरील संपूर्ण चित्र दाखवून व असे विचारून केला जाऊ शकतो:
▪“पृथ्वी अशी दिसण्यासाठी कशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते? [विवेचनासाठी वाव द्या.] या चित्रातील सर्वांकडे एक घर व आनंददायक काम आहे. येथे शांती व खाण्यास मुबलक आहे आणि पृथ्वी प्रदूषणरहित आहे. आटोकाट प्रयत्न केला तरी, मानवी सरकारांना असे जग आणणे अशक्य वाटते. तथापि, पवित्र शास्त्र आम्हाला अभिवचन देते की, देव ‘सर्व गोष्टी नव्या करील.’ [पृष्ठ ३० उघडा आणि प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] त्या नव्या जगात राहण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे याविषयी हे माहितीपत्रक मदत करील.” पुरेशी आस्था प्रदर्शित केल्यास, पृष्ठ ३ उघडा आणि आम्ही पवित्र शास्त्राभ्यास कसा चालवतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
५ तुम्ही कदाचित “भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा,” या माहितीपत्रकासाठी हा प्रस्ताव वापरू शकता:
▪“पुष्कळ लोकांना वाटते की सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटण्यासाठी त्यांना स्वर्गात जावे लागेल. परंतु पृथ्वीवर चिरकाल जगण्याबद्दल तुम्ही काय विचार कराल? [प्रतिसादासाठी वाव द्या.] अनंतकालिक जीवन शक्य आहे याची हमी पवित्र शास्त्र आम्हास देते. ते ध्येय आम्ही कसे गाठू शकतो याबद्दल ते आम्हाला सांगते.” योहान १७:३ वाचा. त्यानंतर घरमालकाला चित्र ४९ दाखवा, आणि विचारा: “अशा एका जगात राहण्यास तुम्हाला कसे वाटेल?” माहितीपत्रक सादर करा, आणि पुनर्भेटीची योजना करा.
६ माहितीपत्रके समयोचित लेखांना सादर करतात, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे पुरवितात, व सांत्वन देतात. या साधनांचा कुशलतेने उपयोग करून, आपण प्रामाणिक जणांना “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत” पोहंचण्यास मदत करू शकतो.—१ तीम. २:४.