वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/११ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे
    आमची राज्य सेवा—२०१४
  • कृपया लवकर भेट द्या
    आमची राज्य सेवा—२००३
  • प्रश्‍न पेटी
    आपली राज्य सेवा—२०१५
  • शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ११/११ पृ. २

प्रश्‍न पेटी

◼ कूपन आणि इंटरनेटवरील विनंती अर्ज कोणी भरावेत?

आपल्या प्रकाशनांमध्ये बहुतेकदा, प्रकाशनाची किंवा यहोवाच्या साक्षीदारांनी येऊन भेटण्याची विनंती करणारे कूपन दिलेले असते जे भरून शाखा कार्यालयाला पाठवायचे असते. तसेच, www.watchtower.org या आपल्या अधिकृत वेबसाईटवरूनही बायबल अभ्यासाची मागणी केली जाऊ शकते. या योजनांमुळे अधिकाधिक लोकांना सत्य शिकणे शक्य होत आहे. पण, जेव्हा प्रचारक हे कूपन, आपल्या नातेवाईकांना किंवा इतरांना प्रकाशने पाठवण्यासाठी अथवा बायबल अभ्यासाची विनंती करण्यासाठी भरून पाठवतात तेव्हा मात्र समस्या निर्माण होत आहेत.

ज्या नातेवाईकांना, त्यांनी विनंती न केलेली प्रकाशने शाखा कार्यालयातून मिळाली आहेत त्यांनी अशी तक्रार केली आहे, की आपली संस्था त्यांना त्रास देत आहे व इतर संस्थांप्रमाणेच प्रकाशने अथवा जाहिराती विनाकारण पाठवत आहे. शिवाय, प्रचारक जेव्हा, कोणी आपल्याला भेट द्यावी अशा स्वतः विनंती न केलेल्या लोकांना भेटतात तेव्हा या व्यक्‍तींनी नाराजी व्यक्‍त केली व त्यामुळे प्रचारकांनाही संकोचल्यासारखे वाटले आहे. त्यामुळे, आवड दाखवणाऱ्‍या लोकांनी स्वतः आपल्या अधिकृत वेबसाईटवरील विनंती अर्ज किंवा कूपन भरावेत. आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना प्रकाशने मिळावीत म्हणून किंवा त्यांच्याकडे कोणीतरी जाऊन भेट द्यावी म्हणून प्रचारकांनी इंटरनेटवरील हे अर्ज किंवा कूपन भरू नयेत. एखाद्या व्यक्‍तीशी संपर्क साधावा म्हणून कोणा प्रचारकाने जर कूपन भरून पाठवल्याचे शाखा कार्यालयाच्या लक्षात आले तर ही विनंती मान्य केली जाणार नाही.

मग आपण आपल्या नातेवाईकाला किंवा मित्राला आध्यात्मिक मदत कशी देऊ शकतो? त्याला प्रकाशने मिळाली पाहिजेत, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः त्याला ते पोस्टाने बक्षीस म्हणून पाठवू शकता. त्याला जर आणखी माहीत करून घेण्याची इच्छा असेल व साक्षीदारांनी आपल्या घरी यावे, असे त्याने तुम्हाला बोलून दाखवले असेल पण तो राहत असलेल्या ठिकाणातील स्थानीय मंडळीच्या वडिलांशी संपर्क कसा साधायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर, तुम्ही प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म भरावा आणि तो तुमच्या मंडळीच्या सचिवांना द्यावा. मग तुमच्या मंडळीचे सचिव तो फॉर्म पडताळून पाहतील आणि शाखा कार्यालयाला पाठवून देतील. पण, आवड दाखवणारी व्यक्‍ती बंदिस्त असेल, जसे की तुरुंगात किंवा एखाद्या व्यसनमुक्‍ती केंद्रात असेल तर तिच्या वतीने तुम्ही शाखा कार्यालयाशी संपर्क साधू नये. त्याऐवजी, त्यांना तेथे जाऊन भेट देणाऱ्‍या बांधवांशी संपर्क साधण्याचे किंवा स्वतः शाखा कार्यालयाला पत्र पाठवण्याचे उत्तेजन तुम्ही तिला देऊ शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा