वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१५ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!
    आमची राज्य सेवा—१९९९
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०११
  • इंटरनेट सावध का असावे?
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेटचे विनियोग आणि साधने
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ७/१५ पृ. २

प्रश्‍न पेटी

◼ दुसऱ्‍या देशात राहणाऱ्‍या लोकांना साक्ष देण्यासाठी किंवा त्यांचा बायबल अभ्यास घेण्यासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करू शकतो का?

आपल्या कामावर बंदी असलेल्या किंवा कमी प्रचारक असलेल्या देशांत राहणाऱ्‍या लोकांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यासाठी काही प्रचारक इंटरनेटचा उपयोग करतात. काही वेळा याचे चांगले तर काही वेळा वाईट परिणामही झाले आहेत. काही प्रचारक जेव्हा अनोळखी लोकांना ई-मेल्स पाठवतात किंवा त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात तेव्हा ते धोक्यात येऊ शकतात. (आपली राज्य सेवा जुलै २००७, पृ. ७ पाहा.) या प्रचारकांचा हेतू, लोकांना राज्याचा संदेश सांगणे हाच असला तरी, अशा प्रकारे अनोळखी लोकांबरोबर संपर्क ठेवल्यानं ते कदाचित न कळत वाईट लोकांच्या तसंच धर्मत्यागी लोकांच्या संपर्कात येतील. (१ करिंथ. १:१९-२५; कलस्सै. २:८) शिवाय, आपल्या प्रचार कार्यावर बंदी असलेल्या देशात, तिथले अधिकारी ई-मेल्स, मेसेजेस, पत्रं यांवर लक्ष ठेवत असतील. अशा संपर्कांमुळं तिथं असलेल्या आपल्या बंधुभगिनींसाठी धोका ठरू शकतो. म्हणून, प्रचारकांनी इंटरनेटद्वारे दुसऱ्‍या देशात राहणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी मुद्दामहून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नये.

दुसऱ्‍या देशातील एखाद्या व्यक्‍तीला आपण जर अनौपचारिक साक्ष दिली असेल आणि ती परत तिच्या देशी गेली तर, आपलं शाखा कार्यालय सांगत नाही तोपर्यंत आपण इंटरनेटद्वारे तिची आवड वाढवण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी आपण तिला, jw.org या आपल्या संस्थेच्या वेबसाईटबद्दल सांगू शकतो. मग ती वेबसाईटवरून अधिक माहिती मिळवू शकेल किंवा मग तिच्या देशातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधेल. आपण या व्यक्‍तीला तिच्या घराजवळ असलेल्या राज्य सभागृहात जाण्याचं उत्तेजन देऊ शकतो. पण काही देशात राज्य सभागृह नसतात. अशा वेळी जर या व्यक्‍तीला साक्षीदारांना भेटण्याची इच्छा असेल तर आपण प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म भरून तो आपल्या मंडळीच्या सचिवाला देऊ शकतो. सचिव मग तो jw.org वरून इच्छित स्थळी फॉर्वड करतील. आवड दाखवणारी व्यक्‍ती राहत असलेल्या देशांतील शाखा कार्यालयाला तिथली परिस्थिती माहीत आहे. त्यामुळं, या व्यक्‍तीला पुढील आध्यात्मिक मदत कशी द्यायची ते कार्यालयाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.—आपली राज्य सेवा नोव्हेंबर २०११, पृ. २ पाहा.

आपण भेट घेत असलेली व्यक्‍ती दुसऱ्‍या देशात राहायला गेली असेल किंवा इंटरनेटवरून ओळख झालेल्या दुसऱ्‍या देशातील एखाद्या व्यक्‍तीबरोबर आता आपण बायबलचा अभ्यास करत असू तर वर सांगितलेल्या सूचनांचं आपण पालन करावं. या व्यक्‍तीला जोपर्यंत कोणी साक्षीदार येऊन भेटत नाही तोपर्यंत आपण तिला बायबलमधील माहिती सांगून तिची आवड वाढवत राहण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ही व्यक्‍ती जर, आपल्या कामावर बंदी असलेल्या देशात राहत असेल तर पत्रांद्वारे, टेलिफोनद्वारे किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे तिच्याबरोबर बायबल विषयांची चर्चा करताना आपण खबरदारी घ्यावी.—मत्त. १०:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा