नोव्हेंबर २८ च्या सप्ताहाचा आराखडा
२८ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५४, ५५ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गीतरत्न १-८ (१० मि.)
क्र. १: गीतरत्न १:१-१७ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: तुमचे कुटुंब जगाला जिंकू शकते—कुटुंब पृष्ठे १०१, १०२ परि. २६, २७ (५ मि.)
क्र. ३: आपण इतरांचा आदर कसा कमवू शकतो? (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: घोषणा. पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो ते दाखवा. सर्वांना भाग घेण्याचे प्रोत्साहन द्या.
१५ मि: “उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण.” प्रश्न व उत्तरे. बायबल शिक्षकाने दाखवलेल्या प्रेमामुळे त्यांना सत्यात प्रगती कशी करता आली, ते श्रोत्यांना विचारा.
१० मि: डिसेंबर महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. स्थानिक क्षेत्रातील लोकांना आवडतील अशा काही लेखांवर एक-दोन मिनिटांत चर्चा करा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्यावर एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १८ आणि प्रार्थना