नमुना सादरीकरण
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“आपल्यापैकी सर्वांनाच कुटुंबातील सदस्यांच्या किंवा मित्रांच्या मृत्यूचा दुःखद अनुभव आला असेल. आपण त्यांना पुन्हा कधी पाहू शकतो का? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत पवित्र शास्त्रातून एक दिलासादायक विचार तुम्हाला दाखवला तर चालेल का?” जर घरमालकाने आवड दाखवली तर ऑक्टोबर - डिसेंबर टेहळणी बुरूज पृष्ठ २० वरील पहिल्या पोटमथळ्यातील माहिती आणि तेथे उद्धृत केलेल्या वचनांपैकी एक वचन वाचा व चर्चा करा. घरमालकाला नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“घरात लहान मूल आलं की घर अगदी आनंदानं भरून जातं. पण या लहान बाळाबरोबर येणाऱ्या आव्हानांना पालक कसे सामोरे जाऊ शकतात? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत मदत करू शकेल असे एक शास्त्रवचनातील तत्त्व मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर १ करिंथकर १३:४, ५ वाचा.] अशा बदललेल्या परिस्थितीत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास ‘नव्यानेच पालक बनलेल्यांची आव्हाने’ या लेखात काही व्यावहारिक मार्गदर्शनाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.”