वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१२ पृ. ४
  • नमुना सादरीकरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणे
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१४
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ६/१२ पृ. ४

नमुना सादरीकरणे

जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता

“हल्ली आपल्या प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे आज अनेक कुटुंबं तणावाखाली जगत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, आपल्याला जर आपलं कौटुंबिक जीवन आनंदी बनवायचं असेल तर कोण आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊ शकतं?” घरमालकाचे उत्तर ऐका. घरमालक आणखी चर्चा करण्यास तयार असेल तर त्याला जुलै – सप्टेंबरचे टेहळणी बुरूज द्या, आणि पृष्ठे १४ आणि १५ वरील कोणत्याही मथळ्याखाली दिलेल्या माहितीची आणि उल्लेख केलेल्या निदान एका शास्त्रवचनाची तरी घरमालकाबरोबर चर्चा करा. घरमालकाला हे नियतकालिक वाचायला आवडेल का हे विचारा आणि त्यातील इतर प्रश्‍नांची चर्चा करण्यासाठी त्याची पुनर्भेट घेण्याची योजना करा.

टेहळणी जुलै - सप्टेंबर

“आजकाल आपण जगाच्या अंताविषयी किंवा ‘आर्मगेडनविषयी’ खूप काही ऐकत आहोत. तुम्हाला काय वाटतं, मानव या जगाचा अंत रोखू शकतो का? [उत्तर ऐकून घ्या.] ‘आर्मगेडन’ हा शब्द नेमका कुठून आला हे तुम्हाला माहीतंय का? [घरमालक ऐकण्यास तयार असेल तर प्रकटीकरण १६:१६ वाचा. मग, घरमालकाला नियतकालिकाचे शीर्षक-लेख दाखवा.] या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला या मासिकात सापडतील.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा