नमुना सादरीकरण
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपण देवाला प्रार्थना केली तर तो आपली प्रार्थना ऐकतो असे बऱ्याच जणांना वाटते. पण काहींना वाटते की ‘जर देव आहे तर आपल्याला इतक्या समस्यांचा सामना का करावा लागतो?’ देव आपल्या प्रार्थना ऐकतो का? [उत्तरासाठी थांबा.] आपल्या प्रार्थना ऐकणारा कोणीतरी नक्कीच आहे असे आश्वासन देणारे एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालकाची हरकत नसल्यास स्तोत्र ६५:२ वाचा.] बरेच जण या गोष्टीशी सहमत आहेत. या नियतकालिकात तुम्हाला पुढील प्रश्नाचे उत्तर मिळेल: ‘प्रार्थना ऐकणारा देव आपले दुःख नाहीसे का करत नाही?’”