घोषणा
◼ साहित्य सादरीकरण ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? हे माहितीपत्रक देण्याव्यतिरिक्त किंवा त्याऐवजी तुम्ही तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले व क्षेत्रातील लोकांना आवडेल अशा विषयाचे कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक देऊ शकता. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक देऊ शकता. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात.