कोणते पर्याय निवडायचे तुम्हाला माहीत आहे का?
जगभरातील अनेक वैद्यकीय केंद्रात आजकाल रक्ताविना शस्त्रक्रिया केल्या जातात. रक्ताविना केल्या जाणाऱ्या उपचाराचे कोणकोणते वैद्यकीय पर्याय उपलब्ध आहेत याविषयीची तुम्हाला सविस्तर माहिती आहे का? तुम्हाला ती माहीत असेल, तरच तुम्हाला रक्ताविना केले जाणारे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया नीट समजतील व त्यानुसार तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नो ब्लड—मेडिसीन मीट्स द चॅलेंज हा व्हिडिओ पाहा. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी, या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात उल्लेखण्यात आलेल्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील माहिती वाचून काढावी. नंतर, खाली दिलेल्या प्रश्नांच्या साहाय्याने, व्हिडिओत पाहिलेल्या माहितीवर प्रार्थनापूर्वक मनन करा.—सूचना: या व्हिडिओत शस्त्रक्रियेची काही संक्षिप्त दृश्ये आहेत. तेव्हा, हा व्हिडिओ आपल्या लहान मुलांना दाखवायचा की नाही, हे पालकांनी ठरवावे.
(१) यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण स्वीकारत नाहीत यामागचे सर्वात प्रमुख कारण कोणते? (२) वैद्यकीय औषधोपचारांच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांची काय इच्छा आहे? (३) रुग्णांना कोणता मूलभूत अधिकार आहे? (४) रक्तातील अंश म्हणजे काय? (५) काही ख्रिस्ती बंधूभगिनी, (क) रक्तातून काढलेले अल्प अंश का स्वीकारतात? (ख) रक्तातून काढलेले कोणतेच अंश का नाकारतात? (६) रक्तदान करणे, रक्त साठवून ठेवून नंतर त्याचा उपयोग करणे, याबद्दल ख्रिश्चनांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? (७) रक्तासंबंधी काही वैद्यकिय प्रक्रिया कोणत्या आहेत? वर्णन करा. (८) रक्तासंबंधी असलेल्या वैद्यकिय प्रक्रिया स्वीकारण्याच्या बाबतीत, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची कोणती गंभीर जबाबदारी आहे? (९) संक्रमणाऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पर्यायांसंबंधी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे? (१०) गंभीर स्वरूपाच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रक्त संक्रमणाशिवाय करणे शक्य आहे का?
या व्हिडिओपटात दाखवलेले काही उपचार स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा बायबलनुसार प्रशिक्षित केलेल्या विवेकावर अवलंबून असलेला प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. संक्रमणाऐवजी वापरले जाणारे कोणते उपचार व पद्धती तुम्ही स्वतःकरता व आपल्या मुलांकरता स्वीकाराल हे ठरवून तुम्ही ॲडव्हान्स हेल्थ केअर डिरेक्टिव कार्ड भरले आहे का? याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर, १५ जून २००४ आणि १५ ऑक्टोबर २००० च्या टेहळणी बुरूज अंकांतील “वाचकांचे प्रश्न” या लेखांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतर, तुम्ही कोणते पर्याय स्वीकाराल अथवा नाकाराल हे ठरवण्याकरता, आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ यातील, “रक्ताचे अंश आणि माझ्याच रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?” या पुरवणीत दिलेल्या प्रश्नावलींचा उपयोग करा. यानंतरच मग ॲडव्हान्स हेल्थ केअर डिरेक्टिव कार्डावर तुमच्या निवडी अचूकपणे लिहा. तातडीच्या प्रसंगी संपर्क साधण्याकरता तुम्ही ज्यांचा पत्ता किंवा फोन नंबर दिला आहे त्यांना, व तुमच्या कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांना, तुम्ही घेतलेल्या निर्णयांविषयी व त्यांमागील कारणांविषयी स्पष्टपणे सांगितले पाहिजे.