जानेवारी २४ च्या सप्ताहाचा आराखडा
२४ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ५३ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
br1-MRa पृ. २३-२४, परि. १-८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: एज्रा ६-१० (१० मि.)
क्र. १: एज्रा ७:१-१७ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: राजा म्हणून राज्य करण्यास आपण पात्र आहोत हे येशूने कसे दाखवून दिले? (५ मि.)
क्र. ३: प्रथम स्वतःला जाणून घ्या—fy पृ. १६-१८ परि. ७-१० (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. फेब्रुवारी महिन्यात आपण कोणते प्रकाशन सादर करणार आहोत ते सांगा आणि एका सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: “आपल्या कुटुंबांना मदत करा.”—भाग १. (परिच्छेद १-६ आणि पृष्ठ ६ वरील चौकोन.) प्रश्न व उत्तरे. आपल्या पुढील कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी, पृष्ठ ६ वरील चौकोनातील काही सूचनांचा अवलंब करण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या. पुढच्या आठवडी जेव्हा उरलेल्या लेखावर चर्चा केली जाईल तेव्हा त्यांना, सूचनांचा अवलंब केल्यामुळे कोणते फायदे झाले ते सांगता येऊ शकेल.
१० मि: फेब्रुवारी महिन्यात नियतकालिक सादर करण्याची तयारी. चर्चा. नियतकालिकातील लेखांची एक किंवा दोन मिनिटांत उजळणी करा. मग, दोन किंवा तीन लेख निवडून, सादरतेत वापरता येऊ शकतील असे प्रश्न व वचने सुचवण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. नियतकालिक कसे सादर करता येईल त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ३२ व प्रार्थना
[तळटीप]
a हे अभ्यास लेखांचे माहितीपत्रक आहे ज्यात, १ डिसेंबर व १५ डिसेंबर, २००७ च्या इंग्रजी टेहळणी बुरूजमधील अभ्यास लेख आहेत.