प्रत्येक प्रसंगी तिचा उपयोग करा
१. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ही पत्रिका काय करण्यास मदत करू शकते?
१ जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका आपल्याला बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत व्हावी म्हणून तयार करण्यात आली आहे. सत्याचे बी दूरदूरपर्यंत पेरण्यासाठी ही पत्रिका प्रभावी साधन ठरू शकते. (उप. ११:६) या पत्रिकेचा चांगला वापर करण्यासाठी पुढील काही सूचना आपली मदत करतील.
२. पहिल्या भेटीत या पत्रिकेचा आपण कसा उपयोग करू शकतो?
२ पहिल्या भेटीदरम्यान: घरमालकाच्या आवडीच्या एखाद्या विषयावर संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक गोष्टींबद्दल चर्चा करण्यास घरमालकाला आस्था आहे असे तुम्हाला वाटल्यास, त्याला ही पत्रिका दाखवा आणि पहिल्या पानावरील सहा प्रश्न दाखवून विचारा: “यांपैकी कोणता प्रश्न तुमच्या मनात नेहमी येतो?” घरमालकाचे उत्तर ऐकल्यानंतर, त्याने निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या पत्रिकेतून द्या आणि पत्रिकेत दिलेल्या वचनांपैकी एक वचन वाचून दाखवा. पत्रिकेच्या शेवटच्या पानावरची माहिती वाचून दाखवा किंवा त्याचा सारांश द्या. त्याने पत्रिका वाचायची तयारी दाखवल्यास पत्रिका त्याला द्या. या पत्रिकेमुळे सत्याचे बी त्याच्या हृदयात मूळ धरू शकते. (मत्त. १३:२३) घरमालकाला बायबलबद्दल खरोखर आदर आहे असे तुम्हाला दिसल्यास, तुम्ही पुन्हा भेट देता तेव्हा त्याला बायबल काय शिकवते? पुस्तक द्या.
३. आस्थेवाईक घरमालक कामात व्यस्त असेल, तर आपण काय करू शकतो?
३ आस्थेवाईक घरमालक कामात व्यस्त असेल तर: तुम्ही असे म्हणू शकता: “मला वाटतं की तुम्ही कामात व्यस्त आहात. ही बायबल पत्रिका तुमच्याकडे सोडून गेल्यास चालेल का? या पत्रिकेत सहा महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतात. या सहा प्रश्नांची उत्तरे बायबलमधून देण्यात आली आहेत. या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला पुन्हा भेटायला मला आवडेल.”
४. शाळासोबत्यांना किंवा सहकर्मचाऱ्यांना ही पत्रिका सादर करताना आपण काय म्हणू शकतो?
४ शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी: जेवणाच्या सुटीदरम्यान तुमच्या सोबत्याशी बोलताना तुम्ही असे म्हणू शकता: “तुम्ही कधी यांपैकी काही प्रश्न विचारले आहेत का? [उत्तरासाठी थांबा. तो ऐकण्यास तयार असेल तर चर्चा पुढे चालू ठेवा.] शास्त्रवचनांत सापडणारी साधी व समाधानकारक उत्तरे या पत्रिकेत दिलेली आहेत.” त्या व्यक्तीजवळ वेळ असेल, तर तुम्ही या पत्रिकेतील एका उत्तरावर चर्चा करू शकता आणि बायबल काय शिकवते? हे पुस्तकदेखील सादर करू शकता.
५. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ही पत्रिका कशामुळे प्रचार कार्यात एक प्रभावशाली साधन ठरते?
५ जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या पत्रिकेत, सत्य अगदी साध्या व सरळ शब्दांत मांडलेले आहे. सगळ्या धर्मांच्या व संस्कृतींच्या लोकांना ते आकर्षित करते. ही पत्रिका सादर करण्यास सोपी आहे; लहान मुले व नवीन प्रचारकही ती सादर करू शकतात. तुम्ही प्रत्येक उचित प्रसंगी या पत्रिकेचा उपयोग करता का?
६. घरमालकांना जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ही पत्रिका देण्याआधी नेहमीच त्यांची मनोवृत्ती जाणून घेणे का जरुरी आहे?
६ जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ही पत्रिका सादर करताना आपण नेहमी सावध असले पाहिजे, कारण पत्रिकेच्या शीर्षकामुळे विरोधक आपल्या हेतूंचा चुकीचा अर्थ लावू शकतात. आपल्या साहित्याचा स्वीकार करण्यासाठी आपण कोणालाही जबरदस्ती करत नाही. म्हणून, एखादा घरमालक कशी मनोवृत्ती दाखवतो ते आधी जाणून घेण्यास सतर्क असा आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची मनापासून इच्छा असलेल्यांनाच ही पत्रिका द्या.