वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०१ पृ. ३-४
  • अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रत्येक प्रसंगी तिचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१०
  • ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे
    आमची राज्य सेवा—२०००
  • बायबल अभ्यासाविषयी लोकांना सांगण्याचे भान ठेवा
    आमची राज्य सेवा—२०१०
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ११/०१ पृ. ३-४

अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!

१ राजेंद्रन एका लहानशा मंदिरात पूजारी होता. प्रत्येक हिंदू विधींच्या वेळी तो नियमितरीत्या पूजाअर्चा करायचा. त्याच्या चाळीत दर आठवडी बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी येणाऱ्‍या एका तरुण बांधवाला तो नेहमी पाहायचा. राजेंद्रनला माहीत करून घ्यायचे होते, की हा बांधव चाळीत का येत होता. मग, एका सामाजिक मेळाव्यात बांधव प्रत्यक्षात राजेंद्रनलाच भेटले. त्यांनी त्याला लागलीच बायबल अभ्यास सादर केला. राजेंद्रनला बायबल शिकायची इच्छा असल्यामुळे त्याने लगेच कृतज्ञतापूर्वक बांधवांची ही ऑफर स्वीकारली. या अनुभवावरून आपण काय शिकतो? मोफत गृह बायबल अभ्यास कोण स्वीकारेल, हे आपण सांगू शकत नाही.—उप. ११:६.

२ आवड व इच्छा असलेल्या कोणाबरोबरही आपण बायबलचा अभ्यास करण्यास तयार आहोत हे लोकांना सांगायला तुम्ही कचरता का? आपण ही मोफत सेवा देतो हे तुमच्या परिसरातील सर्व लोकांना माहीत आहे का? त्यांना माहीत असल्याची खात्री आपण कशी बाळगू शकतो? एका नवीन साधनाचा उपयोग करून! ही एक आकर्षक सहा पानी पत्रिका आहे जिचे शीर्षक तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? असे आहे. या पत्रिकेतील प्रत्येक मथळ्याची चर्चा करून त्यातील मजकुराशी आपण जरा परिचय करून घेऊ या.

३ “बायबल का वाचले पाहिजे?” पत्रिकेत दिलेली कारणे अतिशय प्रेरणादायक आहेत. त्यात बायबलमधील “देवाकडील प्रेमळ सूचना” आहेत; मदतीसाठी प्रार्थनेद्वारे देवाशी कसे बोलावे आणि सार्वकालिक जीवनाचे वरदान कसे मिळवावे हेही सांगितले आहे. (१ थेस्सलनी. २:१३) ‘प्रबोधन देणाऱ्‍या बायबलमधील विविध सत्यांचा’ या पत्रिकेत उल्लेख केला आहे; जसे की, मृत्यूनंतर आपले काय होते आणि पृथ्वीवर इतके दुःख का आहे. तसेच, ‘देवाने दिलेल्या बायबलमधील तत्त्वांविषयी’ त्यात सांगितले आहे ज्यांचा अवलंब केल्यावर शारीरिक लाभ मिळतात आणि आनंद, आशा यांसारखे इतर इष्ट गुण विकसित करायला मदत होते. पत्रिकेत बायबल वाचण्याकरता आणखी एक कारण दिले आहे—आपल्या निकटच्या भविष्यात काय होणार आहे यासंबंधीच्या भविष्यवाण्यांविषयी त्यांत सांगितले आहे.—प्रकटी. २१:३, ४.

४ “बायबल समजण्यास साहाय्य”: पत्रिकेत असे म्हटले आहे: “देवाचे वचन समजायला आपल्या सर्वांना मदतीची गरज आहे.” बायबलचा अभ्यास कसा केला पाहिजे याचे वर्णन ते पुढे देते: “बायबलच्या मूलभूत शिकवणींनी सुरवात करून टप्प्या-टप्प्याने अभ्यास केल्यास फायदा होतो.” “बायबलमधील माहिती भरवसा ठेवण्यालायक आहे,” असे पत्रिकेत सांगितले असले तरीसुद्धा अपेक्षा माहितीपत्रक विद्यार्थ्याला “विविध विषयांवर शास्त्रवचनांचा संदर्भ समजण्यास” मदत करील असा त्यात खास उल्लेख केला आहे. पुढील पोटमथळा प्रभावशाली प्रश्‍नाच्या रूपात दिला आहे.

५ “बायबल समजून घेण्यासाठी दर आठवडी तुम्ही वेळ काढणार का?” पत्रिकेत सांगितले आहे, की विद्यार्थ्याच्या सोयीच्या वेळी व ठिकाणी, स्वतःच्या घरी अथवा टेलिफोनवर देखील बायबल अभ्यासाची व्यवस्था केली जाऊ शकते. या चर्चेत कोणकोण भाग घेऊ शकतील? पत्रिका त्याबद्दल सांगते: “तुमचे सबंध कुटुंब यात सहभाग घेऊ शकते. तुम्ही तुमच्या मित्रांना बोलावल्यास तेही यात सहभाग घेऊ शकतात. किंवा, तुमची इच्छा असेल तर तुमच्या एकट्याबरोबरसुद्धा चर्चा केली जाऊ शकते.” हा अभ्यास किती वेळेचा असला पाहिजे? पत्रिका म्हणते: “पुष्कळ जण, आठवड्यातून एक तास आवर्जून बायबलचा अभ्यास करतात. तुम्ही यासाठी दर आठवडी तासाभरापेक्षा अधिक वेळ किंवा कमी वेळ जरी खर्च करू शकत असाल तरी साक्षीदार तुम्हाला मदत करायला सदैव तयार असतील.” हेच महत्त्वाचे आहे! प्रत्येक विद्यार्थ्याच्या परिस्थितीनुसार आपण बदल करण्यास तयार आहोत.

६ “शिकण्याचे निमंत्रण”: पत्रिका प्राप्त करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला एक कूपन मिळेल ज्यावर ती व्यक्‍ती अपेक्षा माहितीपत्रक मागवू शकेल किंवा मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमाविषयी अधिक माहिती मिळण्याकरता कोणाला तरी घरी पाठवावे अशी विनंती करू शकेल. या कूपनवर अपेक्षा माहितीपत्रकाचे रंगीत चित्र दिले आहे. तेव्हा, ही पत्रिका अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आपली मदत स्वीकारायला प्रवृत्त का करेल ते तुम्हाला समजले का? तेव्हा, या नवीन साधनाचा आपण सर्वात चांगल्याप्रकारे उपयोग कशाप्रकारे करू शकतो?

७ ही पत्रिका तुम्ही कोणाकोणाला देऊ शकाल? तुम्ही ही पत्रिका प्रत्यक्ष भेटणाऱ्‍या लोकांना देऊ शकाल किंवा घरी नसलेल्यांच्या दारातून आत सरकवू शकाल. घरोघर, रस्त्यावर आणि व्यापारी क्षेत्रात जाऊन तुम्ही या पत्रिकेचे वाटप करू शकाल. लोक आपली प्रकाशने स्वीकारतात किंवा नाकारतात तेव्हाही आपण त्यांना पत्रिका देऊ शकतो. तुम्ही जे प्रकाशन घरमालकाला देणार आहात त्या प्रकाशनाच्या आत ही पत्रिका घालून देऊ शकता. तुम्ही ज्यांच्याशी पत्रव्यवहार करता त्यांनाही पत्रातून पाठवू शकता. टेलिफोनवर तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधता त्यांच्या पत्त्यावर तुम्ही ती पाठवू शकता. या पत्रिकेच्या प्रती सतत जवळ बाळगा जेणेकरून तुम्ही, खरेदी करताना, सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना आणि अनौपचारिक साक्ष देताना त्या लोकांना देऊ शकाल. तुमच्या घरी येणाऱ्‍यांना तुम्ही या पत्रिका देऊ शकता. नातेवाईकांना, शेजाऱ्‍यांना, सहकर्मचाऱ्‍यांना, शाळासोबत्यांना आणि इतर परिचित लोकांना तुम्ही ही पत्रिका देऊ शकता. भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीच्या हातात ही पत्रिका देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर काय?

८ लगेच प्रतिसाद मिळाल्यास: काही लोक, तुम्ही त्यांच्या हातात पत्रिका दिल्यावर लगेच आम्हाला बायबल अभ्यास हवा आहे असे म्हणतील. यास्तव, क्षेत्र सेवेत तुम्ही जाता तेव्हा सोबत नेहमी अपेक्षा माहितीपत्रकाच्या दोन प्रती घेऊन जा—एक विद्यार्थ्यासाठी आणि एक तुमच्यासाठी. ती व्यक्‍ती इच्छुक असेल तर तेव्हाच अभ्यास सुरू करा. माहितीपत्रकातील पहिले पान उघडून “या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करावा” या मथळ्याखालील माहिती वाचा. मग लगेच पहिला अध्याय काढून अभ्यास कसा करता येतो ते दाखवा. आहे की नाही सोपे?

९ घरमालकाला विचार करायला थोडा वेळ हवा असेल तर: जादा वेळ जाऊ न देता होता होईल तितक्या लवकर संपर्क साधा. भेटायला जाताना सोबत अपेक्षा माहितीपत्रक न्यायला विसरू नका. माहितीपत्रकाच्या आतल्या पानावरील विषयसूची त्याला दाखवा. त्याच्या आवडीचा विषय त्याला निवडू द्या. आणि मग त्याने निवडलेला अध्याय काढून त्या विषयावर चर्चा करायला सुरवात करा.

१० मासिके दिलेल्या ठिकाणी जाणे: काही मासिके आणि पत्रिका एखाद्याला दिल्यावर तुम्ही पुन्हा त्यांच्या घरी जाऊन म्हणू शकता: “मी गेल्या वेळी तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा तुम्हाला मी टेहळणी बुरूज मासिक दिलं होतं. या मासिकाचे पूर्ण नाव टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचे प्रकाशक असं असल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. आज मी तुम्हाला हे राज्य काय आहे आणि तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी हे राज्य काय करणार आहे ते सांगणार आहे.” मग अपेक्षा माहितीपत्रकातून पाठ ६ उघडा. घरमालकाजवळ जितका वेळ असेल त्यानुसार पहिला परिच्छेद वाचा आणि त्यावर चर्चा करा. मग, आणखी कोणत्यातरी दिवशी येऊन उरलेल्या पाठाची चर्चा करण्याची व्यवस्था करा.

११ पत्रिकांचा सतत साठा ठेवा: सेवा पर्यवेक्षकांनी व लिटरेचर साठा हाताळणाऱ्‍या बांधवांनी, मंडळीमध्ये नेहमी बायबलविषयी अधिक माहिती पत्रिकांचा भरपूर साठा ठेवावा. खिशात, पर्समध्ये, कारमध्ये, कामाच्या ठिकाणी, शाळेत, तुमच्या घराच्या दाराजवळ वस्तू ठेवायची काही सोय असेल तर तिथे—अगदी सहजपणे हाती लागतील अशा ठिकाणी त्या ठेवा. अर्थात, साक्षकार्याला जाताना तुमच्या बॅगेतही पत्रिका घेऊन जा, जेणेकरून, बायबलवर तुम्हाला कोणाबरोबर चर्चा करायला मिळाली तर अशा लोकांना तुम्ही त्या देऊ शकाल.

१२ यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देवो: लोकांना सत्य शिकवणे हे सर्व ख्रिश्‍चनांचे ध्येय आहे. (मत्त. २८:१९, २०) तुम्ही सध्या एखादा गृह बायबल अभ्यास चालवत आहात का? असल्यास, तुमच्या आठवड्याच्या आराखड्यात तुम्ही आणखी एखाद्या अभ्यासासाठी वेळ काढू शकाल का? तुमच्याकडे अभ्यास नसेल तर तुम्हाला नक्कीच एक अभ्यास चालवायला आवडेल. तुम्हाला एखादा बायबल अभ्यास मिळावा म्हणून यहोवाला प्रार्थना करा. आणि मग, तुमच्या प्रार्थनांच्या अनुषंगाने कार्य देखील करा.—१ योहा. ५:१४, १५.

१३ आता आपल्याजवळ अभ्यास चालू करण्यासाठी नवीन साधन आहे! या साधनाशी आधी तुम्ही स्वतः परिचित व्हा. मुक्‍तहस्ते त्याचे वितरण करा. ‘चांगले ते करण्यास, सत्कर्माविषयी धनवान होण्यास,’ आणि देवाच्या वचनाविषयी तुम्ही शिकलेल्या गोष्टी इतरांना शिकवण्यात “परोपकारी व दानशूर” होण्यास सर्वोतोपरी प्रयत्न करा.—१ तीम. ६:१८

[४ पानांवरील चौकट]

पत्रिकांचे वाटप करण्याच्या संधी

◼ लोकांशी दररोज बोलताना

◼ आपली प्रकाशने स्वीकारणाऱ्‍यांना

◼ घरी नसलेल्यांना

◼ पुनर्भेटी करताना

◼ रस्त्यावर साक्षकार्य करताना

◼ व्यापार क्षेत्रात साक्षकार्य करताना

◼ अनौपचारिक साक्षकार्य करताना

◼ पत्र लिहिताना

◼ सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना

◼ आपल्या घरी कोणी येते तेव्हा

◼ नातेवाईक, शेजारी, सहकर्मचारी, शाळासोबती आणि इतर ओळखीच्या लोकांशी बोलताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा