ऑक्टोबरमध्ये तुम्ही बायबल अभ्यास सुरू कराल का?
१. ऑक्टोबर महिन्यात आपण लोकांना काय सादर करणार आहोत?
१ ऑक्टोबर महिन्यात आपण, टेहळणी बुरूज नियतकालिक लोकांना सादर करणार आहोत. लोक आवड दाखवतात तेव्हा त्यांची आवड वाढवण्यासाठी व त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने, आपण जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? पत्रिका त्यांना देऊ शकतो. हे आपण पुनर्भेट देतो तेव्हा कसे करू शकतो?
२. नियतकालिक घेतलेल्या घरमालकाला पुन्हा भेटायला गेल्यावर आपण, बायबलचा अभ्यास सुरू करण्यासाठी जीवनातील महत्त्वाचे प्रश्न या पत्रिकेचा उपयोग कसा करू शकतो?
२ पत्रिकेचा उपयोग कसा करायचा: घरमालकाला किती आस्था आहे याचा अंदाज काढल्यावर आपण म्हणू शकतो: “मी तुम्हाला जे नियतकालिक दिलं होतं त्यात, सर्व लोकांना मग ते कोणत्याही संस्कृतीचे किंवा धर्माचे असोत, बायबलचं परीक्षण करण्याचं उत्तेजन दिलं आहे. [घरमालकाच्या हातात जीवनातील महत्त्वाची प्रश्ने पत्रिका द्या आणि पहिल्या पानावरील प्रश्ने दाखवा.] इथं, आपल्याला विचार करायला लावणारे काही प्रश्नं दिले आहेत ज्यांची मनाला समाधान देणारी उत्तरं बायबलमध्ये दिली आहेत. तुमच्या मनात कधी यांपैकी कोणता प्रश्न आला होता का? तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला आवडेल का?” घरमालकाचे उत्तर ऐकल्यानंतर, पत्रिकेत दिलेल्या त्याच्या प्रश्नाच्या उत्तरावर चर्चा करा आणि दिलेली शास्त्रवचने वाचा. बायबल काय शिकवते याचे हे फक्त एक उदाहरण होते असे म्हणून त्याच्या हातात बायबल काय शिकवते पुस्तक द्या. अनुक्रमणिकेतून त्याने निवडलेल्या अध्यायातील सुरुवातीच्या काही परिच्छेदांवर आपण चर्चा करू शकतो. किंवा मग, पत्रिकेतील ज्या विषयावर आपण चर्चा केली होती त्यावर पुस्तकात दिलेली अधिक माहिती काढून आपण चर्चा करू शकतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत:
• देवाला खरोखरच आपली काळजी आहे का? (पृ. ९-११, परि. ६-१०)
• युद्ध, दुःख कधी नाहीसे होतील का? (पृ. १२, परि. १२-१३)
• मृत्यूनंतर आपले काय होते? (पृ. ५९-६०, परि. ७, ८)
• मृत जनांना पुन्हा भेटणे शक्य आहे का? (पृ. ७१, परि. १३-१५)
• देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो? (पृ. १६६-१६७, परि. ५-८)
• जीवनात खरा आनंद कसा मिळवता येईल? (पृ. ९, परि. ४-५)
३. लोकांच्या परिस्थितीनुसार आपण बायबल अभ्यास सुरू करण्याच्या आपल्या पद्धतीत फेरबदल कसा करू शकतो?
३ पण काही कारणास्तव आपण पहिल्याच पुनर्भेटीत बायबल काय शिकवते पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करू शकत नसलो तरी, आपली चर्चा पुढे चालू ठेवण्याकरता आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे येण्याची व्यवस्था करू शकतो. आणि घरमालकाच्या आवडीनुसार, थेट पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याआधी, पत्रिकेतील एकापेक्षा अधिक प्रश्नांची चर्चा पुनर्भेटींदरम्यान करू शकतो. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांबरोबर बोलताना खरेतर आपण व्यवहार-कुशलता दाखवली पाहिजे व खबरदारी बाळगली पाहिजे. तेव्हा, ऑक्टोबर महिन्यात बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या बहुगुणी पत्रिकेचा उपयोग करून प्रामाणिक मनाच्या लोकांना ‘सत्य समजण्यास’ मदत करू या.—योहा. ८:३१, ३२.