बायबल अभ्यासाविषयी लोकांना सांगण्याचे भान ठेवा
१. मत्तय २८:१९, २० येथे येशूने दिलेल्या कामगिरीत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
१ येशूने आपल्याला, लोकांना ‘शिष्य करून त्यांस शिकवण्याची’ कामगिरी दिली आहे. (मत्त. २८:१९, २०) त्यामुळे आपण लोकांना बायबल अभ्यासाविषयी सांगण्याचे भान ठेवले पाहिजे. पुढे काही गोष्टी सुचवल्या आहेत ज्या तुम्हाला उपयुक्त वाटतील.
२. आपण कोणा-कोणाला बायबल अभ्यासाविषयी सांगू शकतो?
२ बायबल अभ्यासाविषयी सांगा: बायबल अभ्यासाविषयी आपण जितके सांगू तितक्या, बायबल अभ्यास सुरू करण्याच्या संधी आपल्याला मिळू शकतात. (उप. ११:६) आपला संदेश आवडीने ऐकणाऱ्या सर्वांना तुम्ही बायबल अभ्यासाविषयी सांगण्याचा प्रयत्न करता का? एका मंडळीतील सर्व प्रचारकांनी, एक संपूर्ण महिना बायबल अभ्यास सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना ४२ नवे बायबल अभ्यास सुरू करता आले! तुम्ही ज्या आस्थेवाईक लोकांकडे जाता त्यांना, तुम्ही बायबल अभ्यास चालवता हे माहीत असावे, असे गृहीत धरू नका. मग, पुढच्या वेळी तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा त्यांना बायबल अभ्यासाविषयी सांगाल का? त्यांनी त्या वेळेला नकार दिला तर काही बिघडत नाही. बायबल संदेशातील त्यांची आवड तुम्ही वाढवत राहू शकता. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना, तुमच्या बरोबर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना, बायबल अभ्यास करण्याविषयी विचारले आहे का? तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना, बायबल अभ्यास करायला आवडेल असा त्यांचा कोणी मित्र किंवा नातेवाईक आहे का, असेही विचारू शकता.
३. बायबल अभ्यास सुरू करण्याकरता आपल्या जवळ कोणते एक उपयुक्त साहित्य आहे आणि ही पत्रिका आपण केव्हा देऊ शकतो?
३ उपयुक्त साहित्य: बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? या उपयुक्त पत्रिकेचा तुम्ही वापर करू शकता. सुवार्तेमध्ये खरोखरच आवड असलेल्यांना तुम्ही ही पत्रिका देऊ शकता. तुम्ही लोकांची पुनर्भेट घ्यायला जाता तेव्हाही या पत्रिकेचा उपयोग करू शकता. क्षेत्र सेवेत भाग घेताना, बसमधून प्रवास करत असताना, बाजारहाट करत असताना तसेच कामाच्या ठिकाणी तुम्ही ही पत्रिका सोबत नेऊ शकता. पत्रिकेच्या शेवटच्या पानावर बायबल अभ्यासाबद्दल आणि बायबल काय शिकवते पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.
४. बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी तुम्ही जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या पत्रिकेचा उपयोग कसा करू शकता?
४ आपला संदेश आवडीने ऐकणाऱ्याला ही पत्रिका दिल्यानंतर तुम्ही पहिल्या पानावरील प्रश्न दाखवून त्याला विचारू शकता: “यांतील कोणत्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत करून घ्यायला आवडेल?” मग, पत्रिकेतील ते उत्तर काढून त्यावर चर्चा करा आणि पत्रिकेच्या शेवटच्या पानावर बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेविषयी जे सांगितले आहे ते वाचा किंवा मग थोडक्यात समजावून सांगा. तुम्ही चर्चा केलेल्या विषयावर अधिक माहिती बायबल काय शिकवते या पुस्तकात कोठे मिळू शकेल ते दाखवा आणि त्याला ते पुस्तक द्या व पुन्हा भेटण्याची वेळ ठरवून चर्चा पुढे चालू ठेवा.
५. आपण लोकांना बायबल अभ्यासाविषयी सांगण्याचे भान का ठेवले पाहिजे?
५ बायबल नेमके काय शिकवते हे जाणू इच्छिणारे पुष्कळ लोक अजूनही आपल्या क्षेत्रात आहेत. पण, आपण आपल्या क्षेत्रातील लोकांच्या धार्मिक भावना न दुखावण्याची दक्षता देखील बाळगली पाहिजे. बायबल अभ्यासाविषयी लोकांना सांगण्याचे भान ठेवल्याने आपल्याला, जीवनाच्या मार्गावर येण्यास लोकांना मदत केल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवण्याच्या अनेक संधी मिळतील.—मत्त. ७:१३, १४.