जून २८ च्या सप्ताहाचा आराखडा
जून २८ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ८ परि. १९-२६, १०६, १०९ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे ३-६
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: जुलै महिन्यात टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. एक दोन मिनिटांत, नियतकालिकातील लेखांची उजळणी करा. मग, दोन किंवा तीन लेख निवडा आणि श्रोत्यांना, नियतकालिक सादर करताना कोणते प्रश्न विचारता येतील, कोणती वचने दाखवता येतील ते विचारा. नियतकालिक कसे सादर करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. पुनर्भेटीच्या वेळी बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याचे आणखी एक प्रात्यक्षिक दाखवून भाग समाप्त करा.—km ८/०७ पृ. ५ पाहा.
१५ मि: बालपणापासून प्रशिक्षण मिळालेला. श्रोत्यांबरोबर चर्चा. तीमथ्याला लोक, एक आवेशी व कौशल्यपूर्ण सुवार्तिक म्हणून ओळखायचे. (फिलिप्पै. २:२०-२२) याचे एक कारण हे होते, की त्याला त्याची आई आणि आजी यांच्याकडून बालपणापासूनच आध्यात्मिक प्रशिक्षण मिळाले होते. (२ तीम. १:५; ३:१५) शास्त्रवचनांवर आधारित असलेल्या पुढे सुचवलेल्या काही गोष्टी, पालकांना आपल्या मुलांना चांगले सुवार्तिक बनवण्यास मदत करू शकतात. (१) शक्य तितक्या लवकर आपल्या मुलांना सेवेमध्ये न्यायला सुरू करा; त्यांचे वय आणि त्यांची कुवत यांनुसार सेवेत भाग घेण्याचे त्यांना प्रशिक्षण द्या. (नीति. २२:६) (२) सेवेला प्रथम स्थान देण्यास तुम्ही आपल्या मुलांना शिकवता तेव्हा आधी तुम्ही स्वतः तसे करून दाखवा. (फिलिप्पै. १:९, १०) (३) कौटुंबिक उपासनेच्या वेळी आणि इतर प्रसंगी त्यांच्या मनावर, प्रचार कार्याबद्दल प्रेम आणि आदर बिंबवा. (अनु. ६:६, ७) (४) प्रचार कार्याविषयीची तुमची मनोवृत्ती व तुमचे बोलणे नेहमी सकारात्मक ठेवा. (फिलिप्पै. ३:८; ४:८; १ तीम. १:१२) (५) कुटुंब मिळून सेवेत भाग घ्या आणि अशी सवय लावून घ्या. (प्रे. कृत्ये ५:४१, ४२) (६) सेवेत आवेशी असलेल्या सेवकांबरोबर मैत्री करा. (नीति. १३:२०) श्रोत्यांना विचारा, की त्यांच्या पालकांनी अशा कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या ज्यांमुळे त्यांना क्षेत्र सेवा आनंदाने व प्रभावीपणे करण्याकरता मदत मिळाली?