वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०९ पृ. १
  • निकडीने प्रचार करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निकडीने प्रचार करा!
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीची भावना टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • प्रचार कार्य करण्यासाठी निकडीची भावना कशी विकसित कराल?
    आमची राज्य सेवा—२०१४
  • “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km १२/०९ पृ. १

निकडीने प्रचार करा!

१. पौलाने दिलेल्या कोणत्या सल्ल्याकडे आज आपण विशेष लक्ष दिले पाहिजे?

१ “निकडीने सर्वदा देवाच्या वचनाची घोषणा करीत राहा.” (२ तीम. ४:२) पौलाने दिलेला हा सल्ला आज आपल्या दिवसांकरता इतका महत्त्वाचा का आहे? या शब्दांचा आपल्या व इतरांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो?

२. ज्या लोकांनी अद्याप सुवार्ता ऐकलेली नाही अशा लोकांचा आपण कसून शोध का घेतला पाहिजे?

२ लोकांचे जीव धोक्यात आहेत: संपूर्ण जगातील कोट्यवधी लोकांनी, त्यांचे तारण होऊ शकेल अशी सुवार्ता अद्याप ऐकलेली नाही. (रोम. १०:१३-१५; १ तीम. ४:१६) ज्या भागात वारंवार क्षेत्र सेवा केली जात आहे त्या भागातही आज अनेक प्रामाणिक मनाचे लोक भेटत आहेत. आपण जर दुसऱ्‍या दिवशी किंवा नेहमीच्या वेळेऐवजी दुसऱ्‍या वेळी गेलो तर घरातील वेगवेगळ्या लोकांना भेटू शकू. लोकांचा असा कसून शोध घेऊन त्यांना सुवार्ता सांगण्याकरता आपण करत असलेल्या प्रयत्नांमुळे आपला विवेक शुद्ध राहील शिवाय आपण रक्‍तदोषापासूनही मुक्‍त होऊ.—प्रे. कृत्ये २०:२६.

३. क्षेत्र सेवेत आपण आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करू शकतो?

३ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना खूप विरोधाचा सामना करावा लागत होता तरीपण त्यांनी ‘त्यांच्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले.’ (प्रे. कृत्ये ५:२८) आपणही त्यांच्याप्रमाणेच, आपल्या क्षेत्रातील लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन व आपण कोठे क्षेत्र सेवा केली पाहिजे यासंबंधाने वडील जन देत असलेल्या सूचनांचे पालन करून ‘पूर्णपणे साक्ष’ देण्याचे ठरवले आहे का? (प्रे. कृत्ये १०:४२, NW) क्षेत्र सेवेत आपण वेळेचा सदुपयोग करतो का? पुनर्भेट घेण्यासाठी गेलेल्या एखाद्या बांधवाची अथवा बहिणीची वाट पाहत आपण जर रस्त्यावर थांबलेलो असू तर वेळ वाया घालवण्यापेक्षा येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या लोकांसोबत आपण बोलणे सुरू करतो का?

४. निकडीच्या भावनेने प्रचार केल्यास आपण जागृत कसे राहू शकतो?

४ निकडीच्या भावनेमुळे आपणही अधिक सावध होतो: या व्यवस्थिकरणाचा शेवट अगदी जवळ आला असल्यामुळे आपण सावध व जागृत राहिले पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:१-६) आपल्या राज्य आशेविषयी आपण लोकांबरोबर सतत बोलत राहिलो तर या व्यवस्थिकरणाच्या चिंतांखाली आपण दबून जाणार नाही. (लूक २१:३४-३६) उलट, आपण जर यहोवाचा दिवस “येण्याची वाट पाहत” राहिलो तर लोकांचा जीव वाचवणाऱ्‍या प्रचार कार्यात आपण आणखी सहभाग घेऊ.—२ पेत्र ३:११, १२.

५. जीवनाबद्दलचा आदर आपल्याला क्षेत्रात भाग घेण्यास कशा प्रकारे प्रवृत्त करू शकतो?

५ निकडीने प्रचार करून आपण दाखवून देतो की जीवनाबद्दल आपला देखील यहोवासारखाच दृष्टिकोन आहे. “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९; यहे. ३३:११) आपल्या क्षेत्रातील होता होईल तितक्या लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करून आपण यहोवाची स्तुती करूया.—स्तो. १०९:३०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा