प्रचार कार्य करण्यासाठी निकडीची भावना कशी विकसित कराल?
निकडीची भावना ही विकसित करावी लागते, आणि येणाऱ्या नाशातून बचावण्यासाठी ती अत्यंत गरजेची आहे. पुढे अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्यांची आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाते; त्यांचे पालन केल्यास आपण आपली निकडीची भावना टिकवून ठेवू शकतो.
• राज्याबद्दल नियमितपणे प्रार्थना करा.—मत्त. ६:१०.
• दररोज बायबलचे वाचन करण्याद्वारे आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा.—इब्री ३:१२.
• वेळेचा चांगला उपयोग करा.—इफिस. ५:१५, १६.
• आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जगातील लोकांच्या इच्छा-आकांक्षांमुळे विचलित होऊ नका.—मत्त. ६:२५; २ तीम. ४:१०.
• बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत त्याकडे बारकाईने लक्ष द्या.—मार्क १३:३५-३७.
निकडीची भावना टिकवून ठेवल्यास, अद्याप पूर्ण न झालेल्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचे उत्तेजन आपल्याला मिळेल!—योहा. ४:३४, ३५.