वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१ पृ. २५-२८
  • तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीचे विशिष्ट कालावधी
  • ख्रिस्ती समयातील निकड
  • ही निकड भलत्याच समयी होती का?
  • निकडीसाठी पुढील उत्तेजन
  • निकडीचा सकारात्मक प्रभाव
  • निकडीची भावना टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • प्रचार कार्य करण्यासाठी निकडीची भावना कशी विकसित कराल?
    आमची राज्य सेवा—२०१४
  • “यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१ पृ. २५-२८

तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा

यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करत राहण्याचा आणखी एक खात्रीशीर, देव-स्वीकृत मार्ग कोणता? आपल्या अंतःकरणात खोलवर, निकडीची खरी भावना बाळगणे हा तो मार्ग आहे. पूर्ण अंतःकरणाने देवाची सेवा करणे म्हणजे आपल्या पूर्ण व्यक्‍तिमत्त्वाने त्याची सेवा करणे आणि त्यासाठी तो आपल्याकडून जे काही मागतो त्या सर्व गोष्टींना मनापासून, पूर्ण आज्ञाधारकता दाखवणे जरूरीचे आहे.

संदेष्टा मोशेने, “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर,” अशी सूचना इस्राएल राष्ट्राला देताना या गरजेवर जोर दिला. (अनुवाद ६:५) शतकांनंतर हीच आज्ञा ख्रिस्त येशूने पुन्हा सांगितली: “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा] ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) प्रेषित पौलाने इफिसकरांना “देवाची इच्छा मनापासून पूर्ण” करण्यास सांगितले आणि कलस्सैकरांना “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा” असे आर्जवले तेव्हा तो याच गरजेचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत होता.—इफिसकर ६:६; कलस्सैकर ३:२३.

परंतु आपल्यामध्ये निकडीची भावना खोलवर रुजलेली नसेल किंवा एकेकाळी आपल्यामध्ये असलेली निकडीची जाणीव मंद झालेली असेल—किंवा पूर्णपणे नाहीशी झालेली असेल तर मनाने व जिवाने देवाची सेवा करण्यास कठीण जाते. आज, आपण मानव इतिहासातील इतर कोणत्याही काळापेक्षा अतुल्य असणाऱ्‍या निकडीच्या काळात राहत आहोत.

निकडीचे विशिष्ट कालावधी

ख्रिस्तपूर्व काळांमध्ये निकडीचे अनेक कालावधी होते. नोहाचा काळ आणि सदोम व गमोराच्या नाशाकडे नेणारे कालावधी निश्‍चितच खऱ्‍या निकडीचे कालावधी होते. (२ पेत्र २:५, ६; यहुदा ७) जलप्रलयाच्या आधीची वर्षे निःसंशये निकडीच्या क्रियांनी भरली होती. जलप्रलयाची सुरवात नक्की कधी होणार हे नोहा आणि त्याच्या कुटुंबाला माहीत नसले तरीही त्यांनी दिरंगाई करू नये याची खात्री त्यांचे “ईश्‍वरी भय” त्यांना देणार होते.—इब्रीयांस ११:७, NW.

त्याचप्रकारे, सदोम आणि गमोराच्या नाशाआधी, देवदूतांनी “लोटाला घाई करून म्हटले, . . . आपला जीव घेऊन पळ!” (उत्पत्ति १९:१५, १७) होय, त्या प्रसंगी देखील निकडीने पाऊल उचलल्यामुळे धार्मिकांचे जीव बचावले. शतकांनंतर बॅबिलोनमधील यहुदी कैद्यांना आर्जवण्यात आले: “निघा निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; त्याच्यामधून निघून जा.” (यशया ५२:११) या निकडीच्या भविष्यसूचक आज्ञेचे पालन करत सा. यु. पूर्व ५३७ मध्ये सुमारे २,००,००० कैदी बॅबिलोनमधून घाईघाईने बाहेर निघून गेले.

त्या प्रत्येक परिस्थितीत निकडीची भावना ठेवल्यामुळे, आपण निकडीच्या समयात जगत आहोत अशी खातरी वाटत असणाऱ्‍यांनी व ती जिवंत ठेवणाऱ्‍यांनी संपूर्ण जिवाने सेवा केली.

ख्रिस्ती समयातील निकड

निकडीचे पडसाद संपूर्ण ग्रीक शास्रवचनांमध्ये देखील ऐकू येतात. “सावध असा,” “जागृत राहा,” ‘जागे राहा,’ ‘तयार असल्याचे स्वतःला सिद्ध करा’—ख्रिस्त येशूने आपल्या अनुयायांमध्ये निकडीची उचित भावना बिंबवण्यासाठी अशा विधानांचा उपयोग केला. (मत्तय २४:४२-४४; मार्क १३:३२-३७) शिवाय, दहा कुमारी, दुष्ट दास, रुपये आणि शेरडांपासून मेंढरांना वेगळे करणे हे सर्व दाखले, अपेक्षा वाढवतात आणि निकडीची भावना निर्माण करतात.—मत्तय २५:१, १४, १५, ३२, ३३.

येशू निकडीविषयी केवळ बोललाच नाही तर त्याचे शब्द खरे आहेत याला पुष्टी देण्यासाठी त्याने निकडीने कार्य केले. एका प्रसंगी लोकसमुदायाने त्याला अडवून धरण्याचा प्रयत्न केला असता, त्याने म्हटले: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४२, ४३) शिवाय, ‘पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे असल्यामुळे’ पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत अशी धन्याला विनंती करण्याचे उत्तेजन त्याने आपल्या शिष्यांना दिले. (मत्तय ९:३७, ३८) देवाजवळ केलेली अशी प्रार्थनापूर्वक विनंती निकडीच्या आत्म्याला प्रकट करते.

ही निकड भलत्याच समयी होती का?

काही लोक कदाचित तर्कसंगत प्रश्‍न विचारतील, की भाकीत करण्यात आलेले “मोठे संकट” शतकांनंतर येणार होते तर येशूच्या काळी निकडीच्या भावनेची गरज का होती?—मत्तय २४:२१.

येशूने आपल्या अनुयायांना प्रचार व शिकवण्याच्या कार्यात व्यग्र ठेवण्यासाठी वापरलेली ती केवळ एक लबाडीची युक्‍ती नव्हती ही खात्री आपण बाळगू शकतो. ख्रिस्ताचे आपल्या शिष्यांवरील प्रेम तसेच वेळेबद्दल यहोवाच्या दृष्टिकोनाची परिपूर्ण समज या गोष्टी, निकडीच्या सल्ल्याचा आधार होत्या. होय, यहोवाच्या उद्देशांनुसार त्याची इच्छा साध्य करण्यासाठी निकडीच्या आत्म्याची आवश्‍यकता होती हे ख्रिस्त येशूला माहीत होते. शिवाय, त्याचे पुन्हा येणे होईपर्यंत निकडीची भावना राखण्याद्वारे त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक रीत्या लाभ होईल हे त्याला माहीत होते.

जगव्याप्त साक्षकार्य व तेही मर्यादित समयात उरकले पाहिजे हे येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे दर्शवले होते. (मत्तय २४:१४; मार्क १३:१०) हे कार्य जसे वाढत गेले तसे या नियुक्‍तीचे प्रगतीशील टप्पे प्रकट झाले. परंतु प्रत्येक टप्पा पूर्ण करण्यासाठी निकडीची जरूरी होती. “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल,” असे येशूने म्हटले तेव्हा त्याने या नियुक्‍तीची प्रगती दर्शवली. (प्रेषितांची कृत्ये १:८) अशा प्रकारे आतापर्यंत ही नियुक्‍ती उलगडून दाखवण्यात आली. याचा अर्थ, काळाच्या ओघात काही वेळा समजेमध्ये आवश्‍यक बदल करून देवाच्या सेवकांना आश्‍चर्यचकीत करण्यात आले.

ख्रिस्ती निकडीच्या भावनेने यहोवाचा उद्देश पूर्ण केला. याने ख्रिस्ताच्या शिष्यांना यहोवाच्या अचूक वेळापत्रकानुसार आपल्या नियुक्‍तीची प्रगती पूर्ण करण्यास मदत केली. म्हणून आज सुमारे २,००० वर्षांच्या मागे पाहिल्यास, आपण ईश्‍वरी वेळापत्रक अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो.

इस्राएलांवरील खास अनुग्रह सा. यु. ३६ मध्ये संपुष्टात येण्याआधी ख्रिस्ती निकडीने शिष्यांना जेरूसलेम, यहुदीया, शोमरोन आणि पांगलेल्या यहुद्यांना पूर्ण रूपाची साक्ष देण्याकरता मदत केली. (दानीएल ९:२७; प्रेषितांची कृत्ये २:४६, ४७) अशाच प्रकारे ख्रिस्ती निकडीने, यहुद्यांच्या व्यवस्थीकरणाचा लवकरच अंत होणार असल्याचा स्पष्ट इशारा त्या सर्वांना देण्यासाठी आरंभीच्या मंडळ्यांना मदत केली. (लूक १९:४३, ४४; कलस्सैकर १:५, ६, २३) सा. यु. ७० मध्ये ते अनपेक्षितपणे संपुष्टात आले तेव्हा, पूर्वभाकीत केलेल्या धर्मत्यागाने त्याचे रोगट आच्छादन काढून टाकण्याआधी ख्रिस्ताच्या पहिल्या शतकातील साक्षीदारांना स्वर्गीय आशेची घोषणा करण्यास निकडीने मदत केली. (२ थेस्सलनीकाकर २:३; २ तीमथ्य ४:२) त्यानंतर मध्ययुगाच्या शतकांदरम्यान, ख्रिस्त येशूने पूर्वभाकीत केल्याप्रमाणे गव्हासमान काही ख्रिश्‍चनांनी राज्य आशेला जिवंत ठेवले. (मत्तय १३:२८-३०) शेवटी, यहोवाने आपल्या नियुक्‍त वेळी, आधुनिक समयातील आवेशी मंडळी, या शेवटल्या पिढीत राहणाऱ्‍यांना तातडीचा न्यायाचा संदेश देण्यासाठी उत्तेजित करून सामोरी आणली.—मत्तय २४:३४.

प्राचीन काळातील दानीएलाप्रमाणेच, देवाचे आधुनिक दिवसांतील साक्षीदार यहोवाला कधीही असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस करणार नाहीत की, “तू असे काय करतोस?” (दानीएल ४:३५) वेळापत्रकानुसार योग्य वेळी आपले कार्य कसे पार पाडायचे ते यहोवाला पूर्णपणे माहीत आहे, याचा त्यांना भरवसा आहे. म्हणून कोणत्याही बाबींशी तजवीज करण्याच्या यहोवाच्या मार्गांबद्दल प्रश्‍न करण्याऐवजी, या महत्त्वपूर्ण समयात त्याच्यासोबत कार्य करण्यासाठी त्याने संधी दिल्याबद्दल ते आनंदी आहेत.—१ करिंथकर ३:९.

निकडीसाठी पुढील उत्तेजन

निकडीचे आणखी एक कारण म्हणजे, मोठ्या संकटाच्या अचानक उद्रेकाविषयी अचूक दिवस व घटका सांगण्याबद्दलची अक्षमता हे होय. पृथ्वीवरील कोणालाही त्या निर्णायक घटनेविषयी आधी निश्‍चित केलेला दिवस व घटिका माहीत नसल्याचे ख्रिस्त येशूचे ठाम मत होते. (मत्तय २४:३६) दुसऱ्‍या प्रसंगी त्याने आपल्या उत्सुक प्रेषितांना सांगितले: “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.” (प्रेषितांची कृत्ये १:७) होय, परिणाम स्पष्टच आहे पण सर्व तपशील जाणणे आपल्याकडे नाही.

प्रेषित पौलाची निकडीची योग्य मनोवृत्ती होती. त्याने ख्रिस्ताच्या उपस्थितीबद्दल थेस्सलनीकाकरांना लिहिले तेव्हा कदाचित येशूचे शब्द त्याच्या मनात असावेत: “बंधूंनो काळ व समय ह्‍यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.” (१ थेस्सलनीकाकर ५:१) त्याने हे पत्र येशूने “पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल,” असे म्हटल्यानंतर अदमासे १७ वर्षांनंतर लिहिले. (प्रेषितांची कृत्ये १:८) त्यावेळी अधिक लिहिता आले नाही कारण अधिक काही प्रकट झालेले नव्हते. असे असले तरी, ख्रिश्‍चन अजूनही निकडीने प्रचार करीत असताना, यहोवाचा दिवस “रात्री चोर येतो तसाच” येईल याची खातरी त्यांना असू शकत होती.—१ थेस्सलनीकाकर ५:२.

हे शब्द लक्षात ठेवून, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी यहोवाचा दिवस कित्येक शतके लांब असल्याचा विचार केला असे वाटणे अशक्य आहे. हे खरे, की त्यांना दूर देशाला गेलेला राजा आणि परदेशाला गेलेला मनुष्य याविषयी येशूचे दाखले माहीत होते. राजा “मग” परतेल आणि “बराच काळ लोटल्यावर” परदेशी गेलेला मनुष्य परतणार हे दाखल्यांनी दाखवण्यात आले हेही त्यांना माहीत होते. परंतु, “मग” म्हणजे केव्हा? “बराच काळ लोटल्यावर” याचा अर्थ काय होतो? दहा वर्षे?, वीस वर्षे?, पन्‍नास वर्षे? किंवा यापेक्षाही अधिक? या प्रश्‍नांमुळे ते गोंधळात पडले हे निश्‍चित आहे. (लूक १९:१२, १५; मत्तय २५:१४, १९) येशूचे शब्द त्यांच्या कानात सतत निनादणार होते: “तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—लूक १२:४०.

निकडीचा सकारात्मक प्रभाव

होय, निकड जाणण्याच्या देव-उत्तेजित भावनेने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांवर अद्‌भुत असा प्रोत्साहनदायक प्रभाव पाडला, ज्यामुळे प्रचार व शिकवण्याच्या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यात व्यग्र राहण्यात त्यांना मदत मिळाली. आज आपल्याला अनेक मार्गांनी ती उत्तेजन देत आहे. ती आपल्याला आत्मसंतुष्ट किंवा ‘चांगले करण्याचा कंटाळा’ यापासून दूर ठेवील. (गलतीकर ६:९) ती जगाबरोबर आणि त्याच्या कावेबाज भौतिकवादात अधिक गुंतण्यापासून आपले संरक्षण करते. ती आपले मन ‘खऱ्‍या जीवनावर’ केंद्रित करते. (१ तीमथ्य ६:१९) प्रभू येशूने म्हटले, की त्याचे शिष्य ‘लांडग्यांमध्ये मेंढरांसारखे’ असतील. जगाबरोबर लढण्यासाठी दृढनिश्‍चयी व स्थिर दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे हे त्याला माहीत होते. होय, निकड जाणण्याच्या आपल्या ख्रिस्ती भावनेमुळे आपले संरक्षण, आपला बचाव झाला आहे.—मत्तय १०:१६.

यहोवा देवाने त्याच्या असीम सामर्थ्यामध्ये, आपल्या सेवकांच्या निकडीच्या भावनेला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना नेहमी पुरेशी माहिती दिली आहे. आपण या भ्रष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळी” जगत आहोत अशी त्याने आपल्याला दयाळुपणे खात्री दिली आहे. (२ तीमथ्य ३:१) आपण ज्या पिढीमध्ये राहत आहोत ती पिढी मोठ्या संकटात नाहीशी होईपर्यंत व हर्मगिदोनात तिचा अंत होईपर्यंत आपण ज्योतीसारखे प्रकाशले पाहिजे याची आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाते.—फिलिप्पैकर २:१५; प्रकटीकरण ७:१४; १६:१४, १६.

होय, निकडीची ईश्‍वरी भावना, पूर्ण अंतःकरणाने यहोवाच्या सेवेचा अंतर्भाग आहे. देवाच्या सेवकांची ‘मने खचून त्यांनी थकून जावे’ म्हणून दियाबल जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना चुकवण्यास आणि हाणून पाडण्यास ही भावना मदत करते. (इब्रीयांस १२:३) यहोवाचे सेवक मनःपूर्वक केलेल्या भक्‍तीमुळे चिरकालासाठी त्याची आज्ञा पाळतील, पण हर्मगिदोनाआधी सध्याच्या दिवसांमध्ये, निकडीची खोल, वास्तविक भावना मनःपूर्वक केलेल्या भक्‍तीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

“आमेन. ये, प्रभु येशू” या प्रेषित योहानाच्या शब्दांना पुन्हा उच्चारत असताना निकडीच्या आपल्या भावनेचे संरक्षण करण्यास आपला देव यहोवा आपल्याला सदोदित मदत करीत राहो.—प्रकटीकरण २२:२०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा