तुम्ही तुमचे सेवाकार्य वाढवू शकता का?
१. क्षेत्रसेवेच्या बाबतीत आज कोणती गोष्ट अधिक गरजेची बनली आहे व का?
१ राज्याची सुवार्ता लोक किती आवडीने ऐकत आहेत हे पाहून येशूने त्याच्या शिष्यांना, ‘आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून पिकाच्या धन्याला प्रार्थना’ करण्यास सांगितले. (मत्त. ९:३७, ३८) आज आपण कापणीच्या हंगामाच्या अगदी शेवटल्या टप्प्यात येऊन पोहंचलो आहोत त्यामुळे आपले सेवा कार्य हे पहिल्यापेक्षा अधिक गरजेचे बनले आहे. या कार्यात होता होईल तितका सहभाग कसा घेता येईल म्हणून आपण प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे.—योहा. १४:१३, १४.
२. काहींनी, क्षेत्र सेवेत हव्या असणाऱ्या आणखी कामकऱ्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद दिला?
२ सेवाकार्य वाढवण्याचे मार्ग: यहोवाच्या मार्गदर्शनामुळे व मदतीमुळे अनेक जण पायनियर सेवा सुरू करू शकले आहेत. (स्तो. २६:२, ३; फिलिप्पै. ४:६) या वर्षात काहींनी एक अथवा अनेक महिने साहाय्यक पायनियरींग केली. सेवा कार्य वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. साहाय्यक पायनियरींग करताना त्यांना जो आनंद अनुभवायला मिळाला त्यामुळे काहींनी सामान्य पायनियरींग सुरू करण्याचा विचार केला.—प्रे. कृत्ये २०:३५.
३. तुम्ही जर पूर्वी पायनियरींग केली असेल तर आता तुम्ही काय करू शकता?
३ तुम्ही पायनियरींग पुन्हा सुरू कराल का? पूर्वी केलेल्या पायनियरींगच्या सुखद आठवणी अजूनही तुमच्या मनात कदाचित ताज्या असतील. तर मग तुम्ही पुन्हा पायनियरींग सुरू करण्याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? ज्यामुळे तुम्ही पायनियरींग सोडली होती ती अडखळणे आता कदाचित नसतील. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा एकदा पायनियरींग सुरू करता येईल.—१ योहा. ५:१४, १५.
४. आपल्या सर्वांसमोर कोणती सुसंधी उपलब्ध आहे?
४ सध्या जोरात चाललेले कापणीचे काम लवकरच संपणार आहे. (योहा. ४:३५, ३६) तेव्हा आपण सर्वांनी आपल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पाहावे की आपण कोणकोणत्या मार्गांनी आपले सेवा कार्य वाढवू शकतो. पण ते खरोखरच अशक्य असेल तर आपल्याला आपली सेवा अधिक प्रभावीपणे कशी करता येईल ते आपण पाहू शकतो. (मार्क १२:४१-४४) ज्यांना पायनियरींग करणे शक्य आहे त्यांच्यासमोर किती मोठा सुहक्क आहे! यहोवाला त्यांचा उपयोग करून घेण्यास ते स्वतःला उपलब्ध करू शकतात!—स्तो. ११०:३.