२००९ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१. (क) तिन्ही दिवशी अधिवेशनास उपस्थित राहिल्यामुळे आपण कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा करू शकतो? (ख) आपण आतापासूनच कोणत्या योजना केल्या पाहिजेत?
१ आपण सर्वजण २००९ प्रांतीय अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. या अधिवेशनात, आपल्याप्रमाणेच “आध्यात्मिक गरजांची जाणीव” राखणाऱ्या तसेच यहोवाची स्तुती करणाऱ्या आपल्या बांधवांसह एकत्र येण्याची संधी पुन्हा एकदा आपल्याला मिळेल. (मत्तय ५:३, NW) यहोवाचा मोठा दिवस समीप असल्यामुळे, सर्वांनी तिन्ही दिवस उपस्थित राहावे असे आम्ही प्रत्येकाला आर्जवत आहोत. यामुळे विश्वासात स्थिर राहण्याकरता आपल्या बांधवांच्या प्रेमळ सहवासाचा आणि आध्यात्मिक उत्तेजनाचा प्रत्येकाला पूर्ण फायदा घेता येईल. (सफ. १:१४) हे अधिवेशन तुमच्या उपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे हे आपल्या शिक्षकांना व मालकांना आधीच सांगा. तेव्हा, कोणताही संकोच न बाळगता होता होईल तितक्या लवकर प्रार्थनापूर्वक योजना करायला लागा आणि यहोवा तुमचे प्रयत्न आशीर्वादित करील याची खात्री बाळगा.—यश. ५०:१०.
२. (क) फक्त कोण आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात? (ख) मोठी अधिवेशने केव्हा व कोठे आयोजित करण्यात आली आहेत?
२ भारतात आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरविण्याच्या योजना करण्यात आलेल्या नाहीत. ही अधिवेशने ठराविक देशांत आयोजित करण्यात आली आहेत त्यामुळे या अधिवेशनांस केवळ नेमण्यात आलेल्यांनीच उपस्थित राहावे. या व्यवस्थेला सहकार्य दाखवल्यास अधिवेशनांत अधिक गर्दी होणार नाही. (१ करिंथ. १४:४०; इब्री १३:१७) भारतात या वर्षी होणारी बहुतेक प्रांतीय अधिवेशने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांदरम्यान भरवली जातील. डिसेंबर महिन्यात एक मोठे अधिवेशन तमीळनाडूत तर दुसरे केरळ येथे भरवण्यात येईल.
३. मंडळीतील काहींना आपण ख्रिस्ती प्रेम कसे दाखवू शकतो?
३ इतरांनाही उपस्थित राहण्यास मदत करा: तुमच्या मंडळीत कोणाला प्रांतीय अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मदतीची गरज आहे का? तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा ‘आपलेच हित पाहत नाही, तर दुसऱ्याचेही पाहता.’—फिलिप्पै. २:४.
४, ५. तुमच्या मंडळीला ज्या अधिवेशनास नेमण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असाल तर तुम्ही काय केले पाहिजे?
४ माहिती मिळवा: अधिवेशनाच्या तारखा अथवा ठिकाण याविषयी शाखा कार्यालयाला फोन करण्याआधी तुम्हाला हवी असलेली माहिती प्रथम आपल्या मंडळीच्या सचिवांना विचारा.
५ तुमच्या मंडळीला ज्या अधिवेशनास नेमण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असाल तर रुमिंग हेडक्वाटर्स ॲड्रेसला पत्र लिहून रेकमेंडेड लॉजिंग लिस्ट तुम्ही मिळवू शकता. कन्वेंशन हेडक्वाटर्स ॲड्रेसची माहिती जून २००९ च्या आमची राज्य सेवा अंकात प्रकाशित केली जाईल. पत्राचे उत्तर हवे असेल तर पत्र पाठवताना त्यासोबत तुमचा नावपत्ता लिहिलेले व पोस्टाचे तिकीट लावलेले एक रिकामे पाकीटही पाठवावे.
६. खास गरज असलेला एखादा प्रचारक राहण्याच्या सोयीबाबत मदत मागतो तेव्हा वडिलांनी काय केले पाहिजे?
६. खास गरज असलेले: खास गरज असलेला एखादा प्रचारक राहण्याच्या सोयीबाबत मदत मागतो तेव्हा, तो स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट फॉर्म भरण्यास योग्य आहे का, हे मंडळीच्या सेवा समितीने ठरवावे. त्यांनी फॉर्मवरील तसेच सर्व वडिलांना पाठवलेल्या फेब्रुवारी १४, २००९ पत्रातील सूचना वाचाव्यात आणि त्यानंतरच, मंडळीचे सचीव हे फॉर्म रूमींग डिपार्टमेंटला पाठवतील.
७. (क) हॉटेलचे आरक्षण करण्याआधी आपण काय केले पाहिजे? (ख) हॉटेल व्यवस्थापनाचे आपल्याविषयी चांगले मत राहावे म्हणून आपण कोणत्या सूचनांचे पालन केले पाहिजे? (“हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना” नावाचा चौकोन पाहा.)
७ हॉटेलचे आरक्षण: उपलब्ध असलेल्या सर्व हॉटेलची रेकमेंडेड लॉजिंग लिस्ट मंडळ्यांना मिळेल तेव्हा ती लगेच मंडळीच्या माहिती फलकावर लावली जाईल. हॉटेलचे आरक्षण करण्याआधी कृपया “हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना” नावाचा चौकोन काळजीपूर्वक वाचा. हॉटेलचे आरक्षण करताना:
▪ यादीत दिलेल्या फोन नंबरवर, त्यांच्या कामाच्या वेळांत हॉटेलला फोन करा.
▪ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात हे त्यांना सांगा.
▪ हॉटेलमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी व किती वाजता येणार व रूम कधी सोडणार ते सांगा.
▪ सर्व रूमचे आरक्षण झालेले असेल तर यादीतील दुसऱ्या हॉटेलला फोन करा.
▪ तिथे रूम असेल तर ती आरक्षित करा आणि कन्फर्मेशन नंबर मागा.
▪ रूमच्या डिपॉझीटचे पैसे क्रेडीट कार्ड, चेक किंवा मनी ऑर्डरद्वारे दहा दिवसांच्या आत पाठवा. चेक किंवा मनी ऑर्डरने डिपॉझीटचे पैसे पाठवत असाल तर त्यावर कन्फर्मेशन नंबर लिहा. कधीही रोख रक्कम पाठवू नका.
८. इतरांनाही माफक दरात रुम मिळणे शक्य व्हावे म्हणून आपल्याला काय करता येईल?
८ काहींना आपल्या पसंतीचे हॉटेल हवे असतील. पण, आपण रेकमेंडेड लॉजिंग लिस्ट मध्ये नसलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचे किंवा हॉटेलच्या यादीत दिवसाला ठरवलेल्या रूमच्या भाड्यापेक्षा अधिक पैसे देण्याचे ठरवले तर, पुढच्या वेळी, रूमींग डिपार्टमेंटमधल्या बांधवांना, दिवसाच्या भाड्याविषयी हॉटेलच्या व्यवस्थापनांशी घासाघीस करता येणार नाही. कृपया, तुम्हाला जितक्या खोल्या लागणार आहेत तितक्याच खोल्यांचे आरक्षण करा. आणि, हॉटेलचे आरक्षण झाल्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याकरता मग शेवटल्या मिनिटाला आरक्षण रद्द करू नका. या सर्व बाबतीत तुम्ही सहकार्य दाखवल्यास, इतर सर्वांना, माफक दरात हॉटेलमध्ये रूम मिळणे शक्य होईल.—१ करिंथ. १०:२४.
९. सन २००९ च्या प्रांतीय अधिवेशनाची तयारी करताना व तिथे उपस्थित राहताना कोणत्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व दिले पाहिजे?
९ देवाचे गौरव करणारी कार्ये: आपल्या सर्व कार्यांत म्हणजे, हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांबरोबर व खासकरून अधिवेशन होणाऱ्या शहरातील लोकांबरोबर व्यवहार करताना आपल्या वागण्याबोलण्यातून आपण पवित्र आत्म्याचे फळ प्रदर्शित करतो तेव्हा आपण यहोवाच्या लोकांनी कमावलेले चांगले नाव आणखी सुशोभित करतो व इतरांसाठी अडखळण होण्याचे टाळतो. (१ करिंथ. १०:३१; २ करिंथ. ६:३, ४) अशा सर्व मार्गांनी, २००९ सालच्या प्रांतीय अधिवेशनात तुमच्या उपस्थितीने व आचरणाने देवाचे गौरव होवो!—१ पेत्र २:१२.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाच्या वेळा:
शुक्रवार आणि शनिवार
सका. ९:२० ते संध्या. ४:५५
रविवार
सका. ९:२० - संध्या. ४:००
[४ पानांवरील चौकट]
हॉटेल बुकिंगसंबंधी सूचना:
▪ मार्च २, २००९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील सेवा सभेनंतरच रूम बुक करण्यासाठी हॉटेलशी संपर्क साधावा.
▪ शक्य तितक्या लवकर हॉटेलचे बुकिंग करावे.
▪ केवळ रेकमेंडेड लॉजिंग लिस्ट मध्ये सुचवलेल्या हॉटेलचीच रूम बुक करावी.
▪ यादीत दाखवलेल्या दरापेक्षा जास्त दराने रूम बुक करू नका.
▪ जी व्यक्ती राहणार आहे त्याच व्यक्तीच्या नावाने प्रत्येक रूम बुक करावी.
▪ अग्नीशामक दलाने ठरवलेल्या नियमानुसार एका रूममध्ये एकूण किती प्रौढ व्यक्ती राहू शकतात हे यादीत दाखवलेले असेल. कृपया यासंबंधी हॉटेलच्या नियमांचे पालन करावे.
▪ एकदा बुकिंग केल्यावर ते बदलू नका.—मत्त. ५:३७.
▪ यादीत नसलेल्या हॉटेलशी संपर्क साधून आपल्या अधिवेशनाकरता खास दराने रूम उपलब्ध आहे का अशी चौकशी करू नका.
▪ यादीतील सर्व हॉटेलशी संपर्क साधूनही रूम न मिळाल्यास किंवा एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करताना काही समस्या आल्यास मंडळीच्या सचिवांना याविषयी कळवावे. सचिवांनी मग रेकमेंडेड लॉजिंग लिस्ट यावर दिलेल्या माहितीच्या साहाय्याने अधिवेशनाच्या रूमिंग विभागाशी संपर्क साधावा.
▪ बुकिंग रद्द करायचेच झाल्यास ते लवकरात लवकर करावे व न चुकता कॅन्सलेशन नंबर मागावे.