‘सर्व काही सुवार्तेकरिता करा’
१. एक राज्य प्रचारक काय करण्यास तयार असतो व का?
१ इतरांना सुवार्ता सांगणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रेषित पौलाला वाटले. (१ करिंथ. ९:१६, १९, २३) आपल्यालाही लोकांच्या चिरकालिक कल्याणाची चिंता असल्यामुळे आपण स्वतःहून त्यांच्याकडे सुवार्ता सांगण्यासाठी जातो.
२. प्रचार करताना आपण कोणते फेरबदल करण्यास तयार आहोत व का?
२ लोक असतील तेथे व तेव्हा प्रचार करा: एक अनुभवी कोळी, त्याला स्वतःला सोयीस्कर असते त्या वेळी व त्या ठिकाणी जाळे टाकत नाही तर मासे सापडण्याची जास्त शक्यता असते त्या ठिकाणी व त्या वेळी तो जाळे टाकतो. आपण “माणसे धरणारे” आहोत. तेव्हा, आपल्या क्षेत्रातील लोकांना शोधण्याकरता आपल्याला आपल्या आराखड्यात काही फेरबदल करावे लागतील. असे केल्यास आपल्याला “सर्व प्रकारचे जीव” एकत्र करण्याच्या खास कार्यात भाग घेतल्याचे समाधान मिळू शकेल. (मत्त. ४:१९; १३:४७) संध्याकाळी लोक घरी असतात त्या वेळी आपण घरोघरचे प्रचार कार्य करू शकतो. किंवा मग पहाटे रेल्वे स्टेशनवर अथवा बस स्थानकांवर अनौपचारिक साक्षकार्य करू शकतो. “सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याचे पौलाने ठरवले असल्यामुळे, असे करण्याकरता त्याने मिळेल त्या संधीचा फायदा घेतला.—प्रे. कृत्ये १७:१७; २०:२०, २४, NW.
३, ४. लोकांच्या गरजांनुसार आपण आपल्या सादरतेत बदल कसा करू शकतो व याचा परिणाम काय होईल?
३ गरजेनुसार आपल्या सादरतांमध्ये बदल करा: विशिष्ट प्रकारचे मासे धरायचे असतील तर कोळी बहुतेकदा, मासे पकडण्याच्या पद्धतींत बदल करतात. क्षेत्रांतील लोकांना आवडेल अशा पद्धतीने राज्याची सुवार्ता कशी सांगता येईल? लोकांच्या भावनांची जाणीव बाळगून आपण त्यांना सहसा ज्या गोष्टींची चिंता वाटते अशा एखाद्या विषयावर बोलायला सुरुवात करून मग त्याविषयी त्यांचे काय मत आहे हे लक्ष देऊन ऐकू शकतो. (याको. १:१९) त्यांना बोलते करण्यासाठी आपण एखादा प्रश्न विचारू शकतो. (नीति. २०:५) अशा रीतीने, लोकांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीत आपण सुवार्ता सादर करू शकतो. आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा घरमालक रागावलाच किंवा चिडला तर आपले संभाषण आदरपूर्वक थांबून तेथून लगेच निघून जा. पौल “सर्वांना सर्व काही” झाला. (१ करिंथ. ९:२२) लोकांच्या हृदयापर्यंत पोहंचायचे असेल तर गरजांनुसार आपण आपल्या सादरतेत बदल केला पाहिजे.
४ “शुभवृत्त” विदित करण्याचे कार्य खरोखरच किती आनंदविणारे कार्य आहे! (यश. ५२:७) तेव्हा, होता होईल तितक्या लोकांपर्यंत पोहंचता यावे म्हणून आपण ‘सुवार्तेकरिता सर्व काही’ करू या.—१ करिंथ. ९:२३.