नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज एप्रि.-जून
चर्चला जाणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही बोलत असाल तर असे म्हणू शकता: सर्वांना परिचित असलेल्या या वचनाविषयी तुम्हाला काय वाटतं? [योहान ३:१६ वाचा.] एका माणसाच्या मृत्यूने इतरांना सार्वकालिक जीवन कसे काय मिळू शकते, यावर कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा. पृष्ठ २३ वरील लेख दाखवा.] येशूच्या मृत्यूचा आपल्याला फायदा कसा होतो या प्रश्नाचे स्पष्ट व मनाला समाधान देणारे उत्तर या मासिकात दिलेले आहे.