वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०८ पृ. ४
  • तुम्ही धनवान होऊ शकता!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही धनवान होऊ शकता!
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियर सेवेची प्रतिफळे
    आमची राज्य सेवा—२००३
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?
    आमची राज्य सेवा—१९९९
  • प्रचार करण्याची हीच वेळ आहे!
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ५/०८ पृ. ४

तुम्ही धनवान होऊ शकता!

१. आपण सामान्य पायनियरींग का करू शकतो?

१ तुम्ही अत्यानंद मिळवण्याचा आणि जीवनाचे सार्थक करण्याचा प्रयत्न करत आहात का? इतरांना मदत करण्यात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते का? यहोवाच्या सेवेत वाढ करण्याची तुमची इच्छा आहे का? यापैकीच्या कोणत्याही प्रश्‍नाचे तुमचे उत्तर होय असे असेल तर मग तुम्ही सामान्य पायनियरींग करण्याचा विचार केला पाहिजे. अर्थातच, त्याआधी कौटुंबिक व बायबलमध्ये दिलेल्या इतर जबाबदाऱ्‍यांचा तसेच आपल्या तब्येतीचा आणि शारीरिक मर्यादांचा देखील विचार करण्याची गरज आहे.

२. सामान्य पायनियरांना मिळणाऱ्‍या काही आध्यात्मिक धनाविषयी सांगा.

२ शलमोनाने ईश्‍वर प्रेरणेने केलेली लिखाणे, यहोवाच्या आशीर्वादामुळे भौतिक धन मिळत असल्याचे दाखवतात. (नीति. १०:२२) आज, यहोवाच्या आशीर्वादामुळे खासकरून आध्यात्मिक धन मिळते. या धनाचा सामान्य पायनियरांवर वर्षाव होत आहे. उदाहरणार्थ, ते जेव्हा स्वतःच्या कामातून वेळ काढून अथवा ‘संधी साधून’ इतरांना मदत करतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. (कलस्सै. ४:५; प्रे. कृत्ये २०:३५) प्रेमामुळे ते करत असलेल्या परिश्रमाची यहोवा दखल घेऊन त्यांची कदर करतो. ‘स्वर्गातील अशा संपत्तीचे’ मोल कधीही कमी होणार नाही. (मत्त. ६:२०; इब्री ६:१०) याशिवाय, जेव्हा पायनियर आपला “डोळा निर्दोष” ठेवतात आणि जीवनाश्‍यक गोष्टी यहोवा पुरवेल म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवतात तेव्हा यहोवाबरोबरील त्यांचा नातेसंबंध अधिक मजबूत होतो.—मत्त. ६:२२, २५, ३२; इब्री १३:५, ६.

३. आध्यात्मिक धनाच्या मागे लागणे आणि भौतिक धनाच्या मागे लागण्यात कोणता फरक आहे?

३ भौतिक धनसंपत्तीच्या मागे लागल्याने अनेक लोक बहुतेकदा “मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीम. ६:९, १०; याको. ५:१-३) पण यहोवा देत असलेल्या आशीर्वादाने असे कधीच होत नाही. सामान्य पायनियर आपला बहुतेक वेळ सेवेत घालवत असल्यामुळे त्यांना आध्यात्मिक तोल सांभाळण्यास आणि अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत होते. (फिलिप्पै. १:१०) एका बांधवाने पायनियर बनण्यासाठी तो इंजिनियर म्हणून करत असलेले वेळखाऊ काम सोडून दिले. त्याने म्हटले: “या कामामुळे माझ्यावर खूप ताण यायचा. पण पायनियरींगमुळे असं होत नाही. आता मी लोकांना मदत करतो, त्यांना बायबलचं सत्य शिकवतो. सत्य स्वीकारण्यास लोकांना मदत करणं हे खूप समाधान देणारं आणि माझ्या आवडीचं काम आहे.”

४. सामान्य पायनियरांच्या कार्यामुळे त्यांना व इतरांनाही कशा प्रकारे आशीर्वाद मिळतात?

४ इतरांना आशीर्वाद: आज सर्वांनाच ‘कठीण दिवसाला’ तोंड द्यावे लागते. (२ तीम. ३:१) लोक कुठेही राहात असले तरी त्यांना आशेची अत्यंत गरज आहे. आशाहीन लोक राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देत असल्याचे राज्य प्रचारक पाहतात तेव्हा त्यांना आनंद होतो. पण यापेक्षाही अधिक आनंद सामान्य पायनियरांना होतो जे दर वर्षी जीवन वाचवणाऱ्‍या कार्यात ८०० पेक्षा अधिक तास खर्च करतात.—१ तीम. ४:१६.

५, ६. सामान्य पायनियर बनण्यास कोणती गोष्टी तुम्हाला मदत करेल?

५ सामान्य पायनियर म्हणून सेवा करण्याचा तुम्ही गंभीरपणे विचार करत आहात का? यासाठी तुम्हाला कमी महत्त्वाच्या गोष्टीतून ‘वेळ काढून त्याचा सदुपयोग’ करावा लागेल. (इफिस. ५:१५, १६) अनेकांनी असे केले आहे आणि आपले राहणीमान साधेसुधे केले आहे. यामुळे त्यांना नोकरीच्या वेळेत कपात करून राज्याच्या कार्यात अधिक वेळ देता आला आहे. त्यांच्यासोबत कार्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामात काही फेरबदल करू शकता का?

६ व्यावहारिक आराखडा बनवण्याकरता बुद्धी मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करा. (याको. १:५) यामुळे कोणते आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू शकता? भरपूर प्रमाणात आध्यात्मिक धनसंपत्ती! यहोवा तुमच्या भौतिक गरजा देखील पुरवेल. (मत्त. ६:३३) जे लोक या प्रकारे यहोवाला पारखतात त्यांना तो “जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” देईल.—मला. ३:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा