मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जुलै १
“वेगवेगळ्या समाजांतील व वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक शांतीने नांदू शकतात असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या विषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे दाखवणारे प्राचीन ग्रंथातले एक वचन मी तुम्हाला दाखवू इच्छितो. [प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा व त्यानंतर पृष्ठ ३ वरील लेख उघडून दाखवा.] या लेखात सांगितले आहे की अशाप्रकारची एकता कशी काय अस्तित्वात येईल.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“पैशांची गरज सर्वांनाच असते. पण कधीकधी माणूस पैसा कमवण्याविषयी नको तितकी काळजी करतो असे तुम्हाला वाटत नाही का? [उत्तर ऐकून घ्या.] पैशाच्या मागे लागल्यामुळे काय परिणाम होतो याविषयी यात काय म्हटले आहे पाहा. [१ तीमथ्य ६:१० वाचा.] साधे राहणीमान ठेवून कमी पैशातही आपण कसा उदरनिर्वाह करू शकतो याविषयी या नियतकालिकात काही व्यवहारोपयोगी सूचना दिल्या आहेत.”
टेहळणी बुरूज ऑग. १
“बरेच लोक जीवनात आनंदी होण्याकरता आध्यात्माचा ध्यास घेतात. याविषयी तुमचे काय मत आहे? [उत्तर ऐकून घ्या.] एक प्राचीन नीतिसूत्र काय म्हणते ते पाहा. [नीतिसूत्रे ४:१०-१२ वाचा.] या मासिकात, खऱ्या आध्यात्माविषयी बायबल काय सांगते आणि आपण ते कसे मिळवू शकतो याविषयी सांगितले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“अलीकडे घटस्फोटांचे प्रमाण बरेच वाढले आहे. साहजिकच, विवाह जोडीदाराची विचारपूर्वक निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य निवड करण्यास कोठून मार्गदर्शन मिळू शकेल? [उत्तर ऐकून घ्या.] या प्राचीन ग्रंथातील नीतिसूत्राचा अनेकांना फायदा झाला आहे. [नीतिसूत्रे २२:३ वाचा आणि मग पृष्ठ १६ वरील लेख दाखवा.] या लेखात योग्य विवाह जोडीदाराची निवड करण्याकरता सहायक ठरू शकेल अशी बरीच माहिती दिली आहे.”