आपल्याला मिळालेल्या बहुमानांची आपण खूप कदर करतो
१ मानव जेव्हापासून अस्तित्वात आला आहे तेव्हापासून यहोवाने आपल्या सेवकांना वेगवेगळ्या प्रकारचे बहुमान दिले आहेत. हे बहुमान देताना त्याने स्त्रीपुरुष असा भेदभाव केला नाही, वयाची तमा बाळगली नाही किंवा समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे याकडे लक्ष दिले नाही. (लूक १:४१, ४२; प्रे. कृत्ये ७:४६; फिलिप्पै. १:२९) आज तो आपल्याला कोणते बहुमान देतो?
२ आपल्याला मिळालेले काही बहुमान: आपल्याला यहोवाकडून शिक्षण प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला आहे. (मत्त. १३:११, १५) मंडळीच्या सभांमध्ये आपल्या टिपणींद्वारे यहोवाची स्तुती करण्याचा आणखी एक बहुमान आपल्याला लाभला आहे. (स्तो. ३५:१८) जेव्हा आपल्याला उत्तर देण्याची संधी मिळते तेव्हा आपण अगदी आवेशाने उत्तर देतो. तसेच, मंडळीत आपल्याला मिळणारी प्रत्येक नेमणूक ही एक बहुमान आहे असे जर आपण समजले तर आपण ती नेमणूक आपल्या परीने होता होईल तितक्या चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. राज्य सभागृह स्वच्छ करण्याचा व तो सुस्थितीत ठेवण्याचा आपल्याला बहुमान मिळतो तेव्हा आपण त्यात नियमितरीत्या भाग घेतो का?
३ जगातील बहुतांश लोकांना, देव आपल्या प्रार्थना ऐकतो की नाही, अशी शंका असते. परंतु आपल्याला एक अनोखी देणगी मिळाली आहे. विश्वातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आपल्या प्रार्थना ऐकते; ही देणगीच नव्हे का? (नीति. १५:२९) यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना जातीने ऐकतो. (१ पेत्र ३:१२) आपण त्याला कशी प्रार्थना केली पाहिजे याबाबतीत तो आपल्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लादत नाही. “सर्व प्रसंगी” प्रार्थना करण्याची आपल्याला मिळालेल्या देणगीची आपण किती कदर करतो!—इफिस. ६:१८.
४ “देवाचे सहकारी”: आपल्याला मिळालेल्या बहुमानांपैकी सर्वात उत्तम बहुमान म्हणजे, “देवाचे सहकारी” या नात्याने त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणे. (१ करिंथ. ३:९) हे असे कार्य आहे ज्यातून आपल्याला समाधान मिळते आणि तजेलाही मिळतो. (योहा. ४:३४) तसे पाहायला गेलो तर हे काम पूर्ण करण्यासाठी यहोवाला मानवांचा उपयोग करण्याची गरज नाही, तरीपण आपल्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून त्याने आपल्याला हे काम दिले आहे. (लूक १९:३९, ४०) आणि यहोवाने हे काम वाटेल त्याला दिलेले नाही. राज्याची सुवार्ता सांगण्याचे काम ज्यांना मिळाले आहे त्यांनी काही विशिष्ट आध्यात्मिक अटी पूर्ण केल्या पाहिजेत. (यश. ५२:११) या सेवेला आपल्या सप्ताहाच्या नित्यक्रमाचा एक भाग बनवून आपण हे दाखवतो का, की आपल्याला या बहुमानाची कदर आहे?
५ यहोवाकडून मिळालेल्या बहुमानांमुळे आपले जीवन समाधानकारक बनते. (नीति. १०:२२) या बहुमानांना केव्हाही कमी लेखू नका. त्यांची कदर करून आपण आपला स्वर्गीय पिता जो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देतो त्याला संतुष्ट करतो.—याको. १:१७.