मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जून १
“जवळजवळ दररोजच आपण दुष्ट कृत्ये करणाऱ्यांविषयीच्या बातम्या ऐकतो. [एखादे अलीकडचे ओळखीचे उदाहरण द्यावे.] या लोकांना एखादी अज्ञात दुष्ट शक्ती तर ही कृत्ये करण्यास प्रवृत्त करत नसावी? याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग प्रकटीकरण १२:१२ वाचा.] या मासिकात सांगितले आहे की आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो.”
सावध राहा! एप्रि.-जून
“रोगांशी लढण्यात वैद्यकीय शास्त्राने बरीच प्रगती केली आहे पण जगातून रोगराई कधी पूर्णपणे नाहीशी होईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात सांगितले आहे की एक दिवस असा येईल जेव्हा पृथ्वीवर राहणारी प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण आरोग्याचा आनंद घेईल. याविषयीचे अभिवचन या वचनात दिले आहे.” यशया ३३:२४ वाचा.
टेहळणी बुरूज जुलै १
“लोकांना कधीकधी जातीच्या, राष्ट्राच्या किंवा भाषेच्या नावाखाली वाईट वागणूक दिली जाते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] याठिकाणी त्याचे कारण दिलेले आहे पाहा. [१ योहान ४:२० वाचा.] जातीय एकता येणे शक्य आहे का या प्रश्नाचे उत्तर या मासिकात दिले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“जगाच्या बऱ्याच भागांत लोकांचे असे मत आहे की अलीकडे नैतिक मूल्ये घसरत चालली आहेत. तुमच्याही हे पाहण्यात आले आहे का? [उत्तर ऐकून घ्या] सध्या दिसणाऱ्या या परिस्थितीविषयी प्राचीन काळातच भाकीत करण्यात आले होते. [२ तीमथ्य ३:२-४ वाचा.] हा नैतिक ऱ्हास कशाचा संकेत आहे आणि तो मानवजातीला कोणत्या दिशेने नेत आहे याविषयी या मासिकात खुलासा केला आहे.”