वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०७ पृ. १-७
  • “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य”
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • धीर धरणाऱ्‍यास प्रतिफळ मिळेल
    आमची राज्य सेवा—२००४
  • परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ७/०७ पृ. १-७

“जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य”

१ यहोवाच्या सर्व उपासकांना परीक्षांना तोंड द्यावे लागते. (२ तीम. ३:१२) कधी या परीक्षा आजारपणाच्या रूपात, तर कधी आर्थिक समस्या, मोह, छळ किंवा इतर रूपांत येऊ शकतात. सैतान आपल्यावर निरनिराळ्या परीक्षा आणतो तेव्हा त्याचा हाच उद्देश असतो, की आपण यहोवाच्या सेवेत धीमे व्हावे, ख्रिस्ती सेवाकार्याकडे दुर्लक्ष करावे, किंवा, देवाची सेवा करण्याचेच सोडून द्यावे. (ईयो. १:९-११) पण परीक्षेत टिकून राहिल्यामुळे आपण कोणत्या अर्थाने धन्य किंवा आनंदी ठरतो?—२ पेत्र २:९.

२ परीक्षांना तोंड देण्याकरता स्वतःला तयार करा: यहोवाने त्याचे सत्य वचन आपल्याकरता पुरवले आहे. यात येशूच्या जीवनाविषयी व त्याच्या शिकवणुकींविषयी आपल्याला वाचायला मिळते. आपण येशूच्या शब्दांकडे लक्ष देतो व त्यांनुसार वागतो तेव्हा आपण जणू एक मजबूत पाया बांधत असतो आणि अशारितीने परीक्षांना तोंड देण्याकरता स्वतःला तयार करत असतो. (लूक ६:४७-४९) तसेच, ख्रिस्ती बांधव, मंडळीच्या सभा आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेली बायबल आधारित प्रकाशने या देखील यहोवानेच आपल्याकरता पुरवलेल्या तरतुदी आहेत आणि त्यांपासूनही आपल्याला बळ मिळते. यांसोबतच, देवाने पुरवलेल्या प्रार्थनेच्या देणगीचाही आपण पुरेपूर फायदा घेतो.—मत्त. ६:१३.

३ यहोवाने आपल्याला एक आशा देखील दिली आहे. आणि जेव्हा आपण यहोवाच्या प्रतिज्ञांवर आपला दृढ विश्‍वास वाढवतो तेव्हा ही आशा आपल्याकरता, ‘स्थिर व अढळ [असा] जीवाचा नांगर’ बनते. (इब्री ६:१९) बायबल काळांत, कोणतेही जहाज अगदी चांगल्या हवामानातही, नांगर सोबत घेतल्याशिवाय कधीही बंदरातून निघत नसे. अचानक वादळ आल्यास, नांगर समुद्रात टाकले जाई. यामुळे जहाज किनाऱ्‍यावरील खडकांवर आदळण्यापासून वाचत असे. त्याचप्रकारे, आताच देवाच्या प्रतिज्ञांवर आपल्या मनात पक्का विश्‍वास उत्पन्‍न केल्यामुळे, वादळांसारख्या समस्या येतील तेव्हा हा विश्‍वास आपल्याला स्थैर्य देईल. कधीकधी समस्या अगदी अचानक येऊ शकतात. उदाहरणार्थ, पौल व बर्णबा यांच्या प्रचार कार्याला लुस्रा येथे सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण यहुदी विरोधक आल्यावर परिस्थिती अचानक बदलली.—प्रे. कृत्ये १४:८-१९.

४ टिकून राहिल्याने आनंद मिळतो: विरोधाला तोंड द्यावे लागले तरी आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यात खंबीर राहिल्याने आपल्याला मनाची शांती लाभते. ख्रिस्ताच्या नावासाठी आपल्याला अपमानास पात्र ठरविले जाते तेव्हा आपण यात आनंद मानतो. (प्रे. कृत्ये ५:४०, ४१) परीक्षांना तोंड दिल्याने आपल्याला नम्रपणा, आज्ञापालन व धीर यांसारखे उत्तम गुण आणखी चांगल्याप्रकारे आत्मसात करण्यास साहाय्य मिळते. (अनु. ८:१६; इब्री ५:८; याको. १:२, ३) तसेच याप्रकारचे अनुभव आपल्याला यहोवावर अधिक पूर्णपणे विसंबून राहण्यास, त्याच्या प्रतिज्ञांवर भरवसा ठेवण्यास व त्याला आपले शरणस्थान बनवण्यास शिकवतात.—नीति. १८:१०.

५ परीक्षा या तात्पुरत्या काळासाठी आहेत हे आपल्याला माहीत आहे. (२ करिंथ. ४:१७, १८) आणि या परीक्षा आपल्याला, यहोवावर आपण किती मनापासून प्रेम करतो हे प्रदर्शित करण्याची संधी देतात. परीक्षेत टिकून राहिल्याने आपण सैतानाच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणूनच आपण हिंमत न हारता परीक्षांना तोंड देतो! ‘जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण परीक्षेत उतरल्यावर त्याला जीवनाचा मुगूट मिळेल.’—याको. १:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा