वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. १२
  • घरोघर साक्ष देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरोघर साक्ष देणे
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • जाहीरपणे व घरोघरी शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • प्रीतीच्या दोन सर्वथोर वक्‍तव्यासंबंधाने रसिकता दाखविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • खंड पडू न देता घरोघरी जाणे
    आमची राज्य सेवा—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. १२

घरोघर साक्ष देणे

१. घरोघरच्या सेवाकार्यासंबंधाने कोणता प्रश्‍न उद्‌भवतो आणि का?

१ “विविध मार्गांनी सत्याचा प्रसार करण्याचा अनुभव असणारे, हे मान्य करतील की मिलेनियल डॉनच्या साहाय्याने घरोघरचा प्रचार करणे हा सध्यातरी सत्याचा प्रचार करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे.” हे विधान आहे झायन्स वॉच टावरच्या जुलै १, १८९३ अंकातले. घरोघरचे सेवाकार्य किती महत्त्वाचे आहे हेच या विधानावरून दिसून येते. आज जगभरातील लोक याला यहोवाच्या साक्षीदारांचे ओळखचिन्ह मानतात. सध्याच्या काळात, बऱ्‍याच देशांत लोकांना त्यांच्या घरी भेटणे मुश्‍किल होत चालले असताना, प्रचार करण्याची ही पद्धत आजही परिणामकारक आहे का?

२. घरोघरचे साक्षकार्य करण्यास कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?

२ शास्त्रवचनांनुसार व महत्त्वपूर्ण: घरोघरचे साक्षकार्य करण्यास शास्त्रवचनांचा आधार आहे. येशूने आपल्या ७० शिष्यांना दोघादोघांच्या जोडीने लोकांच्या घरी जाण्यास सांगितले होते. (लूक १०:५-७) येशूच्या मृत्यूच्या थोड्याच काळानंतर, बायबलमध्ये त्याच्या शिष्यांविषयी असे सांगितले आहे: “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२) प्रेषित पौलानेही मोठ्या आवेशाने घरोघर जाऊन शिकवले.—प्रे. कृत्ये २०:२०.

३. घरोघर साक्षकार्य करण्याचे काही फायदे कोणते?

३ घरोघरचे साक्षकार्य हे आजही सुवार्तेचा प्रचार करण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. घरोघर गेल्यामुळे आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीने योग्य मनोवृत्तीच्या लोकांना ‘शोधून काढणे’ शक्य होते. (मत्त. १०:११) लोक बाहेरच्यापेक्षा, आपल्या घरात सहसा जास्त निवांत असतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष, समोरासमोर बोलल्यामुळे, त्यांच्या हावभावांचे व आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केल्यामुळे, आपल्याला त्यांचे जिव्हाळ्याचे विषय समजून घेण्यास मदत मिळते. आणि सहसा घरी भेट दिल्यामुळे जास्त वेळापर्यंत संभाषण करण्याची उत्तम संधी आपल्याला मिळते.

४. घरोघरच्या साक्षकार्यातून अधिक चांगले परिणाम मिळवण्याकरता आपण काय करू शकतो?

४ वैयक्‍तिक जीवनात तडजोड करणे: प्रेषित पौल “सुवार्तेकरिता” आपल्या वैयक्‍तिक जीवनात तडजोडी करण्यास तयार होता. (१ करिंथ. ९:२३) आपणही, लोक सहसा घरी सापडतात अशावेळी, उदाहरणार्थ, संध्याकाळी, अथवा शनिवार-रविवारच्या सुटीत किंवा सुटीच्या दिवशी त्यांना भेटण्याकरता आपल्या प्रचाराच्या वेळापत्रकात आवश्‍यक फेरबदल करू शकतो. जे लोक घरी भेटले नाहीत अशांची नोंद करून ठेवा आणि दुसऱ्‍या एखाद्या दिवशी अथवा वेळी त्यांची भेट घेण्याचा पुन्हा प्रयत्न करा.

५. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनाही घरोघरच्या साक्षकार्यात कशाप्रकारे सामील केले जाऊ शकते?

५ ज्यांचे आरोग्य तितके चांगले राहात नाही ते सुद्धा घरोघरच्या प्रचार कार्यात सहभाग घेऊ शकतील. शक्य असल्यास, जेथे जास्त चालावे लागणार नाही किंवा जिना चढावा लागणार नाही अशा परिसरात आपल्यासोबत घरोघरचे कार्य करण्याकरता आपण अशा व्यक्‍तींना नेऊ शकतो. एका बहिणीला धाप लागायची, त्यामुळे तिला दर अर्ध्या तासाला फक्‍त एका घरी बोलता यायचे. पण तिलाही गटातल्या इतरांसोबत प्रचार कार्यात जाता आले तेव्हा तिला किती आनंद झाला!

६. आपण आपल्या सेवाकार्यात घरोघरच्या साक्षकार्याकरता नियमित वेळ का काढला पाहिजे?

६ आजही घरोघरच्या साक्षकार्यात बरेच मेंढरांसमान लोक सापडतात. एका प्रचारकाने एका घराचे दार वाजवले तेव्हा आतून आवाज आला: “आत या. मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. मी देवाला प्रार्थना करत होतो की मला साहाय्य करायला त्याने कोणालातरी पाठवावे, आणि इतक्यात तुम्ही दार वाजवले. त्यानेच माझी प्रार्थना ऐकून तुम्हाला पाठवले आहे.” अशाप्रकारच्या विलक्षण अनुभवांवरून खात्री पटते की प्रचाराच्या या पद्धतीवर यहोवाचा आशीर्वाद आहे. (मत्त. ११:१९) आपल्या सेवाकार्यात घरोघरच्या साक्षकार्याकरता नियमित वेळ काढा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा