वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. १२
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. १२

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज सप्टें. १

“आपण बरेचदा देवाला प्रार्थना करतो. पण आपल्या प्रार्थना देवाने स्वीकाराव्यात म्हणून आपण काय केले पाहिजे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या, मग स्तोत्र १४१:२ वाचा. मग पृष्ठ २२ वरील लेख उघडून दाखवा.] या लेखात सांगितले आहे की आपण कशाप्रकारे प्रार्थना केल्यास, देव त्या स्वीकारेल.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“काही लोकांचे असे म्हणणे आहे की आजच्या जगात प्रगती करायची असेल तर तुम्हाला, वेळप्रसंगी इतरांना खाली पाडून पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी लागते. याउलट येशूने कोणता सल्ला दिला याकडे लक्ष द्या. [मत्तय ५:५, ९ वाचा.] तुम्हाला हे पटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात शांतीप्रिय असण्याचे तीन फायदे सांगितले आहेत.” पृष्ठ २८ वर सुरू होणारा लेख दाखवावा.

टेहळणी बुरूज ऑक्टो. १

“मला तुम्हाला एक वचन वाचून दाखवायचे आहे. हे वचन बऱ्‍याच विवाहित जोडप्यांना सहायक ठरले आहे. [इफिसकर ५:३३ वाचा.] आपले कौटुंबिक जीवन सुधारण्याकरता आपण या वचनातील सल्ल्याचा कशाप्रकारे अवलंब करू शकतो? तुम्हाला याविषयी काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या आणि मग पृष्ठ ७ वरील लेख उघडा.] या लेखात काही व्यवहार्य सूचना दिल्या आहेत ज्या बऱ्‍याच जणांना उपयोगी पडल्या.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“बऱ्‍याच लोकांना प्रश्‍न पडतो की देवावर विश्‍वास ठेवणे विज्ञानाशी सुसंगत आहे किंवा नाही. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग इब्री लोकांस ३:४ वाचा.] सावध राहाच्या! या विशेषांकात काही पुराव्यांचे परीक्षण केलेले आहे ज्यांनी काही वैज्ञानिकांनाही निर्माणकर्त्यावर विश्‍वास ठेवण्यास भाग पाडले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा