प्रीतीच्या दोन सर्वथोर वक्तव्यासंबंधाने रसिकता दाखविणे
“पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो.”—१ योहान ४:१९.
१. येशूने आम्हासाठी कोणते उदाहरण घालून दिले?
यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी आम्हासंबंधाने व्यक्त केलेल्या थोर प्रीतीबद्दल आम्हाला चांगली रसिकता कशी व्यक्त करता येईल? याचा सर्वप्रथम मार्ग येशूचे अनुकरण करणे हा आहे. त्याने आपल्या पित्याचे नाम व राज्य या विषयी अविश्रांतपणे साक्षीचे कार्य केले. (१ पेत्र २:२१) हे कार्य त्याने घरोघरी, सभा स्थान, मंदीर, डोंगर, समुद्र किनारा या ठिकाणी केले. तर आता जे नऊ विविध मार्ग आपल्यासाठी खुले आहेत त्याचा आपण विचार करू या.
घरोघरचे कार्य
२. घरोघरच्या कार्यात तुम्हाला कसे टिकून राहता येईल?
२ आम्ही आपले प्रेम व रसिकता दाखवू शकू असा पहिला व स्पष्ट मार्ग म्हणजे घरोघरी देवाच्या राज्याची सुवार्ता नेणे. यासाठी बोलण्यात मोकळेपणा असावयास हवा कारण यामध्ये लोकांचा थेट संपर्क येत असतो आणि यापैकीचे बहुतेकजण आमच्याकडे पीडा या अर्थी पहात असतात. या कारणास्तव लोक बेपर्वा, त्रास देणारे, तिरस्कार दाखविणारे व छळ देणारे असले तरी घरोघरी जाण्यासाठी आम्हाठायी देवावरील व शेजाऱ्यावरील खरी प्रीती असणे जरूरीचे आहे.—पडताळा यहेज्केल ३:७–९.
३. घरोघरचे कार्य करण्याविषयी तुम्हापाशी कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?
३ शुभवर्तमान अहवालातील येशूने १२ प्रेषितांना तसेच ७० सुवार्तिकांना दिलेल्या सूचना स्पष्टपणे हे सूचित करतात की त्यांना देवाच्या राज्याचा सुवार्तेचा प्रसार घरोघरी करावयाचा होता. (मत्तय १०:५–१४; लूक १०:१–७) प्रे. कृत्ये २०:२० मध्ये पौल स्वतः घरोघरी गेल्याचे सांगतो. ते शब्द त्याने मेंढपाळकत्वाच्या अनुषंगाने ज्या भेटी दिल्या गेल्या त्याजविषयी सांगत असले तरी २१वे वचन जे कार्य केले गेले त्याबद्दल कसलाहि संशय ठेवीत नाही कारण पौल म्हणतो: “पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व हेल्लेणी ह्यांस मी साक्ष देत होतो.” मेंढपाळकत्वाच्या भेटी घेतल्या जातात त्यावेळी वडील साधारणतः ‘देवाकडे पश्चाताप व येशूवर विश्वास’ याविषयी आर्जवीत नसतो. उलटपक्षी तो बंधूंना सभा किंवा क्षेत्रकार्य याविषयीच्या रसिकतेविषयी वाढ करण्याबद्दल बोलत असतो वा त्यांच्या व्यक्तिगत समस्यांविषयीची मदत देत असतो.
४. घरोघरच्या प्रचारकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन आम्हाला कशामुळे मिळते?
४ घरोघरी जाण्याविषयीचा शास्त्रवचनीय आधार तर आहेच पण सोबत या कार्याद्वारे जी फलप्राप्ती मिळते त्याद्वारे यहोवाचे आशीर्वाद त्यावर आहेत हे सुस्पष्ट होते. होय, “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) घरोघरी प्रचारकार्य करणाऱ्यांना दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाचा पुरावा आढळला तो असा की, धार्मिकतेसाठी क्षुधित व तृषित असणाऱ्या लोकांकडे त्यांना निरविण्यात आले. घर मालकाने म्हटले की तो किंवा ती मदतीसाठी प्रार्थना करीत होती व त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर साक्षीदारांनी दिलेल्या भेटीमुळे मिळाले.
५. आमच्या घरोघरच्या उपाध्यपणासाठी कोणते सुंदर मार्गदर्शक उपलब्ध आहे व ते कोणत्या विविध मार्गी आम्हाला मदत देऊ शकते?
५ रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स या पुस्तकाच्या प्राप्तीमुळे आम्हाला क्षेत्रकार्यात केवढी मदत लाभली आहे बरे! त्यात पवित्र शास्त्रीय चर्चेकरता पुष्कळ अपीलदायक प्रस्तावना आहे तसेच विविध शास्त्रवचनीय व धार्मिक विषयाबद्दलची उपयुक्त माहिती आहे. तद्वत, ते स्वतःबरोबर नुसते नेऊ नका तर त्याचा वापर करा. या मूल्यवान क्षेत्र कार्य मार्गदर्शकाबद्दल खासपणे पायनियरांनी मोठी रसिकता व्यक्त केली आहे. तर मग या पुस्तकाचा पूर्णरूपाने व अधिक परिणामकारकरित्या वापर करून तुम्ही देवाच्या प्रीतीविषयीची रसिकता व्यक्त कराल का?
६. राज्याचा संदेश घरोघरी घेऊन जाण्यामुळे आम्हाला कोणत्या व्यक्तिगत फायद्यांची प्राप्ती होते?
६ घरोघरच्या उपाध्यपणाच्या कार्यात सहभागी होण्यामुळे आम्हाला व्यक्तिगतरित्या फायदा मिळतो ही गोष्ट आम्ही नजरेआड होऊ देऊ नये. आमच्या विश्वासानुरूप आम्ही ख्रिस्ती या अर्थी कार्य करतो त्यावेळी तो अधिक दृढ होतो; आम्ही विश्वसनीयरित्या बोलतो त्यावेळी त्याला बळकटी येते. आमची स्वतःची आशा तेजोमय झाल्याविना आम्हाला आमच्या आशेविषयी इतरांना सांगता येणार नाही. गलतीकरास पत्र ५:२२, २३ मध्ये ज्या आत्म्याच्या फळांविषयीचा उल्लेख आहे त्यांची जोपासना घरोघरच्या उपाध्यपणात नियमाने सहभागी होण्यामुळे अधिक चांगल्या प्रकाराने होते. ते तसेच घडते कारण पवित्र शास्त्र आपल्याला हमी देते: “औदार्यशील माणूस समृद्ध होतो. जो इतरांना ताजेपणा आणतो त्यालाहि तजेला आणला जाईल.”—नीतीसूत्रे ११:२५, न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन.
पुनर्भेटी घेणे
७, ८. आम्ही कोणत्या तर्कशुद्ध व व्यवहारिक कारणांस्तव पुनर्भेटी घेण्यास हव्या?
७ देव आणि ख्रिस्त यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल योग्य तो प्रतिसाद दाखविण्याचा दुसरा मार्ग, ज्यांनी राज्य संदेशाविषयी आधी आस्था दाखवली अशा लोकांच्या पुनर्भेटी घेणे. पौल व बर्णबा यांना, त्यांनी प्रचार केलेल्या लोकांविषयीची काळजी वाटत होती. (प्रे. कृत्ये १५:३६) वस्तुतः सातत्य आम्हाला पुनर्भेटी घेण्याची गरज दाखविते. घरोघरी औपचारिकपणे साक्षीकार्य करताना किंवा रस्त्यावर लोकांच्या भेटी घेताना आपण “आध्यात्मिक गरजांची जाणीव असणारे” लोक शोधीत असतो. (मत्तय ५:३) अशांना, लाक्षणिकरित्या आध्यात्मिक पाण्याचा एकच पेला दिला किंवा आध्यात्मिक भाकरीचा चतकोर तुकडा दिला तर ते त्यांना पुरणार नाही हे उघड आहे. जीवनाच्या मार्गावर राहण्यासाठी त्यांना आधिक मदत दिली गेली पाहिजे.
८ आमच्या पहिल्या प्रयत्नांना सत्याच्या बीजाचे रोपण करण्याची उपमा देता येईल. तथापि, १ करिंथकर ३:६, ७ मध्ये पौलाने सुचविल्याप्रमाणे अधिक करण्याची गरज आहे. त्याने केलेले बीजारोपण पुरेसे नव्हते. त्याला पाणी हवे होते जे अप्पुलोसाने दिले. त्यानंतर मात्र त्याची वाढ करण्याविषयी देवावर विसंबून राहता येऊ शकत होते. कार्याचा हा प्रकार बहुतेकांद्वारे दुर्लक्षिला जातो, पण तेच इतरांना ख्रिस्ती उपाध्यपणातील हा प्रकार अगदी सोपा वाटतो. ते का बरे? कारण ज्या लोकांना आपण परत भेटत असतो त्यांनी आधी थोडी फार आस्था दाखविलेली असते.
घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे
९. पवित्र शास्त्राचा अभ्यास चालविणे हे आमचे ध्येय का असावे?
९ राज्य संदेशाविषयी आस्था व्यक्त करणाऱ्या लोकांना नियमितरित्या पुनर्भेटी दिल्या गेल्या तर त्याचे पर्यवसान घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास करण्यात होतो. हा आमची रसिकता व्यक्त करण्याचा तिसरा मार्ग आहे. हा आमच्या उपाध्यपणातील अत्यंत आनंददायी व प्रतिफळदायक प्रकार खराच ठरू शकतो. ते का? लोक पवित्र शास्त्राचा सत्याच्या ज्ञानात व रसिकतेत वाढत आहेत, आपल्या जीवनात आवश्यक असणारे बदल करीत आहेत हे पाहणे तसेच त्यांना देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःचे समर्पण करू देण्यापर्यंत साहाय्य देणे व त्यांचा बाप्तिस्मा झालेला पाहणे किती आनंदाचे आहे! अशा लोकांना खरेपणाने आमची आध्यात्मिक मुले व आम्ही त्यांचे आध्यात्मिक पालक या अर्थी बघता येईल.—पडताळा १ करिंथकर ४:१४, १५; १ पेत्र ५:१३.
१०. घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याच्या मोलाविषयी कोणते नमुनेदार उदाहरण दाखविता येईल?
१० एक नमुनेदार उदाहरण लक्षात घ्या. कॅरिबियन द्वीपात घरोघरचे साक्षीकार्य करणाऱ्या एका मिशनऱ्याला एक हिप्पी जोडपे भेटले. त्यांचे घर पाहिले तर नुसती अस्ताव्यस्तता दिसत होती. तरी त्यांनी आस्था व्यक्त केली. एक पवित्र शास्त्र अभ्यासाचे साहित्य देण्यात आले व या जोडप्याबरोबर पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला. या जोडप्याचा कायदेशीर विवाह झाला नव्हता. त्यांना खूप मुले होती. अभ्यास प्रगतिपथावर आला तसतसे ते घर नीटनीटके व ते जोडपे आणि त्यांची मुलेसुद्धा टापटीप दिसू लागली. लवकरच त्या जोडप्याने स्वतःचा कायदेशीर विवाह व्हावा अशी मिशनऱ्यापुढे इच्छा व्यक्त केली. यामुळे त्यांचा बाप्तिस्मा होण्याचा मार्ग मोकळा झाला. मग एके दिवशी या नव्या बंधूने वाहन चालविण्याचा आपला पहिलाच परवाना मिशनऱ्याला आनंदाने दाखविला. होय, कारण यहोवाचा साक्षीदार बनण्याआधी त्याने विवाह कायदेशीररित्या नोंदला जावा तसेच वाहन चालविण्याचा परवाना असावा याबद्दल कसलीही काळजी दाखवली नव्हती, पण आता तो देवाचे व कैसराचे कायदे पाळत होता.
रस्त्यावरचे साक्षीकार्य
११, १२. (अ) रस्त्यावरील साक्षीकार्यात सहभागी होण्याविषयी आम्हाला कोणते शास्त्रवचनीय प्रोत्साहन आहे? (ब) कोणत्या कारणांमुळे आम्ही ते करावे?
११ देव व ख्रिस्त यांनी आमच्यासाठी जे केले आहे त्याविषयी आमची रसिकता दाखविण्याचा चवथा मार्ग आहे रस्त्यावरचे साक्षीकार्य. आम्ही यात सहभागी होतो तेव्हा नीतीसूत्रे १:२०, २१ची खरीखुरी पूर्णता करण्यात समाविष्ट होतो: “खरे ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यावर आपली वाणी उच्चारिते. गज बजलेल्या रस्त्यांच्या नाक्यावर, वेशीच्या दारात, घोषणा करते.”
१२ राज्य प्रचाराच्या या प्रकारात नियमितरित्या सहभागी होण्याची कित्येक चांगली कारणे आहेत. कित्येक ठिकाणी आता लोकांना त्यांच्या घरी भेटणे अधिक मुष्किलीचे होत आहे. ते मनोरंजन, बाजारहाट व कामे यात गुंतलेले असतात. याशिवाय बहुतेक लोक अशा मोठमोठ्या इमारतीत राहतात जेथे त्यांची भेट घेणे शक्य नसते, तसेच पुष्कळ हॉटेल्सच्या लॉजिंगमध्ये राहतात. पण रस्त्यावर बहुधा लोक दिसतातच.
१३. रस्त्यावरील साक्षीकार्यामुळे कोणते परिणाम प्राप्त होतात? विवेचीत करा.
१३ अमेरिकेतील एक वडील सध्या चार घरगुती पवित्र शास्त्राभ्यास चालवितात ज्यांचा संपर्क त्यांना रस्त्यावरील साक्षीकार्याच्या हालचालीमुळे घडू शकला. अर्थातच ते रस्त्यावर मूकपणे उभे रहात नाहीत. (काही देशात रस्त्यावर मूक उभे राहण्यासाठी कायदा परवानगी देऊन आहे) उलटपक्षी मित्रत्वाचे स्मित व उत्साहपूर्ण आवाजात ते उभे असलेल्या, बससाठी थांबून असलेल्या व रस्त्यावर सावकाश जाणाऱ्या लोकांकडे येतात. त्यांचे बोलणे ‘कृपायुक्त, मिठाने रूचकर’ असते व प्रत्येकाजवळ जाताना कोणता पवित्रा घ्यावा याचा ते प्रथम विचार करतात. (कलस्सैकर ४:५, ६; १ पेत्र ३:१५) अशा रस्त्यावरील साक्षीकार्यामुळे त्यांना घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास मिळाले इतकेच नसून त्यांना कित्येकांना प्रकाशनांचे वितरण करण्यात यशही आले. होय. साजेशी केशभूषा आणि मित्रत्वाचे स्मित व मोकळेपणाने बोलणे याद्वारे तुम्हीही रस्त्यावरील साक्षीकार्यात प्रभावी राहू शकता. खरे पाहता, पाच साक्षीदारांनी अलिकडेच बाजारात लाईफ—हाव डीड इट गेट हिअर? बाय इव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकाच्या ३० पेक्षा अधिक प्रती वितरीत केल्या. यापैकीची बहुतेक पुस्तके मोटरीत बसून राहिलेल्या लोकांना देण्यात आली.
अनौपचारिक साक्षीकार्य
१४. अनौपचारिक साक्षीकार्याचे मोल कसे स्पष्ट दिसते?
१४ देव व ख्रिस्त यांनी आम्हाबाबत व्यक्त केलेल्या थोर प्रेमाबद्दल रसिकता व्यक्त करण्याचा पाचवा मार्ग अनौपचारिक साक्षीकार्य हा आहे. धार्मिकतेसंबंधाने भुकेले व तान्हेले असणाऱ्या लोकांना शोधण्याचा तसेच प्रकाशने वितरीत करण्याचा हा केवढा प्रभावी मार्ग ठरला आहे! इफिसकरास पत्र ५:१५, १६ मध्ये असणारा सल्ला “संधी साधून घ्या” मानण्याचा हा निश्चितच बरोबरचा मार्ग आहे. टॅक्सीतील एका सह प्रवाश्यासोबत एका मिशनऱ्याने बोलणे आरंभिले. त्या माणसाने आस्था दाखवली. त्याच्याकडे पुनर्भेटी घेतल्या गेल्या व पवित्र शास्त्र अभ्यास आरंभिण्यात आला. आज हाच माणूस ख्रिस्ती वडील आहे. आणखी एका ठिकाणी एका वडीलाने एका स्त्री सोबत संभाषण सुरु केले. ही स्त्री, आपले लग्न एका यहुदी माणसासोबत करण्यासाठी आपले धर्मांतर करण्याच्या तयारीत होती. पण तिला प्रथम हे जाणून घ्यायचे होते की कोण प्रथम आला, मोशे, नोहा, दावीद का आणखी कोण. वडीलाने तिला म्हटले की तिला बायबल स्टोरीज हे पुस्तक याबाबतीत अत्यंत उपयुक्त ठरेल कारण त्यामध्ये पवित्र शास्त्रीय घटना ऐतिहासिक अनुक्रमाने दिलेल्या आहेत. खरे पाहता, हे वडील तिला पूर्णपणे अनोळखी होते तरीही या स्त्रीने आपले नाव, पत्ता व पुस्तकाचे मूल्य, त्यांनी तिला ते पुस्तक टपालाने पाठवावे यासाठी दिले.
१५. अनौपचारिक साक्षीकार्यासाठी सुसंधीकरता दक्ष राहण्यासाठी आम्हास काय मदत करील?
१५ कधी कधी भीती वाटते म्हणून आम्ही आमच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यासोबत बोलणे सुरु करण्याची हेळसांड करीत असतो. पण तेच आपण धैर्य धरून बोललो तर त्यामुळे किती चांगले प्रतिफल मिळते! देवाच्या चांगुलतेबद्दलची रसिकता आणि लोकंची गरज आम्हाला हवे असणारे धैर्य उभारण्यात मदत देईल. होय, लक्षात घ्या की, “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रेमाचा व स्वशिस्तीचा आत्मा दिला आहे.”—२ तिमथ्यी १:७, न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन.
अनोळख्यांचे स्वागत करणे
१६. राज्य सभागृहास भेट देणाऱ्या अनोळख्यांबद्दल आम्ही दक्ष का राहिले पाहिजे?
१६ सहावा मार्ग की ज्याद्वारे आम्हाला देव आणि ख्रिस्ताला आपली कृतज्ञता व्यक्त करता येईल तो, राज्य सभागृहात येणाऱ्या अनोळख्यांचे स्वागत करणे हा आहे. आमच्या भक्तीच्या केंद्रस्थानी भेट देणाऱ्या कोणाही अनोळख्याची दखल घेण्याच्याबाबत शेजाऱ्यावरील प्रेमाने आम्हाला जागविले पाहिजे. आपण त्याला मोकळे वाटू देण्याचा, त्याच्या आध्यात्मिक कल्याणाची आस्था राखणाऱ्या मित्रांमध्ये आहे असे वाटू देण्याचा प्रयत्न राखावा. तो तेथे निव्वळ कुतूहुलामुळे आला नसावा. तो धार्मिकतेसाठी खराच भुकेला व तान्हेला असेल. आम्ही त्याच्याविषयी दाखविलेली अस्सल काळजी त्याच्यासोबत घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यात व त्याला जीवनाच्या मार्गावर ठेवण्याची मदत देण्यात परिणामी होऊ शकते. (मत्तय ५:३, ६; ७:१३, १४) खरे म्हणजे अशी ही गोष्ट वारंवार घडली आहे. वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या पहिल्या वर्गातील एका मिशनऱ्याने म्हटले की त्याला त्याचे दोन पवित्र शास्त्र विद्यार्थी राज्य सभागृहात भेटले.
पत्र लिखाणाद्वारे साक्षीकार्य करणे
१७. पत्र लिखाणाद्वारे साक्षीकार्य करण्याचा काय परिणाम घडू शकतो?
१७ देव व ख्रिस्त यांनी आम्हाबाबत दाखविलेल्या प्रेमाविषयी प्रतिसाद व्यक्त करण्याचा सातवा मार्ग पत्र लिखाणाचा होय. जे या साक्षीकार्याच्या प्रकाराचा वापर करतात अशांना उलटपत्री रसिकतेने भारावलेली पत्रे येतात. ज्यांना शारीरिक दुखण्यामुळे काही काळासाठी घरोघरचे कार्य करता येत नाही अशा पूर्ण वेळेच्या कार्यकर्त्याद्वारे हा प्रकार वापरला जातो. एक घटना अशी घडली: १२ मुलांचे एक कुटुंब होते. एके दिवशी बाप घरी आला तेव्हा त्याला, आपल्या मुलीस लग्नाची मागणी घालणाऱ्याने निर्विकारपणे घरातील पाच मुलांची हत्या केली असल्याचे दिसले. त्याने सांत्वन प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ती धर्मराज्याच्या धर्मपुढाऱ्यांकडे धाव घेतली पण ते त्याला मिळू शकले नाही. तथापि एके दिवशी त्याला एका अनोळख्याकडून, साक्षीदाराकडून एक पत्र आले. साक्षीदाराने वर्तमानपत्रात या माणसाची दारूण कहाणी वाचली होती व त्याचे सांत्वन करण्याची त्याची इच्छा होती. या पत्रासोबत त्याने सत्य पुस्तक पाठविले होते. तो माणूस याच्याच शोधात होता. आज तो आवेशी साक्षीदार आहे.a
फोनद्वारे संपर्क साधणे
१८, १९. सुवार्तेचा प्रचार करण्याचे आणखी कोणते माध्यम काहींना प्रभावी आढळले आहे व का?
१८ साक्षीकार्याच्या आठव्या प्रकाराबाबत पाहता, राज्याच्या सुवार्तेचा प्रकार फोनद्वारे करण्याची संधि उपलब्ध आहे. हा साक्षीकार्याचा अत्यंत समाधानकारक व प्रभावी प्रकार बनत आहे. अधिकाधिक साक्षीदार उपाध्यपणाच्या या प्रकारात अत्यंत कुशल होत आहेत व त्याबद्दलची शिफारस करण्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. याकरवी आम्ही अशांचा संपर्क साधू शकतो ज्यांना आम्हाला घरोघरच्या कार्यात भेटता येत नाही. फोनवरील साक्षीकार्य बुद्धीमानीने, दयाळूपणे, चतुराईने व कुशलतेने केल्यामुळे काहींनी लोकांना त्यांच्या घरी भेटण्यामुळे लाभणाऱ्या परिणामापेक्षा उत्तम प्रतिसाद मिळविलेला आहे.
१९ इंग्रजी भाषिक देशातील एक जपानी मंडळी आपल्या क्षेत्राचा भाग म्हणून टेलिफोनच्या पुस्तकाचा वापर करते. प्रचारक जपानी नाव असणाऱ्या व्यक्तिना फोन करतात व आस्था दाखविणाऱ्यांची व्यक्तीगत भेट घेण्याची योजना आखतात. या पद्धतीमुळे त्यांनी अक्षरशः डझनभर अभ्यास सुरु केले आहेत.
चांगल्या वर्तणुकीद्वारे साक्ष देणे
२०, २१. आमची वर्तणूक कोणता चांगला परिणाम घडवते? विवेचीत करा.
२० देवाला स्तुती आणविण्याचा नववा मार्ग आमची उत्तम वर्तणूक आहे. एका रशियन पत्रकाराने आमच्याबद्दल म्हटले की आमची चांगली वागणूक हेच आमचे सर्वोत्तम प्रवचन आहे. खरे म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च नैतिकतेविषयी वृत्तमाध्यमाने वेळोवेळी प्रशंसोद्गार काढले आहेत. एकाने म्हटले: “फेडरल रिपब्लिक जर्मनीतील यहोवाचे साक्षीदार अत्यंत प्रामाणिक असल्याचे ओळखले जाते.” शालेय वर्ष सुरु झाले तेव्हा एका साक्षीदार मुलीने आपल्या शिक्षकाला स्कूल माहितीपत्रक दिले. त्यांनी ते एकदम धिक्कारून म्हटले की त्यांना साक्षीदारांविषयी कोणतेच कर्तव्य नाही. तरीपण काही काळातच तिच्या सद्र्गिणी वर्तनाने तिला त्यांच्या मर्जीत पसंती मिळवून दिली व यामुळे त्यांचा साक्षीदारांकडे पाहण्याचा दृष्टीकोणच पूर्णपणे बदलला गेला. अशा स्वरूपाचे एक पत्र साक्षीदार पालकांना त्याच्या मुलांच्या शाळा शिक्षकाकडून आले: “तुमच्या विश्वासासंबंधीचा नाकबूल करता येणार नाही असा यशप्राप्तीचा पुरावा स्वतः तुमची मुले आहेत.”
२१ देव आणि ख्रिस्त यांना सन्मान आणता आला नाही तर जग यहोवाच्या साक्षीदारांविषयी चांगले बोलणारच नाही. हे असेच होत असते. येशू ख्रिस्तानेच म्हटले नव्हते का की आम्ही आपला उजेड लोकांपुढे पडू द्यावा की ज्याद्वारे ते आमची चांगली कर्मे पाहतील व आमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करतील? (मत्तय ५:१६) खरेच, आमच्या चांगल्या वागणुकीद्वारे आम्ही सत्यास विभूषित करू शकतो. (तीत २:१०) आमची वागणूक देव व ख्रिस्ताला गौरव आणते आणि इतरांना जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत देते ही वस्तुस्थिती असल्यामुळे आमची ही वागणूक दोषयुक्त नाही याविषयीची मोठी काळजी करण्याचे हे प्रबळ कारण आहे.
२२. तुम्ही कोणत्या मार्गाने रसिकता दाखविण्याचा प्रयत्न कराल व का?
२२ आम्ही आता पाहिले आहेच की यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी आम्हाबाबतीत जे सर्व केले व खासपणे आपल्या प्रेमाचे जे थोर वक्तव्य केले त्या विषयीची रसिकता आम्हाला व्यक्त करता येईल. हे करीत असता आम्ही आमची शेजारप्रीतीही दाखवू शकू.—मार्क १२:३०, ३१.
२३. देव व येशू या विषयीची रसिकता तुम्हाला कोणत्या अंतिम प्रकारे दाखवता येईल?
२३ समारोपाला आम्ही याची दखल घेऊ की प्रभूचे सांज भोजन साजरे करण्याद्वारे आम्ही प्रीतीच्या दोन सर्वथोर वक्तव्याच्या बाबतीत आपली रसिकता व्यक्त करू शकू. पृथ्वीवर मानव यानाते असता आपल्या शेवटल्या रात्री येशूने, त्याचे मांस व रक्त यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाकर व द्राक्षारसाचा समावेश असणाऱ्या भोजनाच्या वार्षिक महोत्सवाची प्रस्थापना केली. हा उत्सव त्याच्या स्मरणार्थ साजरा करावा आशी त्याने आज्ञा केली. (१ करिंथकर ११:२३–२६) पुढील वर्षी होणारा प्रभूच्या सांज भोजनाचा विधि शुक्रवार, एप्रिल १ तारखेला सूर्यास्तानंतर होईल. येशूच्या आज्ञेच्या पालनार्थ जगभरातील यहोवाचे साक्षीदार आपापल्या मंडळ्यात उपस्थित राहतील. तुम्ही हा प्रसंग चुकवू नका.
[तळटीपा]
a सविस्तर माहितीसाठी अवेक! ऑक्टोबर २२, १९८६ पृष्ठे १२–१६ पहा.
उजळणीसाठी प्रश्न
◻ येशूने कोठे व कशी साक्ष दिली?
◻ येशूच्या अनुकरणार्थ आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी देवाच्या थोर प्रेमाविषयी आपली रसिकता व्यक्त करता येईल?