जाहीरपणे व घरोघरी शिकवा
“मी जाहीरपणे व घरोघरी शिकवण्यात भिऊन माघार घेतली नाही.” —प्रे. कृत्ये २०:२०. “बाईंग्टन.”
१. यहोवाच्या साक्षीदारांच्या घरोघरच्या सेवकपणाच्या प्रभावीपणाबद्दल एका कॅथोलिक पाळकाने काय विवेचन केले?
“कॅथोलिकांनो, घरोघरी शुभवर्तमान न्या.” हा द प्रॉव्हिडन्स संडे जर्नल नियतकालिकाच्या ऑक्टोबर ४, १९८७ च्या अंकातील मथळा होता. या कार्यातील प्रधान हेतू “काही अक्रियाक धर्माधिकाऱ्यांना धार्मिक जीवनात अधिक क्रियाशील भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्याचा होता,” असे त्या वर्तमानपत्राने कळवले. इव्हॅन्जिलायझेशन इन द डायोसिस ऑफ प्रॉव्हिडन्सच्या कार्यालयातील व्यवस्थापक पाळक जॉन ॲलार्ड यांना असे म्हटल्याचे अवतरीत आहेः “यामुळे निश्चितच जोरदार टिका होईल. लोक म्हणतील, ‘पाहा, ते चालले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांसारखे ते जात आहेत.’ पण यहोवाचे साक्षीदार तर खूपच निष्णात आहेत, नव्हे का? तुम्ही [अमेरिकेतील ऱ्होडे आयलंड] प्रांताच्या कोणाही राज्य सभागृहात जाऊन पाहा, मी तुम्हाला टाळी देऊन सांगतो की तेथे ती मंडळी पूर्वीच्या कॅथोलिकांनी भरून गेलेली दिसेल.”
२. कोणता प्रश्न योग्यपणे विचारण्यात आला आहे?
२ होय, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरोघरच्या प्रभावी सेवकपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. पण ते घरोघर का जातात?
प्रेषितीय नमुना
३. (अ) येशूने आपल्या शिष्यांना कोणती नेमणूक दिली? (ब) ख्रिस्ताच्या आरंभीच्या शिष्यांनी कोणत्या प्रधान मार्गाने ही नेमणूक पूर्ण केली?
३ येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ही अर्थभरीत नेमणूक दिलीः “यास्तव, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा, आणि पाह, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) हे काम कोणत्या प्रधान मार्गाने होणार हे इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर लगेच दिसले. ‘येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकवीत व सुवार्ता गाजवीत राहिले.’ (प्रे. कृत्ये ५:४२) यानंतर साधारण २० वर्षांनी प्रेषित पौल देखील घरोघरच्या कार्यात गुंतला होता; कारण त्याने इफिस या शहरातून आलेल्या ख्रिस्ती वडीलांना याचे स्मरण दिले की, “जे हितकारक ते तुम्हास सांगण्यास आणि चार लोकात व घरोघरी शिकवण्यास मी माघार घेतली नाही.”—प्रे. कृत्ये २०:२०.
४. प्रे. कृत्ये ५:४२ तसेच प्रे. कृत्ये २०:२० चा अर्थ, येशूच्या अनुयायांचा प्रचार घरोघरी वितरीत केला जात होता असे आम्ही का म्हणू शकतो?
४ प्रे. कृत्ये ५:४२ मधील “घरोघरी” या शब्दांचे भाषांतर कॅट’ ऑयʹकॉन पासून आहे. येथे का․टाʹ हा शब्द “वितरण करणे” या अर्थाने वापरला आहे. या कारणास्तव, शिष्यांचा प्रचार एका घरापासून दुसऱ्यात वितरीत करण्यात आला. प्रे. कृत्ये २०:२० बद्दल भाष्य करताना रँडोल्फ ओ. येगेर यांनी म्हटले की, पौलाने “जाहीर सभा [डे․मो․सिआʹ] आणि घरोघरी (वितरणाचा अर्थ देणारा [का․टाʹ]) या दोन्ही ठिकाणी शिकवले. पौलाने तीन वर्षे इफिसात काढली होती. त्याने प्रत्येक घरी भेट दिली, किंवा निदान सर्व लोकांना प्रचार केला. (वचन २६) अशाप्रकारे, घरोघरचे तसेच जाहीर सभेद्वारे सुवार्तेचे कार्य उरकण्याचे हे एक प्रमाण आहे.”
५. प्रे. कृत्ये २०:२० मध्ये पौल वडीलांना दिलेल्या औपचारिक भेटी किंवा मेंढपाळकत्वाच्या भेटीच्या अनुषंगाने का बोलत नव्हता?
५ का․टाʹ या शब्दाचा आणखी एक वापर लूक ८:१ मध्ये दिसतो, जेथे येशूने “नगरोनगरी व गावोगावी” प्रचार केल्याचे म्हटले आहे. पौलाने प्रे. कृत्ये २०:२० मध्ये कॅट’ ऑयʹकौस हा अनेकवचनी शब्द वापरला. येथे काही पवित्र शास्त्र भाषांतरात “तुमच्या घरी” असे वाचण्यात येते. पण येथे, प्रेषित, वडीलांना दिलेल्या औपचारिक भेटी किंवा आपल्या समविश्वासू बांधवांच्या घरी ज्या मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्या त्यांना अनुलक्षून बोलत नव्हता. तर तो विदेश्यांमध्ये घरोघरचे कार्य करण्याचा विषयाबाबत बोलत होता हे त्याच्या पुढील शब्दांवरुन कळते, कारण तो म्हणालाः “पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी यांस मी साक्ष देत होतो.” (प्रे. कृत्ये २०:२१) समविश्वासू बांधवांनी तर पश्चात्ताप करून येशूवर आधीच आपला विश्वास ठेवला होता. यास्तव, प्रे. कृत्ये ५:४२ व प्रे. कृत्ये २०:२० ही वचने विदेश्यांना “घरोघरी” किंवा त्यांच्या दारी प्रचार करण्यास अनुलक्षून आहेत.
याला पर्याय नाही
६. इफिसमधील पौलाच्या प्रचार कार्याच्या प्रकाराबद्दल काय सांगण्यात आले?
६ पौलाच्या प्रे. कृत्ये २०:२० बद्दल विवेचन मांडताना १८४४ मध्ये एबीयेल ॲबट लिव्हमोर यांनी लिहिलेः “त्याला नुसत्या जाहीर सभेत भाषणे देण्यात तसेच इतर साधनांच्या साहाय्याने माहिती देण्यात रस नव्हता. तर त्याने आपले महान कार्य खाजगीपणे, घरोघरी केले. खरे म्हणजे, त्याने स्वर्गाची सत्ये प्रत्यक्षात इफिसकरांच्या घरी व त्यांच्या अंतःकरणी नेली.” अलिकडेच असे निरिक्षिण्यात आले की, “सुवार्तेचा घरोघरी फैलाव करणे हे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचे सुरवातीपासूनचे गुणलक्षण होते (पडताळा प्रे. कृत्ये २:४६; ५:४२). . . . इफिसमधील यहूदी व विदेशी यांच्याबाबतीत [पौलाने] आपली जबाबदारी कसून पूर्ण केली होती, आणि जर त्यांचा पापात नाश झाला तर त्यांना काहीही सबब सांगता येणार नव्हती.”—द वेस्लेयन बायबल कॉमेंट्री, खंड ४, पृष्ठे ६४२-३.
७. देवाला यहोवाच्या साक्षीदार करीत असलेले घरोघरचे सेवकपण पसंद आहे असे का म्हणता येते?
७ सुवार्तेची घोषणा करण्याच्या कामी जाहीर व्याख्यानाचे आपले स्थान आहे, तरी लोकांच्या दारी जाऊन त्यांच्या व्यक्तीगत संपर्क साधणे याला काहीही पर्याय नाही. याबाबत विद्वान जोसेफ ॲडीसन अलेक्झांडर यांनी म्हटले आहेः “चर्च व घरगुती प्रचार यांच्यामधील एखादे स्थान निर्माण करण्याचा चर्चने अद्याप काहीही प्रयत्न केला नाही.” तसेच प्रामाण्य ओ. ए. हिल्स म्हणतातः “जाहीर शैक्षणिक कार्य तसेच घरोघरचे शिक्षण कार्य एकमेकांच्या संगतीत होण्यास हवे.” यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जाहीर व्याख्यानाच्या साप्ताहिक सभेत भाषणाद्वारे सूचना प्रदान करतात. याशिवाय, घरोघरी पवित्र शास्त्रीय सत्य प्रसारीत करण्याची प्रेषितीय पद्धत देखील खूप परिणामकारक आहे याबद्दल त्यांच्याकडे स्पष्ट पुरावा आहे. ही पद्धत यहोवाला पसंत आहे हे तो दर वर्षी हजारोंचा लोंढा खऱ्या भक्तीकडे निरवून अशा सेवकपणाला जे परिणाम मिळवून देत आहे त्याद्वारे दिसून येत आहे.—यशया २:१-४; ६०:८, २२.
८. (अ) घरोघरचे प्रचारकार्य का प्रभावी आहे याबद्दल काय म्हणण्यात आले? (ब) यहोवाच्या साक्षीदारांचा घरोघरचे प्रचारकार्य व इतर साक्षीकार्य याबाबतीत पौलाशी कसा मेळ बसतो?
८ आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहेः “लोकांना चर्चमध्ये सांगितलेल्या गोष्टींपेक्षा त्यांच्या घरी सांगितलेल्या गोष्टी स्मरणात ठेवण्यास सोप्या वाटतात.” पौल सुद्धा लोकांच्या घरी नियमितपणे गेला व त्याने सेवक म्हणून आपले चांगले उदाहरण ठेवले. “तो सभास्थान तसेच बाजारपेठ यात शिक्षण देणे व भाषण करणे यापुरता संतुष्ट नव्हता,” असे पवित्र शास्त्र प्रामाण्य एड्वीन डब्ल्यु. राईस यांनी म्हटले. ते पुढे म्हणतातः “तो ‘घरोघरी’ ‘शिक्षण देण्यात’ परिश्रमी होता. ते घरोघरचे, हातोहात, समोरासमोर दुष्टाईशी सामना करणे होते व लोकांना ख्रिस्तामध्ये जिंकून घेणे होते. ही लढत त्याने इफिसमध्ये दिली.” लोकांच्या घरी व्यक्तीगतरित्या बोलणी करणे प्रभावी ठरते असे यहोवाच्या साक्षीदारांना देखील आढळले आहे. याशिवाय ते त्यांच्या पुनर्भेटी घेतात व जर विरोधकांनी व्यवहार्य पद्धतीने संभाषण करण्यास मुभा दिली तर ते त्यांच्याशीही बोलण्यात आनंद मानतात. हे केवढे पौलाप्रमाणेच आहे! त्याच्याबद्दल एफ्. एन्. पेलौबट यांनी लिहिलेः “पौलाचे सर्व काम सभांपुरतेच मर्यादित नव्हते. त्याने तर व्यक्तीगतपणे लोकांच्या भेटी घेतल्या, जेथे जेथे चौकशी करणारे आहेत असे त्याला समजले, किंवा आस्थेवाईक आहेत असे दिसले, आणि विरोधक पण धर्माबद्दल बोलणी करण्यास तयार असलेले आढळले अशांच्या त्याने भेटी घेतल्या.”
वडीलांनी पुढाकार घ्यावा
९. पौलाने आपल्या सहवडीलांसाठी कोणते उदाहरण मांडले?
९ पौलाने आपल्या सहवडीलांसाठी कोणते उदाहरण राखले? यांनी सुवार्तेचे न थकणारे घरोघरचे घोषक असावे असे त्याने दाखवून दिले. १८७९ मध्ये जे. ग्लेन्टवर्थ बट्लर यांनी लिहिलेः “[पौलाला] आपल्या प्रचारकार्यात व्यक्तीगत धोका तसेच प्रसिद्धी या विचारांचा कसलाही परिणाम होत नव्हता; तो तर आपले कार्य मनापासून करीत होता हे [इफिसमधील वडीलांना] ठाऊक होते. त्याने आवश्यक सत्य कोणापासूनही वंचित ठेवले नाही; त्याने पक्षपात राखून सत्याच्या एका विशिष्ठ किंवा अपूर्व बाजूला धरले असे काही केले नाही, उलट त्याने सर्वांना मिळून, ‘प्रगतिसाठी,’ किंवा उभारणी करण्यासाठी जे लाभदायक होते ते सर्व कळविले: तो होता, देवाचा संपूर्ण मनोरथ शुद्ध व पूर्णतेने कळवणे! हे विश्वासू ‘प्रदर्शन,’ हे ख्रिस्ती सत्याचे तळमळीचे ‘शिक्षण’ ही त्याची पद्धत होती; केवळ तुरन्नाच्या शिक्षणगृहात व शिष्यांच्या इतर एकत्र भेटण्याच्या जागेत नव्हे, तर जाऊ शकणाऱ्या प्रत्येक घरात ते तो करीत होता. त्याने घरोघरी, जिवाजिवाला, दरदिवशी ख्रिस्तासारखी इच्छा व उत्कंठा राखून आनंदी वार्ता कळविली. सर्व वर्ग व वंश, प्रतिकूल यहूदी व तिरस्करणीय हेल्लेणी या सर्वांना, पूर्ण रुपाचा व इतर आवश्यक सर्व उद्धारक सत्ये समाविष्ट असणारा एकच विषय सांगितला: देवाला पश्चात्ताप, आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त यावर विश्वास प्रदर्शित करणे.
१०, ११. (अ) पौलाने ख्रिस्ती सेवकपणाच्या अनुषंगाने इफिसच्या वडीलांकडून कोणती अपेक्षा धरली? (ब) पौलाप्रमाणेच आज यहोवाचे साक्षीदार त्यांच्या वडीलांसमवेत कोणत्या स्वरुपाचा प्रचार करतात?
१० तर मग, पौल त्या इफिसच्या वडीलांबाबत कसली अपेक्षा राखून होता? इ. एस. यंग या प्रामाण्यांनी पौलाच्या त्या शब्दांचे या प्रकाराने समालोचन केलेः “मी केवळ जनसभेत बोललो नाही, पण घरोघरी, यहूदी व हेल्लेणी या सर्व वर्गाच्या लोकात मी परिश्रम घेतले. या सर्व वर्गाच्या लोकांसाठी मजजवळ एकच विषय होताः ‘देवाविषयीचा पश्चात्ताप व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील विश्वास.’” पौलाचे हे शब्द आणखी एका प्रकारे संबोधून डब्ल्यु. बी. रिले यांनी लिहिलेः “याचा स्पष्ट अर्थ हा की, ‘मी जे सुरु केले तेच तुम्ही करावे. करावे व शिकवावे. तसेच जे मी धिक्कारले ते तुम्हीही धिक्कारावे.; मी जसे रस्त्यावर व घरोघरी जाऊन केले तेच तुम्ही खाजगीरित्या व जाहीरपणे करावे. यहूदी व हेल्लेणी यांना त्याचसारखा देवावरील पश्चात्ताप आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील विश्वास यांची साक्ष द्यावी; कारण हीच मूलगामी तत्त्वे होय!’”
११ यास्तव, हे स्पष्ट आहे की, प्रेषितांची कृत्ये याच्या २०व्या अध्यायात पौल आपल्या सहकारी वडीलांना, त्यांनी यहोवाचे घरोघर जाणारे साक्षीदार असले पाहिजेत, हे दाखवीत होता. याबाबतीत, पहिल्या शतकातील वडीलांनी मंडळीतील इतर सदस्यांसाठी पुढाकार घ्यावयाचा होता व योग्य उदाहरण मांडायचे होते. (पडताळा इब्रीयांस १३:१७.) यास्तव, प्रेषित पौलाप्रमाणे आज यहोवाचे साक्षीदार घरोघरी प्रचार करून सर्व राष्ट्रातील लोकांना देवाचे राज्य, त्याबद्दलचा पश्चात्ताप, आणि येशूवरील विश्वास याबद्दल सांगतात. (मार्क १३:१०; लूक २४:४५-४८) अशा या घरोघरच्या कार्यात आधुनिक काळातील साक्षीदारांच्या नियुक्त वडीलांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.—प्रे. कृत्ये २०:२८.
१२. पूर्वीच्या काही वडीलांनी काय करायचे नाकारले, पण आज वडील कशात पुढाकार घेत आहेत?
१२ १८७९ मध्ये चार्ल्स टेझ रसेल यांनी झायन्स वॉच टावर ॲण्ड हेरल्ड ऑफ ख्राईस्टस् प्रेझेंस हे मासिक सुरु केले. त्याचे आजचे नाव द वॉचटावर अनाऊर्न्सिग जेहोवाज् किंग्डम असे आहे. रसेल तसेच इतर पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी देवाच्या राज्याची घोषणा प्रेषितीय नमुन्यानुसार केली. तथापि, नंतरच्या वर्षांत मंडळीच्या काही वडीलांनी साक्षीकार्याच्या आपल्या जबाबदारीस पूर्ण केले नाही. उदाहरणार्थ, एका साक्षीदाराने लिहिलेः “सर्व काही चांगले चालले होते. पण जेव्हा १९२७ मध्ये ही घोषणा करण्यात आली की, घरोघरच्या साक्षीकार्यात प्रकाशनासहित सर्वांनीच सहभाग घ्यावा आणि विशेषेरित्या रविवारचे घरोघरचे कार्य करावे, तेव्हा आमच्या निवडलेल्या वडीलांनी याला विरोध केला आणि सबंध वर्गाला या कार्यात सहभाग घेण्यापासून निराश करण्याचा प्रयत्न केला.” त्यानंतर, जे घरोघरच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत अशांना वडील बनण्याचा हक्क दिला जात नव्हता. आज देखील, वडील व उपाध्य सेवक या नात्याने सेवा करणाऱ्यांच्या बाबतीत, यांनी घरोघरचे प्रचार कार्य व ख्रिस्ती सेवेच्या इतर प्रकारात सहभागी होण्याची अपेक्षा धरली जाते.
प्रत्येकजण साक्षीदार
१३. (अ) लोकांनी जरी राज्याचा संदेश ऐकून घेतला नाही तरी आपण काय करावे? (ब) पौलाची यहेज्केलासोबत कशी तुलना होते?
१३ ख्रिश्चनांनी आज यहोवाच्या मदतीने घरोघरी राज्याचा संदेश, याला जरी रसिकपूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, तरी गाजविला पाहिजे. देवाचा पहारेकरी या नात्याने यहेज्केलला लोकांना, त्यांनी ऐकले वा न ऐकले तरी इशारा द्यायचा होता. (यहेज्केल २:५-७; ३:११, २७; ३३:१-६) यहेज्केल व पौल यांजमध्ये समांतरता सांगताना ई. एम. ब्लेकलॉक यांनी लिहिलेः “[पौलाने प्रे. कृत्ये २० वा अध्यायात दिलेल्या भाषणाद्वारे] त्याचे इफिसमधील सेवाकार्याचे चित्र स्पष्ट रुपाने दिसते. हे लक्षात घ्या: प्रथम पौलाचा नितांत विश्वासूपणा. त्याने प्रसिद्धी तसेच लोकांची संमती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. यहेज्केलने केलेल्या पहारेकऱ्याच्या कामाप्रमाणे त्याने आपले कर्तव्य प्रामाणिक आवेशाने पूर्ण केले व आपल्या वक्तव्यानुसार कृती आचरली. दुसरे हे की, त्याची प्रेमळ सहानुभूति. कोणतीही दयामाया न राखता त्याने नाशाचा संदेश चोहोकडे पसरवला नाही. तिसरे हे की, त्याचे अविश्रांत सुवार्तिकाचे कार्य. घरोघरी, जाहीरपणे, शहरात व सबंध प्रांतभर त्याने शुभवर्तमानाचा प्रचार केला.
१४. यहोवाला येशू ख्रिस्ताद्वारे प्रार्थनेने स्वतःचे समर्पण करणाऱ्या प्रत्येकावर साक्षीकार्य करण्याची जबाबदारी का आहे?
१४ देवाच्या आधुनिक काळच्या सेवकांवर असणारा मुबलक आशीर्वाद, त्यांनी आपणावर यहोवाचे साक्षीदार हे नाव लावून घेतले आहे म्हणून तो त्यांजवर संतुष्ट आहे यात काही संशय ठेवत नाही. (यशया ४३:१०-१२) याशिवाय ते ख्रिस्ताचे प्रतिनिधी देखील आहेत, कारण येशूने आपल्या अनुयायांना म्हटले होतेः “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमात, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) या कारणास्तव, यहोवाला येशू ख्रिस्ताद्वारे प्रार्थनेने स्वतःचे समर्पण करणाऱ्या प्रत्येकाची साक्षीकार्य करण्याची जबाबदारी आहे.
१५. आरंभीच्या ख्रिश्चनांच्या साक्षीकार्याबद्दल काय सांगण्यात आले?
१५ साक्षीकार्याबद्दल असे सांगण्यात आले आहेः “त्यात सबंध चर्चचा समावेश होता. आरंभीच्या चर्चची मिशनरी कामगिरी केवळ स्त्रियांची मिशनरी संस्था, किंवा विदेशी मिशनरी मंडळ यापुरती मर्यादित नव्हती. तसेच साक्षीचे हे कार्य वडील, डीकन्स किंवा प्रेषितांसारख्या सराईतांवर सोडण्यात आले नव्हते. . . . त्या आरंभीच्या काळी चर्च स्वत:च एक मिशन होते. आरंभीच्या चर्चचा मिशनरी कार्यक्रम या दोन मूलभूत ग्राह्य मानलेल्या गोष्टींवर आधारलेला होताः (१) चर्चचे प्रमुख कार्य हे जागतिकरित्या सुवार्ता गाजवणे. (२) हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सबंध ख्रिस्ती वसाहतीची आहे.”—जे. हर्बट केन.
१६. ख्रिस्ती तसेच साक्षीकार्य याबाबतीत ख्रिस्तीधर्मराज्यातील लेखक देखील काय कबूल करतात?
१६ ख्रिस्ती धर्मजगतातील आधुनिक लेखक जरी राज्य संदेशाच्या बाबतीत सहमत होत नसले तरी साक्षीकार्य करण्याचे ख्रिश्चनांचे कर्तव्य आहे याजबद्दल बहुतेक कबूल होतात. एव्हरीवन ए मिनिस्टर या पुस्तकात ऑस्कर ई. फ्युट यांचे हे निरिक्षण आहेः “देवाने प्रत्येक विश्वासधारकाला जी सेवा सोपून दिलेली आहे ती एकट्या पाळकाला पूर्ण करता येणार नाही. तथापि, चर्चमध्ये कित्येक शतके चुकीची विचारधारा रेंगाळत राहिल्यामुळे दुर्देवाने ५०० धर्मोपदेशकांचे काम एकट्या पाळकावर आले आहे. हे असे आरंभीच्या चर्चमध्ये नव्हते. तेथे जे जे विश्वास ठेवीत तो प्रत्येकजण वचनाचा प्रचार करीत असे.”
१७. आरंभीच्या ख्रिश्चनांच्या जीवनात साक्षीकार्य जे स्थान राखून होते त्याच्याबद्दल काय म्हणता येईल?
१७ आजच्या यहोवाच्या लोकांसारखेच आरंभीच्या ख्रिश्चनांच्या जीवनात साक्षीकार्य करणे प्रधान स्थान राखून होते. “स्पष्टपणे म्हणायचे तर,” हावर्ड विश्वविद्यालयाच्या एडवर्ड काल्डवेल मूर यांनी लिहिले, “पहिल्या तीन शतकात ख्रिस्ती हालचाली विश्वासाचा फैलाव मोठ्या आवेशाने करण्यामध्ये भरल्या होत्या. मुक्ततेचा संदेश सांगणे, सुवार्तिकाचे काम करणे ही ख्रिस्ती भावना उचंबळलेली होती. . . . तथापि, या आधीच्या काळामध्ये येशूची शिकवण व त्याचा प्रभाव यांचा प्रसार पुरुष व स्त्रिया यांच्या छोट्या जमावात दिसत होता, यांना आपण मिशनरी म्हणू शकू. ते प्रत्येक व्यवसायातील लोकांनी साध्य केलेली साध्यता व समाजातील प्रत्येक व्यवस्थेचे काम होते. [त्यांनी] आपल्या जीवनातील अंतस्थ गुप्तपणा, जगाबद्दल धारण केलेला नवा दृष्टीकोण [रोमी] साम्राज्याच्या दूरच्या कोपऱ्यापर्यंत नेला; हा त्यांच्या मते तारणाचा अनुभव होता. . . . सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा अंत समीप येत आहे याची [आरंभीच्या ख्रिश्चनांना] गाढ खात्री होती. त्यांना एका नव्या जागतिक व्यवस्थेची स्थापना एकाएकी व अद्भुत रितीने होईल असे वाटत होते.
१८. राजकीय पुढाऱ्यांना वाटणाऱ्या स्वप्नापेक्षा कोणती भव्य आशा श्रेष्ठ ठरते?
१८ आपल्या घरोघरच्या साक्षीकार्यात तसेच सेवेच्या इतर प्रकारात यहोवाचे साक्षीदार लोकांचे लक्ष आनंदाने, देवाने वचन दिलेल्या नव्या जगाकडे वेधतात. नव्या जागतिक व्यवस्थेची उभारणी करण्याचा प्रकल्प राखणाऱ्या आजच्या राजकीय मुत्सद्यांना जे स्पप्नात वाटते त्यापेक्षा त्या भाकित अनंतकालिक जीवनाचे आशीर्वाद मोठे अभूतपूर्व असतील. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४) देवाच्या नव्या अद्भुत जगात जगण्याची प्रत्येकाला राहण्याची इच्छा वाटत असेल, पण ते तसे नाही. तथापि, आधी, यहोवाचे सेवक, चिरकालिक जीवनाचा शोध घेणाऱ्यांना कोणत्या प्रभावी मार्गांनी शिकवू शकतात याचा आपण विचार करू या.
तुमचा प्रतिसाद काय आहे?
◻ प्रे. कृत्ये ५:४२ व प्रे. कृत्ये २०:२० ही वचने येशूच्या अनुयायांनी घरोघर जाऊन प्रचार करण्याचा संकेत देतात असे आपण का म्हणू शकतो?
◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या घरोघरच्या कार्याला देवाची संमती आहे हे आपल्याला कसे कळते?
◻ सेवेच्या बाबतीत वडील व उपाध्य सेवकांकडून कसली अपेक्षा आहे?
◻ साक्षीकार्याने ख्रिश्चनाच्या जीवनात कोणते स्थान राखले पाहिजे?
[२२ पानांवरील चित्रं]
इ. स. ३३ मध्ये येशूच्या शिष्यांनी कंटाळा न करता घरोघरचे साक्षीकार्य केले
[२५ पानांवरील चित्रं]
पौलाने “घरोघर” शिकविले सेवेचा हा प्रकार आज यहोवाचे साक्षीदार आचरीत आहेत