वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. ११
  • गांभिर्याने लक्ष देण्याजोगा व्हिडिओ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गांभिर्याने लक्ष देण्याजोगा व्हिडिओ
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “हा व्हिडिओ खरंच विचार करायला लावतो!”
  • “यातला संदेश थेट अंतःकरणाला भिडला!”
  • “मला माझ्या भावनांवर नियंत्रण राहिले नाही!”
  • उत्साही प्रतिसाद!
    आमची राज्य सेवा—२००२
  • पूर्ण वेळेच्या सेवेतील आनंद
    आमची राज्य सेवा—२०१२
  • विचार करून मित्र निवडा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • “हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”
    सावध राहा!—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. ११

गांभिर्याने लक्ष देण्याजोगा व्हिडिओ

“हा व्हिडिओ खरंच विचार करायला लावतो!”

“यातला संदेश थेट अंतःकरणाला भिडला!”

“मला माझ्या भावनांवर नियंत्रण राहिले नाही!”

१ तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही असेच वाटले का? काही वर्षांपूर्वी, एक तरुण बांधव बऱ्‍याच समस्यांमध्ये अडकला होता. आणि या समस्यांचे कारण होते, त्याने निवडलेले मित्र. या मित्रांमुळे हळूहळू सत्याबद्दल आणि यहोवासोबतच्या नातेसंबंधाबद्दल त्याची आस्था कमी झाली होती. त्याचदरम्यान खरे मित्र हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. तो लिहितो: “हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहताना माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. मला अगदी योग्य वेळी मदत केल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानले.” या व्हिडिओने त्याला आपल्या जीवनात परिवर्तन करण्यास आणि योग्य मित्र निवडण्यास प्रेरित केले. तो असेही म्हणाला: “सध्याच्या तरुणांना नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची तुम्हाला जाणीव आहे, हे या व्हिडिओवरून लक्षात येते.” आईवडिलांनो आणि तरुणांनो, तुमच्या पुढच्या कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहण्यास काय हरकत आहे? प्रत्येक भागानंतर व्हिडिओ थांबवून, पुढील परिच्छेदांतील प्रश्‍नांच्या आधारावर मोकळी व प्रामाणिक चर्चा करावी.

२ प्रस्तावना: खरा मित्र कोण असतो?—नीति. १८:२४.

३ मैत्रीच्या मार्गातील अडथळे: आपल्याला कोणीही मित्र नाहीत, या भावनेवर तुम्ही कशाप्रकारे मात करू शकता? (फिलिप्पै. २:४) आपल्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करण्यास तुम्ही तयार का असले पाहिजे आणि असे करण्यास तुम्हाला कोणाचे साहाय्य मिळू शकते? कशामुळे तुम्हाला बरेच नवनवीन मित्रमैत्रिणी मिळण्याची संधी मिळू शकते आणि हे मित्र तुम्हाला कोठे मिळतील?—२ करिंथ. ६:१३.

४ देवासोबत मैत्री: यहोवासोबत तुम्ही घनिष्ट नातेसंबंध कसा जोडू शकता आणि असे करणे सार्थक का ठरेल? (स्तो. ३४:८) देवासोबतची तुमची मैत्री आणखी पक्की कोण करू शकतो?

५ अयोग्य मित्र: कुसंगती म्हणजे काय? (१ करिंथ. १५:३३) अयोग्य प्रकारचे सोबती कशाप्रकारे एका व्यक्‍तीचा आध्यात्मिक दृष्टीने नाश करू शकतात? दीनाविषयीच्या बायबलमधील अहवालावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?—उत्प. ३४:१, २, ७, १९.

६ आधुनिक काळातील एक नाटिका: एकलकोंडेपणामुळे ताराची कशी अवस्था झाली होती? जगिक तरुणांसोबत मैत्री करण्याकरता तिने कोणत्या सबबी दिल्या? यामुळे तिच्यावर कोणकोणते धोकेदायक प्रसंग ओढवले? हे धोके तिच्या आईवडिलांना का लक्षात आले नाहीत पण त्यांनी कशाप्रकारच्या मनोवृत्तीने तिला आध्यात्मिकरित्या सावरण्यास मदत केली? पायनियर असणारी एक बहीण कशाप्रकारे ताराची खरी मैत्रीण ठरली? नीतिसूत्रे १३:२० आणि यिर्मया १७:९ यात जे सांगितले आहे त्याकडे ख्रिश्‍चनांनी लक्ष का दिले पाहिजे? ताराला कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला?

७ समाप्ती: या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळाले? इतरांना मदत करण्याकरता तुम्ही याचा कशाप्रकारे उपयोग कराल?—स्तो. ७१:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा