वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०६ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ८/०६ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज ऑग. १

“धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना सहसा ‘देव-भीरू’ म्हटले जाते. पण देव-भीरू असण्याचा मुळात काय अर्थ आहे? आपल्याला याविषयी काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या, मग नीतिसूत्रे ९:१० वाचा. यानंतर पृष्ठ २१ उघडून त्यावरील लेख दाखवा.] देव-भीरू असण्याचा काय अर्थ होतो हे या लेखात स्पष्ट केले आहे. तसेच देवाचे योग्य प्रकारचे भय आपण आपल्या मनात कसे उत्पन्‍न करू शकतो हे ही यात सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“दहशतवाद काही नवीन नाही, पण आज त्याने सबंध जगालाच आपल्या विळख्यात घेतले आहे. प्रत्येकाच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडत आहे. तुम्हाला काय वाटते, याचे कारण काय असावे? [उत्तर ऐकून घ्या.] सावध राहाच्या! या अंकात, दहशतवादाचा केव्हा अंत होईल आणि देव कशाप्रकारे या पृथ्वीवर खरी शांती आणेल याविषयी बायबलमधून खुलासा केला आहे.” मीखा ४:४ वाचा.

टेहळणी बुरूज सप्टें. १

“येशूने केलेल्या या विधानाविषयी आपले मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. [मत्तय ५:५ वाचा.] ही प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर जगाची परिस्थिती आज आहे तशीच राहील असे आपल्याला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] येशू या पृथ्वीवर कशाप्रकारे बदल घडवून आणेल हे या मासिकात बायबलच्या आधारावर सांगण्यात आले आहे. तसेच त्या पृथ्वीवर कशाप्रकारचे लोक राहतील हे देखील यात सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“जगाच्या एकूण लोकसंख्येतील ३ टक्के लोक कोणत्या न कोणत्या प्रकारच्या मानसिक दौर्बल्याने ग्रस्त आहेत असे सांगितले जाते. ज्या कुटुंबांत अशा व्यक्‍ती आहेत त्यांना या परिस्थितीला कसे तोंड देता येईल? [उत्तर ऐकून घ्या. मग पृष्ठ १७ वरील लेख दाखवा.] काही कुटुंबे या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरी गेली आहेत आणि इतरजण अशा कुटुंबांना कशी मदत करू शकतात हे या लेखात सांगितले आहे.” यशया ३५:५, ६ वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा