वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०७ पृ. १०
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ८/०७ पृ. १०

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज ऑग. १

“येशूच्या या शब्दांवर मला तुमचे मत हवे होते. [मत्तय ५:३ वाचा.] आनंद मिळण्यासाठी अध्यात्माची खरोखरच गरज आहे का? [उत्तर ऐका.] खरे अध्यात्म काय आहे आणि ते आपण कसे प्राप्त करू शकतो यावर बायबलचे काय म्हणणे आहे ते या मासिकात सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“जगाच्या बहुतेक भागात लोकांना असे वाटू लागले आहे, की नैतिक स्तरे ढासळत चालली आहेत. तुम्हालाही असे वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] आपण आज पाहत असलेली परिस्थिती एक प्राचीन भविष्यवाणी पूर्ण करते. [२ तीमथ्य ३:२-४ वाचा.] नैतिकता ढासळण्याचा काय अर्थ होतो आणि यामुळे मानवजात कुठे चालली आहे हे या मासिकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज सप्टें. १

“मला यावर तुमचे मत हवे होते. [इब्री लोकांस ३:४ वाचा.] या विश्‍वाचा एक बुद्धिमान रचनाकार आहे, याजशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तर ऐकून घ्या.] रचनाकारावर विश्‍वास करणे हे खऱ्‍या विज्ञानाशी जुळते का, याचे परीक्षण या मासिकात करण्यात आले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“पैशांची गरज सर्वांनाच असते. पण कधीकधी माणूस पैसा कमवण्याविषयी नको तितकी काळजी करतो असे तुम्हाला वाटत नाही का? [उत्तर ऐकून घ्या.] पैशाच्या मागे लागल्यामुळे काय परिणाम होतो याविषयी यात काय म्हटले आहे पाहा. [१ तीमथ्य ६:१० वाचा.] साधे राहणीमान ठेवून कमी पैशातही आपण कसा उदरनिर्वाह करू शकतो याविषयी या नियतकालिकात काही व्यवहारोपयोगी सूचना दिल्या आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा