मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑग. १
“आज जगात पुष्कळ गोंधळ माजला आहे, याजशी बहुतेक लोक सहमत आहेत. यासाठी धर्म काही अंशी जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] कदाचित देवाबद्दलचे सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला मदत मिळू शकते. देवाविषयीचे सत्य तुम्हाला कोठे मिळू शकेल, हे या मासिकात सांगितले आहे.” २ तीमथ्य ३:१६ वाचा.
सावध राहा! जुलै-सप्टें.
“पूर्वी, फक्त परदेशात सर्वसामान्य असलेल्या समस्या आजकाल आपल्याकडील बहुतेक तरुणांना भेडसावत आहेत, असे दिसते. तुम्हालाही असेच वाटते का? [उत्तर ऐका.] त्याचे हे एक उदाहरण पाहा. [मासिकातील पृष्ठ १८ वरील लेख दाखवा.] इथे तरुणांसाठी दिलेला उत्तम सल्ला काय आहे ते पाहा. [नीतिसूत्रे १८:१३ वाचा आणि पृष्ठ १८ वरील लेख दाखवा.] या लेखात असे काही मुद्दे सांगितले आहेत ज्यांवर आपण विचार केला पाहिजे.”
टेहळणी बुरूज सप्टें. १
“आजच्या जगात, एकनिष्ठा फक्त एक सद्गुण आहे ज्याची आचरणापेक्षा फक्त वाहवाह अधिक केली जाते. इथं वर्णन केलेल्या मित्रासारखे सगळेच लोक बनलेत तर किती चांगले होईल, नाही का? [नीतिसूत्रे १७:१७ वाचा. उत्तर ऐका.] आपल्या कुटुंबाशी व मित्रांशी एकनिष्ठ राहिल्याने काय फायदे मिळतात याबद्दलची चर्चा या मासिकात करण्यात आली आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“पुष्कळ पालक, आपली मुले काय पाहतात याबाबतीत निवडक आहेत. तुमच्या कुटुंबाला पाहता येतील असे चित्रपट आजकाल शोधणे कठीण झाले आहे का? [उत्तर ऐका. मग इफिसकर ४:१७ वाचा.] पालक आपल्या मुलांना, हितकारक मनोरंजन निवडण्यास मदत कशी करू शकतात याबद्दलची चर्चा या मासिकात करण्यात आली आहे.”