वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०६ पृ. १
  • शाखा दफ्तराचे पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाखा दफ्तराचे पत्र
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • ‘देवाच्या घराकडे’ गुणग्राहकतेने पाहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ९/०६ पृ. १

शाखा दफ्तराचे पत्र

प्रिय राज्य प्रचारकांनो:

मागच्या दोनतीन वर्षांत संघटनेत झालेल्या बदलांना तुम्ही सहकार्य दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो.

सप्टेंबर १, २००६ पासून प्रांतीय विभागणीत काही फेरबदल केले जात आहेत, जेणेकरून विभागीय संमेलनांत स्थानिक भाषा बोलणारे प्रांतीय पर्यवेक्षक सेवा करू शकतील. प्रांत १, इंग्रजी विभागाची, प्रांत २, हिंदी व उत्तर भारतातील भाषांची, प्रांत ३ कन्‍नड, तमिळ व तेलगू भाषिक प्रचारकांची व प्रांत ४ सर्व मल्याळम विभागांची देखरेख करतील.

तसेच, मोठ्या शहरांत निरनिराळ्या भाषा गटांकडे विशेष लक्ष देण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जात आहेत. याचा अर्थ, यापुढे कधीकधी एकाच क्षेत्रात एकापेक्षा अधिक मंडळ्या कार्य करतील. आणि यांपैकी प्रत्येक मंडळी आपापली भाषा बोलणाऱ्‍या लोकांवर लक्ष केंद्रित करतील.

यहोवाची इच्छा अधिक सुसंघटित रित्या पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांनाच योगदान द्यावे लागेल; आपल्या मंडळीच्या विशिष्ट भाषेव्यतिरिक्‍त दुसरी भाषा बोलणारे लोक भेटल्यास व त्यांनी आस्था दाखवल्यास आपण काय केले पाहिजे यासंबंधी जे काही मार्गदर्शन दिले जाईल त्याचे आपल्याला पालन करावे लागेल.—स्तो. ४०:८.

निरनिराळ्या भाषा बोलणारे नवीन लोक जसजसे आपल्यात सामील होतील तसतशी नव्या राज्य सभागृहांची गरजही वाढेल. देशभरातील निरनिराळ्या राज्य सभागृह प्रकल्पांना आतापर्यंत देण्यात आलेले उत्तम शारीरिक व आर्थिक सहकार्य कौतुकास्पद आहे. शाखा दप्तराची आर्थिक परिस्थिती अजूनही बदलेली नसली तरीसुद्धा, स्थानिक प्रचारकांनी अधिक अनुदान दिल्यामुळे अधिक राज्य सभागृहे बांधणे शक्य झाले आहे. जमिनीच्या व बांधकामाच्या वाढत्या खर्चाच्या रूपात आपला स्वतःचा भार मंडळ्या स्वतः उचलत असल्यामुळे, बांधकामाच्या कार्यक्रमावर पुढेही यहोवाचा आशीर्वाद राहील अशी आम्हाला खात्री आहे.—गल. ६:५; स्तो. १२७:१.

आपले बंधू,

भारताचे शाखा दफ्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा