वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०६ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km १/०६ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज जाने. १

“अलीकडील वर्षांत दुष्ट कृत्ये फारच वाढली आहेत. तुम्हाला काय वाटते, याला कसे तोंड दिले जाऊ शकते? [उत्तर ऐकून घ्या. मग रोमकर १२:१७ वाचा.] या मासिकात आजच्या जगात दिसणाऱ्‍या दुष्टाईचे कारण स्पष्ट केले आहे व तिच्यावर विजय कसा मिळवला जाईल हे देखील सांगितले आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च

“नैसर्गिक विपत्तींमुळे माजणारा हाहाःकार पाहून अंतःकरण अक्षरशः पिळवटून निघते. [तुमच्या क्षेत्रात घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करा.] या विपत्ती अलीकडे वाढल्या आहेत असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] या मासिकात याच प्रश्‍नावर चर्चा केली आहे. तसेच, अशा विपत्तींमध्ये ज्यांच्या प्रिय व्यक्‍तींचा मृत्यू झाला असेल अशा लोकांकरता सांत्वनदायक माहिती यात आहे.” योहान ५:२८, २९ वाचा.

टेहळणी बुरूज फेब्रु. १

“उदरनिर्वाहाकरता सर्वांनाच पैशाची गरज आहे. पण इथे उल्लेख केलेला धोका टाळण्याची गरज आहे असे तुम्हालाही वाटते का? [१ तीमथ्य ६:१० वाचा व उत्तर ऐकून घ्या.] टेहळणी बुरूजचा हा अंक, भौतिक सुसंपन्‍नतेचे काही धोके कोणते आहेत व ते कसे टाळावेत हे समजून घेण्यास साहाय्य करतो.”

सावध राहा! जाने.-मार्च

“वाहतुकीची कोंडी आजकाल रोजचीच गोष्ट झाली आहे. या समस्येला आपण कसे तोंड देऊ शकतो, तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या, मग नीतिसूत्रे १३:१६ वाचा.] या मासिकातील पृष्ठ १४ वर असलेला लेख यासंदर्भात काही उपयुक्‍त सूचना देतो, ज्यांचा अवलंब करून आपण सुबुद्धीने कार्य करू शकतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा