वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०६ पृ. ६
  • (१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • (१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर जर दोन वेळा अभ्यास झाला असेल व हा अभ्यास सुरू राहील असे वाटत असेल तर क्षेत्र सेवेच्या अहवालात हा बायबल अभ्यास मोजला जाऊ शकतो.
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km १/०६ पृ. ६

(१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय

बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करण्याची एक सोपी पद्धत ही आहे: (१) घरमालकाला आपले मत व्यक्‍त करायला लावणारा प्रश्‍न विचारा, (२) योग्य शास्त्रवचन वाचा, आणि (३) त्या विषयाबद्दल पुस्तकातील ज्या अध्यायात चर्चा केली आहे तो उघडून शीर्षकाखालील प्रश्‍नांकडे घरमालकाचे लक्ष वेधा. जर घरमालकाने आवड व्यक्‍त केली तर तुम्ही त्याच अध्यायातील सुरुवातीच्या परिच्छेदांच्या साहाय्याने बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवू शकता. ही पद्धत पहिल्या भेटीतच किंवा पुनर्भेट करताना बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

▪ “बायबलमध्ये या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, क्षुद्र मानव आपल्या सर्वसमर्थ सृष्टिकर्त्याला जाणून घेऊ शकतात असे तुम्हाला वाटते का?” प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७ वाचून दाखवा आणि त्यांचे उत्तर ऐकून घ्या. मग १ ला अध्याय उघडून दाखवा.

▪ “आज आपल्याला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचा विचार केल्यावर या वचनात ज्या सांत्वनाबद्दल व आशेबद्दल उल्लेख केला आहे ती मिळणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?” रोमकर १५:४ वाचून दाखवा व त्यांचे उत्तर ऐकून घ्या. मग २ रा अध्याय उघडून दाखवा.

▪ “तुमच्याजवळ इतकी ताकद असती तर तुम्ही इथं दाखवलेले बदल घडवून आणले असते का?” प्रकटीकरण २१:४ वाचून दाखवा व त्यांचा अभिप्राय ऐकून घ्या. मग ३ रा अध्याय उघडून दाखवा.

▪ “प्राचीन काळी लिहिण्यात आलेल्या या स्तोत्रात वर्णन केलेल्या परिस्थितीचा आपल्या मुलांना कधी उपभोग घ्यायला मिळेल असे तुम्हाला वाटते का?” स्तोत्र ३७:१०, ११ वाचून दाखवा व त्यांचा अभिप्राय ऐकून घ्या. मग ३ रा अध्याय उघडून दाखवा.

▪ “हे शब्द पूर्ण होतील असा दिवस कधी येईल असे तुम्हाला वाटते का?” यशया ३३:२४ वाचून दाखवा आणि त्यांचा अभिप्राय ऐकून घ्या. मग ३ रा अध्याय उघडून दाखवा.

▪ “जिवंत लोक काय करतात याविषयी मृतांना कळत असावे का याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?” उत्तर ऐकून घ्या. मग उपदेशक ९:५ वाचा आणि ६ वा अध्याय उघडून दाखवा.

▪ येशूने या वचनात सांगितल्याप्रमाणे, आपल्याला कधी मरण पावलेल्या आपल्या प्रिय व्यक्‍तींना पुन्हा पाहता येईल असे तुम्हाला वाटते का?” योहान ५:२८, २९ वाचून दाखवा व त्यांचा अभिप्राय ऐकून घ्या. मग ७ वा अध्याय उघडून दाखवा.

▪ “या सुप्रसिद्ध प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे घडणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?” मत्तय ६:९, १० वाचून दाखवा व उत्तर ऐकून घ्या. मग ८ वा अध्याय उघडून दाखवा.

▪ “या भविष्यवाणीत वर्णन केलेल्या काळात आपण आज राहत आहोत असे तुम्हाला वाटते का?” २ तीमथ्य ३:१-४ वाचून दाखवा व उत्तर ऐकून घ्या. मग ९ वा अध्याय उघडून दाखवा.

▪ “आज मनुष्यासमोर असलेल्या समस्या दिवसेंदिवस बिकट का होत चालल्या आहेत असा बरेचजण विचार करतात. हे त्याचे कारण असावे असा तुम्ही कधी विचार केला होता का?” प्रकटीकरण १२:९ वाचून दाखवा व त्यांचे उत्तर ऐकून घ्या. मग १० वा अध्याय उघडून दाखवा.

▪ “यासारखा एखादा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का?” ईयोब २१:७ वाचून दाखवा व त्यांचे उत्तर ऐकून घ्या. मग ११ वा अध्याय उघडून दाखवा.

▪ “बायबलमधील हा सल्ला पाळल्यामुळे लोकांना आनंदी कौटुंबिक जीवन उपभोगता येईल असे तुम्हाला वाटते का?” इफिसकर ५:३३ वाचून दाखवा व त्यांचे उत्तर ऐकून घ्या. मग १४ वा अध्याय उघडून दाखवा.

[Caption on page 6]

घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर जर दोन वेळा अभ्यास झाला असेल व हा अभ्यास सुरू राहील असे वाटत असेल तर क्षेत्र सेवेच्या अहवालात हा बायबल अभ्यास मोजला जाऊ शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा