वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०६ पृ. ४-५
  • बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल
  • मृत्यू/पुनरुत्थान
  • सार्वकालिक जीवन
  • कुटुंब
  • निवास समस्या
  • यहोवा देव
  • येशू ख्रिस्त
  • शेवटला काळ
  • प्रार्थना
  • धर्म
  • विपत्ती/दुःख
  • युद्ध/शांती
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते
    आमची राज्य सेवा—१९९७
  • (१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय
    आमची राज्य सेवा—२००६
  • तुम्हाला आढळलेल्या आस्थेचा मागोवा घ्या
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km १/०६ पृ. ४-५

बायबल काय शिकवते पुस्तक कसे सादर कराल?

या पुरवणीत बायबल काय शिकवते हे पुस्तक सादर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवल्या आहेत. यांचा परिणामकारक रित्या उपयोग करण्याकरता, यांतील माहिती आपल्या शब्दांत व्यक्‍त करा, आपल्या क्षेत्रातल्या लोकांना लक्षात घेऊन पुस्तक सादर करण्याच्या पद्धतीत फेरबदल करा आणि पुस्तकातून चर्चा सुरू करण्यासाठी वापरण्याजोग्या मुद्द्‌यांशी परिचित व्हा. येथे दिलेल्या सादरतांव्यतिरिक्‍त तुमच्या क्षेत्रात विशेष परिणामकारक ठरलेल्या इतर सादरतांचाही अवश्‍य उपयोग करावा.—आमची राज्य सेवा, जानेवारी २००५ अंकातील पृ. ८ पाहा.

बायबल

▪ “बायबलच्या संदर्भात बोलताना बरेचजण त्याला देवाचे वचन म्हणतात. तुमच्या व माझ्यासारख्या मनुष्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला देवाचे वचन कसे म्हणता येईल, असा कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग २ पेत्र १:२१ वाचा आणि पृष्ठे १९, २० वरील परिच्छेद ५ वाचून दाखवा.] या प्रश्‍नांची बायबलमधील उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.” असे म्हणून पृष्ठ ६ वर दिलेले प्रश्‍न त्यांना दाखवा.

▪ “आज लोकांना पूर्वी कधी नव्हती इतकी माहिती उपलब्ध आहे. पण आनंदी, सफल जीवन जगण्याकरता उपयुक्‍त सल्ला आपल्याला कोठे मिळेल असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग २ तीमथ्य ३:१६, १७ व पृष्ठ २२ वरील परिच्छेद १२ वाचून दाखवा.] देवाला संतोष वाटेल आणि आपलाही फायदा होईल अशाप्रकारे जीवन कसे व्यतीत करावे याविषयी या प्रकाशनात माहिती दिली आहे.” पृष्ठे १२२-३ वरील तक्‍ता व चित्र दाखवा.

मृत्यू/पुनरुत्थान

▪ “बरेच लोक विचार करतात की मृत्यूनंतर माणसाचे काय होते? याचे उत्तर मिळणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या. मग उपदेशक ९:५ व पृष्ठे ५८-५९ वरील परिच्छेद ५-६ वाचून दाखवा.] बायबलमध्ये पुनरुत्थानाचे वचन दिले आहे, त्याचा मृत लोकांवर कसा परिणाम होईल याविषयी या पुस्तकात खुलासा केला आहे.” पृष्ठ ७५ वरील चित्र दाखवा.

▪ “आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्‍तीला पुन्हा पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. नाही का? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये वचन दिलेल्या पुनरुत्थानाविषयी वाचल्यावर बऱ्‍याच जणांना सांत्वन मिळाले आहे. [योहान ५:२८, २९ व पृष्ठे ७१-२ वरील परिच्छेद १६-१७ वाचून दाखवा.] याच अध्यायात या प्रश्‍नांचेही उत्तर दिले आहे.” असे म्हणून पृष्ठ ६६ वर दिलेले अध्यायाच्या सुरुवातीचे प्रश्‍न दाखवा.

सार्वकालिक जीवन

▪ “बहुतेक लोकांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य हवेहवेसे वाटते. पण सर्वकाळ जगणे शक्य झाले, तर तुम्हाला सदासर्वकाळ जगायला आवडेल का? [उत्तर ऐकून घ्या. मग प्रकटीकरण २१:३, ४ व पृष्ठ ५४ वरील परिच्छेद १७ वाचून दाखवा.] आपण सार्वकालिक जीवन कसे मिळवू शकतो आणि हे आश्‍वासन वास्तवात उतरेल तेव्हा जीवन कसे असेल याविषयी या पुस्तकात माहिती दिली आहे.”

कुटुंब

▪ “सुखी कौटुंबिक जीवन असावे असे सर्वांनाच वाटते. नाही का? [उत्तर ऐकून घ्या.] कौटुंबिक जीवन सुखी बनवण्यासाठी, कुटुंबाचा प्रत्येक सदस्य देवाच्या प्रेमाचे अनुकरण करून कशाप्रकारे हातभार लावू शकतो याविषयी बायबलमध्ये सांगितले आहे.” इफिसकर ५:१, २ व पृष्ठ १३५ वरील परिच्छेद ४ वाचून दाखवा.

निवास समस्या

▪ “बऱ्‍याच ठिकाणी, चांगले घर आणि तेसुद्धा परवडणाऱ्‍या किंमतीत मिळणे अलीकडे फारच कठीण झाले आहे. सर्वांना चांगले व मनाजोगे घर मिळेल असा दिवस कधी येईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या. मग यशया ६५:२१, २२ व पृष्ठ ३४ वरील परिच्छेद २० वाचून दाखवा.] देवाचे हे आश्‍वासन कसे वास्तवात उतरेल याविषयी या प्रकाशनात स्पष्ट केले आहे.”

यहोवा देव

▪ “देवावर विश्‍वास असणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना वाटते की देवासोबत आपला घनिष्ट नातेसंबंध असावा. बायबल आपल्याला देवाच्या जवळ या असे सांगते हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐकून घ्या. मग याकोब ४:८अ व पृष्ठ १६ वरील परिच्छेद २० वाचून दाखवा.] लोकांना त्यांच्याजवळ असलेल्या बायबलच्या मदतीने, देवाबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करण्यासाठीच या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.” पृष्ठ ८ वर अध्यायाच्या सुरुवातीला दिलेले प्रश्‍न दाखवा.

▪ “बरेचजण देवाचे नाव पवित्र केले जावो अशी प्रार्थना करतात. हे नाव काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग स्तोत्र ८३:१८ व पृष्ठ १९५ वरील परिच्छेद २ व ३ वाचून दाखवा.] यहोवा देवाविषयी व मानवजातीकरता त्याचा काय उद्देश आहे याविषयी बायबल खरोखर काय शिकवते हे या पुस्तकात स्पष्ट केले आहे.”

येशू ख्रिस्त

▪ “येशू ख्रिस्ताविषयी जगातल्या कानाकोपऱ्‍यांत राहणाऱ्‍या लोकांनी ऐकलेले आहे. काहीजण म्हणतात की तो केवळ एक महापुरुष होता. काहीजण त्याला सर्वसमर्थ देव मानून त्याची उपासना करतात. येशू ख्रिस्ताविषयी आपण काय विश्‍वास करतो, हे महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते का?” [उत्तर ऐकून घ्या. मग योहान १७:३ व पृष्ठ ३७ वरील परिच्छेद ३ वाचून दाखवा. अध्यायाच्या शीर्षकाखालील प्रश्‍नांकडे लक्ष वेधा.

शेवटला काळ

▪ “बरेच लोक म्हणतात की आपण या जगाच्या शेवटल्या काळात जगत आहोत. भविष्यात कधी चांगले दिवस येतील अशी आशा धरण्याकरता काही आधार आहे का? [उत्तर ऐकून घ्या. २ पेत्र ३:१३ वाचा.] या शेवटल्या काळानंतर कशी परिस्थिती असेल याविषयी इथे काय सांगितले आहे पाहा.” पृष्ठ ९४ वरील परिच्छेद १५ वाचा.

प्रार्थना

▪ “देव प्रार्थनांचे उत्तर कसे देतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग १ योहान ५:१४, १५ व पृष्ठे १७०-२ वरील परिच्छेद १६-१८ वाचून दाखवा.] आपण देवाला प्रार्थना का करावी आणि त्याने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात म्हणून आपण काय करावे याबद्दलही या अध्यायात सांगितले आहे.”

धर्म

▪ “बरेच लोक आजकाल धर्मांना मनुष्यांच्या समस्यांवरील उपाय समजण्याऐवजी या समस्यांचे मूळ कारण समजू लागले आहेत. आज धर्म मनुष्याला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करत आहेत असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या. मग मत्तय ७:१३, १४ व पृष्ठ १४६ वरील परिच्छेद ५ वाचून दाखवा.] देव कोणत्या उपासनेला संमती देतो हे ओळखण्याकरता या अध्यायात सहा मुद्द्‌यांचे परीक्षण केले आहे.” पृष्ठ १४७ वरील मुद्दे दाखवा.

विपत्ती/दुःख

▪ “एखादी विपत्ती घडते तेव्हा बरेच लोक विचार करू लागतात, की देवाला खरोखर माणसांबद्दल काळजी वाटते का? त्यांचे दुःख त्याला दिसते का? तुम्ही कधी असा विचार केला आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग १ पेत्र ५:७ व पृष्ठ ११ वरील परिच्छेद ११ वाचून दाखवा.] देव मनुष्यांचे दुःख कायमचे कसे काढून टाकेल याविषयी या प्रकाशनात स्पष्ट केले आहे.” पृष्ठ १०६ वरील सुरुवातीचे प्रश्‍न दाखवा.

युद्ध/शांती

▪ “सबंध जगातील लोक जगात शांती असावी अशी इच्छा बाळगतात. पृथ्वीवर शांती येण्याची अपेक्षा करणे हे केवळ एक स्वप्न आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या. मग स्तोत्र ४६:८, ९ वाचून दाखवा.] सबंध पृथ्वीवर शांती आणण्याचा देवाचा उद्देश आहे आणि हा उद्देश तो कसा पूर्ण करेल याविषयी या प्रकाशनात सांगितले आहे.” पृष्ठ ३५ वरील चित्र दाखवा व पृष्ठे ३४-६ वरील १७-२१ परिच्छेदांवर चर्चा करा.

[Box on page 5]

वर्गणीचा उल्लेख कसा करावा?

“आमच्या जागतिक कार्याकरता तुम्हाला जर आता लहानशी वर्गणी देण्याची इच्छा असेल, तर आम्ही ती आनंदाने स्वीकारू.”

“आमचे साहित्य तसे विनामूल्य दिले जाते, पण आमच्या जागतिक कार्याकरता जर कोणाला लहानशी वर्गणी देण्याची इच्छा असेल तर आम्ही ती स्वीकारतो.”

“आर्थिकदृष्ट्या आमचे हे कार्य कसे काय चालते असा कदाचित तुम्हाला प्रश्‍न पडला असेल. तर आमचे हे जगव्याप्त कार्य ऐच्छिक वर्गण्यांच्या साहाय्याने चालते. जर तुम्हाला आता काही वर्गणी देण्याची इच्छा असेल तर आम्ही ती आनंदाने स्वीकारू.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा