बायबल काय शिकवते पुस्तकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास सुरू करणे
आपल्यापैकी बहुतेकांना बायबल अभ्यास चालवण्यास मनापासून आवडेल, पण मुख्य अडचण म्हणजे बायबल अभ्यास सुरू करायचा कसा? याबाबतीत, बायबल नेमके काय शिकवते? हे नवे पुस्तक आपली मदत करू शकते. या प्रकाशनातील पृष्ठे ३-७ यावर दिलेली प्रस्तावना, घरमालकासोबत बायबल आधारित चर्चा सुरू करण्यासाठीच खास तयार केलेली आहे. सेवाकार्यात फारसा अनुभव नसलेले प्रचारकही या प्रस्तावनेच्या साहाय्याने अगदी सहज बायबल अभ्यास सुरू करू शकतील.
▪ तुम्ही पृष्ठ ३ दाखवून ही पद्धत वापरू शकता:
तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या एखाद्या बातमीचा अथवा समस्येचा उल्लेख करून, पृष्ठ ३ वर ठळक अक्षरांत दिलेल्या प्रश्नांकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करा व त्यांचे मत विचारा. मग पृष्ठे ४-५ उघडा.
▪ किंवा तुम्ही सरळ पृष्ठे ४-५ उघडून संभाषणास सुरुवात करू शकता:
तुम्ही असे म्हणू शकता, “या चित्रांत दाखवलेले बदल खरोखर घडून आले तर चमत्कारच घडेल, नाही का?” किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता, “यांपैकी कोणत्या प्रतिज्ञेची पूर्णता झालेली पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात?” त्यांचे उत्तर लक्षपूर्वक ऐकून घ्या.
जर घरमालकाने एखाद्या विशिष्ट शास्त्रवचनाबद्दल आस्था व्यक्त केली, तर पुस्तकात त्या शास्त्रवचनावर ज्यांत स्पष्टीकरण दिले आहे त्या परिच्छेदांची चर्चा करून बायबल त्या विषयावर काय शिकवते ते त्यांना दाखवा. (पुरवणीच्या याच पृष्ठावरील चौकोन पाहावा.) बायबल अभ्यासात आपण ज्याप्रकारे चर्चा करतो तशीच या परिच्छेदांची चर्चा करा. हे पहिल्याच भेटीत, पाच ते दहा मिनिटांत दारातच उभे राहून केले जाऊ शकते.
▪ पृष्ठ ६ वरील माहितीचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्याची आणखी एक पद्धत:
या पृष्ठाच्या खालच्या बाजूला दिलेल्या प्रश्नांकडे घरमालकाचे लक्ष वेधून, त्यांना विचारा, “यांपैकी कोणताही प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे का?” जर यांपैकी एखाद्या प्रश्नाविषयी त्याने जिज्ञासा व्यक्त केली तर पुस्तकातून त्या प्रश्नाचे उत्तर देणारे परिच्छेद त्यांना दाखवा. (पुरवणीच्या याच पृष्ठावरील चौकोन पाहावा.) या परिच्छेदांतील माहितीची सोबत मिळून चर्चा करताना तुम्ही त्या व्यक्तीसोबत बायबल अभ्यासच करत असता.
▪ पृष्ठ ७ वरील माहिती वापरून तुम्ही बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवू शकता:
या पृष्ठावरील पहिली तीन वाक्ये वाचा. त्यानंतर ३ रा अध्याय उघडून १-३ परिच्छेदांच्या साहाय्याने अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवा. ३ ऱ्या परिच्छेदातील प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा करण्यासाठी पुढच्या भेटीची वेळ ठरवा.
▪ पुढच्या भेटीची व्यवस्था करणे: पहिल्यांदा अभ्यास केल्यावर, चर्चा संपवण्याआधी पुढच्या भेटीत चर्चा पुढे चालू ठेवण्याची व्यवस्था करा. तुम्ही फक्त इतके म्हणू शकता: “काही मिनिटांतच आपण एका महत्त्वाच्या विषयावर बायबल काय सांगते हे पाहिले. पुढच्या वेळी आपण [कोणत्या विषयावर चर्चा करणार आहात ते सांगा] चर्चा करू. पुढच्या आठवड्यात याच वेळी आल्यास चालेल का?”
आपण यहोवाच्या नियुक्त वेळेच्या जसजसे जवळ येत आहोत तसतसे तो आपल्यावर सोपवलेले कार्य पार पाडण्याकरता आवश्यक मार्गदर्शन आपल्याला पुरवत आहे. (मत्त. २८:१९, २०; २ तीम. ३:१७) तेव्हा, आपण बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या उत्कृष्ट पुस्तकाचा उत्तम उपयोग करू या.
[Caption on page 3]
पृष्ठे ४-५ वरील शास्त्रवचनांची चर्चा
◻ प्रकटीकरण २१:४ (पृ. २७-८, परि. १-३)
◻ यशया ३३:२४; ३५:५, ६ (पृ. ३६, परि. २२)
◻ योहान ५:२८, २९ (पृ. ७२-३, परि. १७-१९)
◻ स्तोत्र ७२:१६ (पृ. ३४, परि. १९)
पृष्ठ ६ वरील प्रश्नांची उत्तरे
◻ आपल्याला दुःख का सहन करावे लागते? (पृ. १०८-९, परि. ६-८)
◻ आपण जीवनाच्या चिंतांचा सामना कसा करू शकतो? (पृ. १८४-५, परि. १-३)
◻ आपण आपले कौटुंबिक जीवन सुखी कसे बनवू शकतो? (पृ. १४२, परि. २०)
◻ मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्व राहते का? (पृ. ५८-९, परि. ५-६)
◻ मृत्यू पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू का? (पृ. ७२-३, परि. १७-१९)
◻ भविष्यासाठी देवाने दिलेली अभिवचने तो पूर्ण करेल याची आपण शाश्वती कशी बाळगू शकतो? (पृ. २४, परि. १७)