वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०५ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ६/०५ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज जून १

“गरिबी कधी नाहीशी होईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] देव यासंबंधी कोणते आश्‍वासन देतो ते पाहा. [मीखा ४:४ वाचा.] हे आश्‍वासन वास्तवात कसे उतरेल याबद्दल या मासिकात चर्चा केली आहे.” पुढच्या भेटीत, देवाच्या आश्‍वासनानुसार हा बदल केव्हा घडून येईल? या प्रश्‍नाविषयी चर्चा करण्याची व्यवस्था करा.

सावध राहा! एप्रि.-जून

“बऱ्‍याच लोकांना अंगमेहनतीचे काम कमी दर्जाचे वाटते. पण शास्त्रवचनांत आपल्याला अंगमेहनतीचे काम करण्याचे प्रोत्साहन दिले आहे याविषयी तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐकून घ्या आणि मग उपदेशक २:२४ वाचा. पृष्ठ २० वरील लेख उघडा. या लेखात, खासकरून तरुण व्यक्‍तींनी अंगमेहनतीच्या व कष्टाच्या कामाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे यासंबंधी चर्चा केली आहे.”

टेहळणी बुरूज जुलै १

“आपल्यातील अनेकांचे बहुतेक आयुष्य कामातच जाते. काहीजण म्हणतात की हे एक वरदान आहे, तर काहीजण याला एक शाप समजतात. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग उपदेशक २:२४ वाचा.] या मासिकात, कामाविषयी समतोल दृष्टिकोन बाळगण्यास बायबल आपल्याला कशी मदत करू शकते याविषयी चर्चा केली आहे. तसेच कामाशी संबंधित असलेल्या तणावाला कसे तोंड द्यावे याविषयीही यात सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“बरेच पालक आपल्या मुलांना निवडकच चित्रपट पाहू देतात. पण हल्ली, संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यालायक चित्रपट निवडणे कठीण होत चालले आहे असे तुम्हालाही आढळले आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग इफिसकर ४:१७ वाचा.] या मासिकात, पालक आपल्या मुलांना चांगल्या प्रतीचे मनोरंजन निवडण्यास कशी मदत करू शकतात याविषयी सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा