वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०५ पृ. १
  • आपण इतरांचे ऋणी आहोत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण इतरांचे ऋणी आहोत
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • लोक घरी भेटत नाहीत तेव्हा
    आमची राज्य सेवा—२००७
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • लोकांचे जीव धोक्यात आहेत!
    आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२००५
km ७/०५ पृ. १

आपण इतरांचे ऋणी आहोत

१ प्रेषित पौल, लोकांना प्रचार करणे हे आपले कर्तव्य समजत होता. त्याला माहीत होते की यहोवाने त्याच्या पुत्राच्या मौल्यवान रक्‍ताच्या माध्यमाने सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होण्याकरता तरतूद केली होती. (१ तीम. २:३-६) म्हणूनच पौलाने म्हटले: “हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे.” सहमानवांना सुवार्ता सांगण्याद्वारे त्यांचे आपल्यावर असलेले हे ऋण फेडण्याकरता पौलाने अतिशय उत्सुकतेने अथक परिश्रम केले.—रोम. १:१४, १५.

२ पौलासारखेच, आज ख्रिस्ती त्यांच्या आसपासच्या लोकांना सुवार्ता सांगण्याकरता प्रत्येक संधीचा फायदा उचलतात. “मोठे संकट” अतिशय वेगाने जवळ येत आहे. त्यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधून काढणे निकडीचे आहे. लोकांबद्दल खऱ्‍या प्रेमाने प्रवृत्त होऊन या जीवनदायक कार्यात आपण परिश्रमाने सहभाग घ्यावा.—मत्त. २४:२१; यहे. ३३:८.

३ ऋण फेडणे: लोकांना भेटण्याचा सर्वात प्रमुख मार्ग म्हणजे घरोघरचे प्रचार कार्य. क्षेत्रात अनेक लोक घरी भेटत नाहीत, तेव्हा अशा घरांचा पत्ता नीट नोंदून घेण्याद्वारे आणि वेगळ्या दिवशी व वेळी तेथे जाण्याद्वारे आपण लोकांशी संपर्क साधण्यात यशस्वी होऊ शकतो. (१ करिंथ. १०:३३) तसेच, व्यापार क्षेत्रात, रस्त्यांवर, बगिच्यांत, वाहन तळांवर व दूरध्वनीद्वारेही आपण लोकांची भेट घेऊ शकतो. आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘जीवनाचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याकरता मी प्रचाराच्या सर्व पद्धतींचा उपयोग करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे का?’—मत्त. १०:११.

४ एक पायनियर भगिनी, क्षेत्रातल्या सर्व लोकांची भेट घेण्याच्या आपल्या जबाबदारीप्रती अतिशय जागरूक होती. तिच्या क्षेत्रात, एका घराच्या खिडक्यांचे पडदे नेहमीच बंद असायचे आणि त्या घरी कधीच कोणी नसायचे. पण एके दिवशी ही बहीण दुसऱ्‍या कोणत्या तरी कामाच्या निमित्ताने याच रस्त्याने जात होती. तेव्हा तिला या, नेहमीच कुलूप असलेल्या घरासमोर एक कार उभी असलेली दिसली. ही संधी गमवायला नको असा विचार करून तिने जाऊन दारावरची घंटा वाजवली. एका माणसाने दार उघडले. त्या दिवशी त्याच्याशी बोलल्यानंतर भगिनीने व तिच्या पतीने बरेचदा त्या माणसासोबत पुनर्भेटी केल्या. कालांतराने तो माणूस बायबल अभ्यास करण्यास तयार झाला आणि आज तो बाप्तिस्मा घेतलेला बंधू आहे. इतरांना प्रचार करण्याचे आपल्यावर ऋण आहे अशी जाणीव या बहिणीने बाळगल्याबद्दल हा बंधू अतिशय कृतज्ञ आहे.

५ अंत वेगाने जवळ येत आहे. तेव्हा, प्रचार कार्यात जोमाने सहभाग घेण्याद्वारे आपल्यावर इतरांचे असलेले ऋण फेडण्याची हीच वेळ आहे.—२ करिंथ. ६:१, २.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा