कौटुंबिक आराखडा—दैनिक वचन
१ आपल्या मुलांना उत्तम आहार देण्यासाठी प्रेमळ पालक प्रत्येक दिवशी बराच प्रयत्न करतात. देवाच्या वचनातून त्यांना आध्यात्मिक पोषण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (मत्त. ४:४) आपल्या मुलांची आरोग्यकारक आध्यात्मिक भूक वाढवण्यास व त्यांना ‘तारणासाठी वृद्धी’ करण्यास मदत करण्याचा एक मार्ग म्हणजे कुटुंब म्हणून दररोजचे दैनिक वचन व टिपणी वाचण्यासाठी वेळ काढणे. (१ पेत्र २:२) तुमच्या कौटुंबिक आराखड्यात तुम्ही याचा समावेश केव्हा करू शकाल?
२ भोजनप्रसंगी: दिवसाच्या सुरुवातीला दैनिक वचनाची चर्चा केल्यामुळे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात संपूर्ण दिवसभर यहोवाचे विचार घोळत राहतील. (स्तो. १६:८) एक आई, तिचा मुलगा नाश्ता खात असताना न विसरता दैनिक वचन त्याला वाचून दाखवायची आणि तो शाळेला निघायच्या आधी प्रार्थना करायची. यामुळे, त्याला राष्ट्रीय सोहळ्यांच्या प्रसंगी दृढ भूमिका घेण्याचे, अनैतिक प्रस्तावांचा प्रतिकार करण्याचे, सहविद्यार्थ्यांना व शिक्षकांना आपल्या विश्वासाची साक्ष देण्याचे धैर्य मिळाले. त्याच्या शाळेत तो एकटाच साक्षीदार होता तरीपण त्याला कधी, आपण एकटे आहोत असे जाणवले नाही.
३ सकाळी दैनिक वचनाची चर्चा करणे तुम्हाला जमत नसेल तर कुटुंब मिळून तुम्ही दिवसाच्या इतर वेळी कदाचित संध्याकाळच्या भोजनाच्यावेळी त्याची चर्चा करू शकता. काही जण या वेळी क्षेत्र सेवेतल्या अनुभवांची आणि व्यक्तिगत बायबल वाचनाच्या वेळी आढळलेल्या मुद्द्यांची देखील चर्चा करतात. टेबलाभोवती बसून कुटुंब मिळून घालवलेल्या या आनंदाच्या क्षणांची अनेक जण आठवण काढतात.
४ रात्री: काही कुटुंबांना, निजण्याआधीची वेळ दैनिक वचनाची चर्चा करण्याची उत्तम वेळ आहे असे वाटते. ही देखील एकत्र मिळून प्रार्थना करण्याची उत्तम वेळ आहे. यहोवाविषयी तुम्ही कसे बोलता, तुम्ही त्याला प्रार्थना कशी करता हे पाहून तुमच्या मुलांसाठी देखील यहोवा एक खरी व्यक्ती बनतो.
५ शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेचा चांगल्याप्रकारे उपयोग करून तुम्ही आपल्या मुलांच्या हृदयात सत्य बिंबवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचा आशीर्वाद असो!