वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०० पृ. ७
  • दैनिक वचनाची दररोज चर्चा करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दैनिक वचनाची दररोज चर्चा करा!
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • कौटुंबिक आराखडा—दैनिक वचन
    आमची राज्य सेवा—२००५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • शाळेत जाण्यास तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km १/०० पृ. ७

दैनिक वचनाची दररोज चर्चा करा!

१ उगवणारा प्रत्येक दिवस आपल्या विश्‍वासासंबंधी नवनवीन आव्हाने घेऊन येतो. एखादा जगिक मित्र डेटिंगवर जाण्याची किंवा बाहेर एकांतात गाठीभेटी करण्याची तुम्हाला एकसारखी गळ घालत असेल, तुमच्या शिक्षकाला वाटत असेल, की तुम्ही खूप खूप शिकावे आणि आयुष्यात मोठे काहीतरी करावे किंवा तुमच्या मालकाला वाटत असेल, की तुम्ही ओव्हरटाईम करावा. अथवा अलीकडे तुमची तब्येत खालावत असेल. अशा निरनिराळ्या समस्या सांगून येत नसल्या तरी एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नाहीत. या समस्यांवर, आव्हानांवर मात करण्याकरता आवश्‍यक असणारी व्यावहारिक बुद्धी देण्यास यहोवा नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला ही बुद्धी कशी मिळवता येईल? शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातील दररोजच्या शास्त्रवचनावर आणि त्याखाली दिलेल्या उताऱ्‍यावर दररोज चर्चा करण्याद्वारे तुम्हाला यहोवाची बुद्धी प्राप्त करता येईल. पण, त्याने आपल्यासाठी केलेल्या या तरतुदीचा आपण फायदा घेतो का?

२ कोण मदत करू शकतो: यशया ३०:२० मध्ये यहोवाला ‘महान शिक्षक’ असे म्हटले आहे. महान शिक्षक असल्यामुळे देवाचे लोक मदतीसाठी त्याच्याचकडे पाहू शकतात. ख्रिस्ती विश्‍वासाला आव्हान देणाऱ्‍या गोष्टींना यशस्वीरीत्या तोंड देता यावे म्हणून तो आपल्याला शक्‍ती देतो. कोणत्या मार्गाने? याचे उत्तर पुढच्याच वचनात अर्थात यशया ३०:२१ मध्ये दिलेले आहे. ते म्हणते: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.” आज यहोवाची ही “वाणी” बायबलद्वारे आणि ‘विश्‍वासू दासाने’ पुरवलेल्या साहित्याद्वारे आपल्या कानी पडते. (मत्त. २४:४५) उदाहरणार्थ, आपण फक्‍त टेहळणी बुरूज मासिकाचाच विचार केलात तर त्याच्या जुन्या अंकांमध्ये आपल्या ख्रिस्ती जीवनशैलीच्या हरएक पैलूला स्पर्श करणारे असंख्य लेख आपल्याला वाचायला मिळतील. जणू यहोवाच्या बुद्धीचे मोठे भांडारच आपल्यापुढे खुले आहे! शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यात उल्लेख केलेल्या टेहळणी बुरूज लेखांची उजळणी केली तरी ज्ञानाचा खजिना वाढवण्यास आपल्याला कितीतरी मदत होईल; आणि ज्ञानाच्या या अमूल्य खजिन्यामुळे जीवनातल्या कोणत्याही समस्येवर आपल्याला सहज मात करता येईल.—यश. ४८:१७.

३ त्यासाठी वेळ काढा: सकाळची वेळ फारच घाईगडबडीची असली तरी एका बहिणीने दररोज सकाळी नाश्‍ता करतेवेळी आपल्या मुलासोबत दैनिक वचन आणि त्याखाली दिलेला उतारा वाचून त्यावर थोडक्यात चर्चा करण्याची सवय केली होती. त्यामुळे तिचा मुलगा दररोज शाळेला जाण्याआधी बायबलमधील देवाचे शब्द आणि प्रार्थना ऐकूनच घराबाहेर पडायचा. दररोज सकाळी होणाऱ्‍या या आध्यात्मिक चर्चेमुळे त्या मुलाला अनैतिकतेत पडण्याच्या दबावाला तोंड देण्यासाठी, राष्ट्रीयवादासंबंधी एक तटस्थ भूमिका घेण्यासाठी तसेच शाळेतील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांना निर्भीडपणे साक्ष देण्यासाठी मदत मिळाली. विशेष म्हणजे, त्याच्या शाळेत तो एकटाच यहोवाचा साक्षीदार होता. पण, त्याला कधीही एकटे वाटले नाही.

४ यास्तव, मार्गदर्शनासाठी आणि साह्‍यासाठी नेहमी यहोवाकडे आणि त्याच्या वचनाकडे वळा. असे केल्यास एखाद्या भरवशालायक मित्राप्रमाणे तुमच्यासाठी यहोवा एक खरीखुरी व्यक्‍ती बनेल. तेव्हा दररोज त्याच्या वचनाचे परीक्षण करा! जगभरात, यहोवाच्या वचनाची दररोज चर्चा करणाऱ्‍या यहोवाच्या लाखो उपासकांसह तुमच्याही ‘डोळ्यांना महान शिक्षक दिसल्याची’ प्रचिती होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा