घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल १८-मे १५: जागृत राहा! माहितीपत्रकाचे वाटप करण्याची खास मोहीम. मे १६-३१: टेहळणी बुरूज व सावध राहा! याच्या एकेक प्रती सादर करा. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रिय सहभाग घेत नाहीत अशा व्यक्तींकडे पुनर्भेटी करताना त्यांना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) पुस्तक सादर करा. आपल्याला मुले नाहीत, असे घरमालकाने सांगितल्यास, त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का? देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी).
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. दुरुस्ती किंवा बांधकाम यासाठी, एक वेगळे खाते असेल तर हा अहवाल देखील तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ आसामी व मराठी भाषिक मंडळ्यांनी जून २७ च्या सप्ताहापासून सुरू होणाऱ्या पुस्तक अभ्यासाकरता हिंदी भाषेतले दानीएल भविष्यवाणी पुस्तक वापरावे. बंगाली, मिझो/लुशाय व तेलगू भाषिक मंडळ्या दानीएल भविष्यवाणी पुस्तकाऐवजी देवाची उपासना या पुस्तकाचा अभ्यास करतील.
▪ गंगटोक (नेपाळी) येथे आयोजित करण्यात आलेल्या “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशनाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आता हे अधिवेशन ऑगस्ट १२-१४, २००५ या तारखांना भरवण्यात येईल.
▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
यहोवाचे गुणगान करा —मोठ्या अक्षरातील इंग्रजी आवृत्ती
कृपया लक्षात असू द्या, की हे प्रकाशन खास मागणीचे साहित्य या प्रकारात मोडते आणि हे केवळ अशा व्यक्तींना उपलब्ध करून दिले जाईल, की ज्यांना दृष्टिदोषामुळे लहान अक्षरे वाचता येत नाहीत. तेव्हा, दृष्टिदोष असणाऱ्या प्रचारकाकडून याची मागणी करण्यात आली तरच या प्रकाशनाची ऑर्डर पाठवण्यात यावी. प्रचारकाला खरोखरच गरज आहे याची सेवा समितीने खात्री करावी व संस्थेला लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म पाठवताना त्यावर तसा उल्लेख करावा.
▪ उपलब्ध झालेल्या नव्या ऑडियो सीडी:
आपला डोळा निर्दोष ठेवा —कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी
कुटंबानो—बायबल वाचनास आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा! —कन्नड, तमिळ, मल्याळम, हिंदी
यहोवाच्या जवळ या (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
चौदा बायबल नाटके (तीन सीडींचा संच, एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी